फेब्रुवारी सुरू झाल्यावर मस्त मस्त स्ट्रॉबेरी बाजारात मिळतात. (3 amazing recipes made from strawberries, you may have never heard of the third one)पण नुसती स्ट्रॉबेरी खाण्यापेक्षा तिचा वापर करून छान पदार्थ तयार करण्यात जास्त मज्जा येते. या स्ट्रॉबेरी सिझनमध्ये हे तीन पदार्थ तयार करून बघा. नक्कीच आवडतील. घरी जर चिल्लर पार्टी असेल त्यांची तर मेजवानीच होऊन जाईल.
१. स्ट्रॉबेरी चीजकेकसाहित्य:(3 amazing recipes made from strawberries, you may have never heard of the third one)स्ट्रॉबेरी, दूध, साखर, बिस्किट, बटर, फ्रेश क्रिम, कंडेन्समिल्क कृती:१. दुधात थोडं लिंबू पिळा आणि दूध नासवून घ्या. त्यातील पाणी काढून टाका. आणि एका मिक्सरच्या भांड्यात त्याची स्मूथ पेस्ट होईपर्यंत ते फिरवा.२. मिक्सरमध्ये फिरवून बिस्किटांचा चुरा करुन घ्या. त्यात बटर वितळवून घाला. नीट मिक्स करुन घ्या. एका भांड्यात तळाची लेयर म्हणून बिस्किटांचा चुरा लावा.३. दुधाचं तयार केलेलं क्रिम , साखर, फ्रेश क्रिम, कंडेन्स मिल्क, थोड्याशा स्ट्रॉबेरीज घालून त्याची मस्त पेस्ट तयार करा. ४. ते मिश्रण बिस्किटांच्या चुऱ्यावर ओता. आणि एका कुकरमध्ये पंधरा मिनिटे वाफवून घ्या. ५.नंतर तासभरासाठी फ्रिजमध्ये ठेवा. वरतून स्ट्रॉबेरीचे तुकडे लावा.
२. स्ट्रॉबेरी मिल्कशेकसाहित्य: दूध, स्ट्रॉबेरी, व्हेनिला आयस्क्रिम
कृती:१. स्ट्रॉबेरीची देठं कापून घ्या. त्याचे तुकडे करून घ्या.२. एका मिक्सरच्या भांड्यात दोन स्कुप व्हेनिला आयस्क्रिम घ्या. त्यात अगदी थोडे दूध घाला. ३ . स्ट्रॉबेरीचे तुकडे घाला. आणि सगळं मिक्सरमधून फिरवून घ्या. तयार करायला जेवढं सोपं आहे तेवढंच चवीला भारी आहे.
३. स्ट्रॉबेरी मुझसाहित्य:स्ट्रॉबेरी, साखर, कॉर्नफ्लॉवर, विप्ट क्रिम
कृती:१. स्ट्रॉबेरीची देठं कापून घ्या. त्याचे तुकडे करा. मिक्सरमधून ते फिरवून घ्या.२. एका पॅनमध्ये ती पेस्ट घाला. आणि थोडी आटू द्या. नंतर त्यात साखर, कॉर्नफ्लॉवर घाला आणि अजून थोडावेळ आटवा. ते सतत ढवळत राहा. ३. आता गॅसवरुन काढा. थोडंसं गार झाल्यावर त्यात विप्ट क्रिम घाला. ते व्यवस्थित मिक्स करून घ्या. ४. मऊ झाल्यावर त्यात स्ट्रॉबेरीचे तुकडे घाला. आणि खा.