भारतीय पाककलेमध्ये अन्न वाया जाऊ देत नाहीत. प्रत्येक पदार्थाचा प्रत्येक भाग पूर्णपणे वापरायचा. मग डाळींचे पाणी कसे वाया जाऊ द्यायचे? ते तर प्रचंड पौष्टिक असते. (2 Ways Of Making Kattachi Amti See Recipe)धान्यांचे पाणी असेल किंवा मग डाळींचे पाणी ते फार पौष्टिक असते. अनेकदा आपण कडधान्ये शिजवून घेतल्यानंतर त्याच्या उरलेल्या पाण्यामध्ये मीठाचा खडा घालून ते पाणी पितो. अशा रेसिपी आपल्या पाकसंस्कृतीमध्ये बऱ्याच आहेत. (2 Ways Of Making Kattachi Amti See Recipe)
असाच एक पदार्थ म्हणजे कटाची आमटी. घरी गोडाचं म्हणून पुरण तयार केलं किंवा पुरणपोळीचा बेत असला की चणाडाळ शिजवल्यावर त्याचं पाणी काढून घ्यावं लागतं. नाही तर पुरण पातळ होतं. या चणाडाळीच्या पाण्याला कट असे म्हणतात. (2 Ways Of Making Kattachi Amti See Recipe)त्या कटाचा वापर करून आमटी तयार केली जाते. चवीला फारच मस्त लागते. पुरणपोळी केली की कटाची आमटी हवीच. कटाची आमटी दोन प्रकारे तयार करतात.
१. वाटण लावलेली कटाची आमटी
साहित्य
खोबरं, कांदा, हिरवी मिरची, लसूण, आलं, कडीपत्ता, कोथिंबीर, लाल तिखट, तूप, कट, चणाडाळ, खडे मसाले, हळद, मीठ
कृती
१. कढईमध्ये थोडं तूप घ्या. त्यामध्ये खोबरं, कांदा, हिरवी मिरची, लसूण, आलं, कडीपत्ता हे सगळे मस्त परतून घ्या. त्यामध्ये खडे मसाले घाला.
२. परतून झाल्यावर ते गार होऊ द्या. गार झाल्यावर ते मिक्सरमधून वाटून घ्या. आपलं वाटण तयार आहे.
३. कढईमध्ये तूप घ्या त्यामध्ये लाल तिखट घाला म्हणजे मस्त तवंग येतो. लाल तिखट करपण्याआधीच त्यामध्ये तयार वाटण घाला. हळद आणि मीठ घाला. सगळं जरा उकळून घ्या. त्यात शिजवलेली चणाडाळ अगदी चार चमचे मस्त मऊ करून मग घाला. कोथिंबीर घाला.
२. आंबट-गोड कटाची आमटी
साहित्य
कट, तूप, खडे मसाले, मोहरी, जिरं, कडीपत्ता, हळद, हिंग, गोडा मसाला, लाल तिखट, चिंच, गूळ, ओलं खोबरं, कोथिंबीर,मीठ
कृती
१. कढईमध्ये तूप घ्या त्यावर खडे मसाले परतून घ्या. त्यामध्ये मोहरी-जिरं अशी फोडणी तयार करा. मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये हिंग, मीठ, कडीपत्ता, हळद, गोडा मसाला, लाल तिखट घालून घ्या.(2 Ways Of Making Kattachi Amti See Recipe)
२. सगळं छान परतल्यावर त्यामध्ये ओलं खोबरं घाला आणि जरा परता. आता त्यामध्ये कट घाला. तो छान उकळू द्या. चिंचेचा कोळ तयार करून त्यात घाला. गूळ घाला.
३. गूळ विरघळल्यावर त्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरून घाला. आमटी मस्त उकळू द्या.