Join us

घरीच झटपट पनीर करण्याची २ खास टिप, भेसळीचं पनीर विसरा-खा घरचे पौष्टिक पनीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2025 13:19 IST

2 special tips to make instant paneer at home, forget adulterated paneer - eat nutritious homemade paneer : घरी पनीर करणे एकदम सोपे आहे. करायला कमी कष्ट आणि पौष्टिक. विकतपेक्षा नक्कीच चांगले.

मध्यंतरी पनीरबद्दलच्या बातम्या पाहून पनीर खाण्याची भीती अनेकांच्या मनात बसली आहे. (2 special tips to make instant paneer at home, forget adulterated paneer - eat nutritious homemade paneer)चांगले पनीर ओळखायचे तरी असे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर मग घरीच करा की पनीर. एकदम सोपं असतं. फक्त जरा दूध जास्त वापरावे लागते एवढेच. जास्तीचे दूध घ्यायचे म्हणजे मस्त भरपूर पनीर लावता येते. 

घरीच पनीर तयार करणे ही एक सोपी पण थोडी काळजीपूर्वक करण्याची प्रक्रिया आहे. बाजारात मिळणाऱ्या पनीरच्या तुलनेत घरी केलेल पनीर अधिक ताजे तसेच आरोग्यदायी आणि चविष्ट असते. पनीर लावताना काही गोष्टीं लक्षात ठेवणे आवश्यक असते जेणेकरून पनीर मऊ आणि योग्य प्रमाणात घट्ट तयार होईल.

पनीरसाठी संपूर्ण फुलफॅट दूध वापरणं आवश्यक आहे. टेट्रापॅक किंवा टोन्ड दूध वापरल्यास पनीर फारसे मऊसर लागत नाही. दूध एका खोलगट पातेल्यात उकळायला ठेवायचे आणि सतत ढवळत राहायचे. म्हणजे दूध तळाला लागत नाही. दूध उकळल्यानंतर त्यात लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घालावा. हे करताना थोडं थोडं करून घालायचे एकाच वेळी पूर्ण रस टाकायचा नये. पद्धतशीर ढवळत राहा म्हणजे दूध फाटायला लागेल आणि त्यातून हिरवट रंगाचे पाणी आणि पांढऱ्या रंगाचा पनीरसारखा भाग वेगळा होईल.

दूध व्यवस्थित फाटल्यावर लगेच गॅस बंद करून तयार मिश्रण स्वच्छ कॉटनच्या फडक्यात ओतायचे. त्यात पनीर गोळा करून थोडं थंड पाणी सोडायचं. म्हणजे लिंबाचा किंवा व्हिनेगरचा आंबटपणा निघून जाईल. त्यानंतर हा कपडा घट्ट बांधून त्यावर वजन ठेवायचे. त्यासाठी वरवंटा जड डबा काहीही वापरु शकता. असे केल्याने अतिरिक्त पाणी निघून जाईल आणि पनीर घट्ट होईल. चांगला आकार येईल. वजन ठेवताना वेळेचं भान ठेवणं महत्त्वाचं आहे . जास्त वेळ ठेवल्यास पनीर खूपच कोरडे होईल. त्यामुळे तासभरच वजन ठेवायचे.

पनीर सेट झाल्यावर त्याला हव्या त्या आकारात कापता येते आणि विविध भाज्यांमध्ये वापरता येते. जर गरम गरम पनीरच खायचं असेल, तर त्याला फक्त थोडं मीठ आणि मिरीपूड घालूनही सुंदर चव येते. घरचे पनीर नेहमीच आरोग्यासाठी चांगले ठरते. पनीर घरी करा आणि बिनधास्त खा. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.