Lokmat Sakhi >Food > भातावर वाढा किंवा पोळीभाजीसारखी खा, कांदा आणि टोमॅटोच्या पाहा २ झणझणीत चटण्या

भातावर वाढा किंवा पोळीभाजीसारखी खा, कांदा आणि टोमॅटोच्या पाहा २ झणझणीत चटण्या

2 spicy chutneys -onion and tomato read, cook and enjoy : फस्टक्लास कांद्याची चटणी व टोमॅटोची चटणी. तयार करायला अगदीच सोपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2025 16:02 IST2025-02-20T16:01:39+5:302025-02-20T16:02:17+5:30

2 spicy chutneys -onion and tomato read, cook and enjoy : फस्टक्लास कांद्याची चटणी व टोमॅटोची चटणी. तयार करायला अगदीच सोपी.

2 spicy chutneys -onion and tomato read, cook and enjoy | भातावर वाढा किंवा पोळीभाजीसारखी खा, कांदा आणि टोमॅटोच्या पाहा २ झणझणीत चटण्या

भातावर वाढा किंवा पोळीभाजीसारखी खा, कांदा आणि टोमॅटोच्या पाहा २ झणझणीत चटण्या

आपण चटणी एखाद्या पदार्थाशी तोंडी लावण्यासाठी म्हणून वापरतो. पण तुम्हाला माहिती आहे का की अनेक ठिकाणी चटणी भाताशी लावून खातात? (2 spicy chutneys -onion and tomato read, cook and enjoy)चटणीचा वापर आमटीसारखा केला जातो. चटणी तयार  करण्याची पद्धतही थोडी वेगळी असते. पण चवीला फारच सुंदर लागते.

१. कांद्याची चटणी 

साहित्य (2 spicy chutneys -onion and tomato read, cook and enjoy)
काश्मीरी लाल मिरची, चणाडाळ, उडदाची डाळ, जीरं, मेथीचे दाणे, लसूण, कांदा, मीठ, चिंच, मोहरी, गूळ, कडीपत्ता, तेल, हिंग

कृती
१. एका भांड्यात काश्मीरी मिरची, चिंच, गूळ भिजवत ठेवा. 
२. कढईमध्ये तेल घ्या. त्यात चणाडाळ, जीरं, उडदाची डाळ, कांद्याचे तुकडे, लसूण सगळं छान परतून घ्या.
३. त्यात भिजवलेले काश्मीरी मिरची, गूळ व चिंचेचे मिश्रण टाका. सगळं छान परतून झालं की गार करत ठेवा. 
४. गार झालेले मिश्रण मिक्सर मधून फिरवून घ्या. सगळं छान एकजीव होईस्तोवर फिरवा.   
५. परत एकदा तेल तापवत ठेवा. त्यामध्ये कडीपत्ता घाला. मोहरी, मेथीचे दाणे, हिंग सगळ्याची फोडणी तयार करून घ्या. त्यामध्ये कांद्याची पेस्ट घाला. झाकून ठेवा. मस्त शिजू द्या.  

२. टोमॅटो चटणी
साहित्य
टोमॅटो, कांदा, लसूण, मोहरी, चिंच,  कडीपत्ता, तेल, लाल मिरची, धने, मीठ

कृती
१. एका कढईमध्ये थोडे तेल गरम करा. टोमॅटोचे तुकडे करून तेलावर उलटे ठेवा. त्यात लसणाच्या पाकळ्या घाला. त्यात लाल मिरची व चिंच घाला. झाकून ठेवा. टोमॅटोची सालं निघतील. ती काढून टाका. छान परतून झाल्यावर गार करत ठेवा. गार झाल्यावर मिक्सरमधून वाटून घ्या. 
२. कढईमध्ये छान कडीपत्याची फोडणी तयार करा. त्यात मोहरी, धने परतून घ्या.  त्यात टोमॅटोची पेस्ट घाला. चवीनुसार मीठ घाला. चटणीने तेल सोडले की, मग गरम- गरम चटणीचा आस्वाद घ्या. 

पोळीशी, भाताशी अशा चटण्या फार रूचकर लागतात. गरमागरम भातावर तुपाची धार सोडून त्याला चटणी लावून खाण्याची मज्जाच काही और आहे.  
 

Web Title: 2 spicy chutneys -onion and tomato read, cook and enjoy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.