Tea Making Tips : चहा भारतीय लोकांचा जीव की प्राण आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. कारण जास्तीत जास्त लोकांच्या दिवसाची सुरूवात गरमागरम चहानं होते. महिला असो वा पुरूष सगळ्यांनाच सकाळी चहा हवा असतो. काही लोक सकाळी आणि सायंकाळी दोन वेळा चहा पितात. तर काही लोक दिवसभरात अनेक कप चहा फस्त करतात. चहामुळे अनेकांना फ्रेश वाटतं. पण उपाशीपोटी चहा प्यायल्यानं अनेकांना अॅसिडिटी किंवा गॅसची समस्या होते. म्हणून अॅसिड रिफ्लक्सचा त्रास असलेल्या लोकांसाठी चहा नुकसानकारक ठरतो. बरं हा त्रास होऊनही अनेकजण चहा पिणं काही बंद करू शकत नाही. अशात जर आपण चहा सोडू शकत नसाल आणि अॅसिडिटी व गॅसही होऊ द्यायचा नसेल तर चहा करताना तीन गोष्टींची काळजी घेऊ शकता.
चहा करताना जर या तीन गोष्टी फॉलो केल्या गेल्या तर चहाही पिता येईल आणि गॅस-अॅसिडिटीची समस्याही होणार नाही. इतकंच नाही तर हा चहा आपली ब्लड शुगर, कोलेस्टेरॉल, हार्ट फंक्शन आणि ब्रेन फंक्शनमध्ये सुधारणा होईल. तसेच यानं शरीरातील विषारी तत्वही बाहेर पडतील.
चहा पावडर टाळा
चहा बनवताना चहा पावडर टाळा. कारण यात कॅफीन असतं, जे जास्त झाल्यावर पोटात जळजळ, गॅस, अॅसिडिटी, हायपरटेंशन, एंझायटी आणि झोपेसंबंधी समस्या निर्माण करू शकतं. याजागी काही हर्बल गोष्टींचा वापर करा, जसे की आलं, कॅमोमाइल, पुदिना, तुळशीची पानं, हिबिस्कस इत्यादी.
दूध टाळा
आता हे बऱ्याच लोकांना अजिबात रूचणार नाही. पण चहा पावडर आणि दुधाचं नातं चांगलं मानलं जात नाही. यानं पचनासंबंधी समस्या होतात. दूध तुम्ही थेट पिऊ शकता.
साखर टाळा
साखर खायला जरी गोड लागत असली तर आपल्या आरोग्यासाठी खूप घातक असते. साखरेमुळे लठ्ठपणा तर वाढतोच, सोबतच डायबिटीसचा धोकाही असतो. त्याऐवजी चहात मध टाका, दालचीनी टाकू शकता.
हर्बल टी पिण्याचे फायदे
हर्बल चहानं शरीराला अनेक फायदे मिळतात. याची टेस्ट नेहमीच्या चहापेक्षा वेगळी असते. पण यात गुणकारी तत्व भरपूर असतात. या चहानं पचन सुधारतं, वजन कमी होतं आणि इम्यूनिटीही वाढते.