Join us

जेवढी साय पातेल्यात जमा केली तेवढंच तूप निघणार! भरपूर तूप निघण्यासाठी लक्षात ठेवा २ टिप्स 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2024 17:10 IST

Kitchen Tips For Making Maximum Ghee: पातेल्यात साय खूप असते पण तिचं तूप मात्र थोडंसंच निघतं, असं तुमच्याही बाबतीत होतं का?(how to get maximum ghee from cream?)

ठळक मुद्देया दोन टिप्स वापरल्या तर भरपूर प्रमाणात तूप जमा होईल. 

रोज घरात जे दूध येतं ते तापवून घ्यायचं, त्याची साय बाजुला काढून ठेवायची आणि मग साय साठवून त्यापासून आठ दिवसातून एकदा तूप तयार करायचं, असं अनेक जणी करतात. पण बऱ्याचदा असंही होतं की आपण पातेल्यात जमा केलेली साय तर भरपूर दिसते, पण त्या तुलनेत तूप मात्र खूपच कमी असतं. एवढी साय जमा केलेली असताना तूप मात्र एवढंसंच निघालं तर खूप अस्वस्थ होतं. म्हणूनच आता साठवून ठेवलेल्या सायीपासून भरपूर प्रमाणात कसं तूप काढायचं ते पाहा (2 easy tips for getting maximum ghee from cream).. यासाठी तुम्हाला दोन अगदी साध्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत.(how to get maximum ghee from cream?)

भरपूर तूप निघण्यासाठी २ सोप्या टिप्स

 

१. रोजच्या रोज आपण दुधावरची साय काढतो आणि ती एका पातेल्यात साठवून फ्रिजमध्ये ठेवत असतो. जेव्हा साय भरपूर प्रमाणात जमा होते तेव्हा आपण तिच्यामध्ये दही टाकून विरजन लावतो.

धक धक गर्ल माधुरी दीक्षितने सांगितलं तिचं फिटनेस सिक्रेट! ५७ वर्षांची असूनही एवढी सुंदर कशी... 

काही जणी फ्रिजमधली थंडगार साय बाहेर काढून लगेचच तिच्यात दही टाकतात. पण असं करू नका. फ्रिजमधून सायीचं पातेलं बाहेर काढल्यानंतर काही वेळ ते तसंच बाहेर राहू द्या. त्यानंतर सामान्य तापमानावर आल्यानंतर ते गॅसवर ठेवून साय हलकीशी कोमट करून घ्या. त्यानंतर तिच्यामध्ये दही घालून ती विरजण्यासाठी ठेवा.

 

२. ७ ते ८ तासांनी जेव्हा साय पुर्णपणे विरजली जाईल तेव्हा तिच्यामध्ये लगेचच थंड किंवा कोमट पाणी टाकू नका. रवी किंवा एखादा चमचा घेऊन ती साय तशीच हाताने फेटा. हाताने फेटताना ती एकाच दिशेने फिरवावी.

लग्नसराईसाठी शिवा जाळीदार नेट ब्लाऊज, १० सुंदर पॅटर्न, साध्याच साडीलाही मिळेल स्टायलिश लूक

एखादा मिनिट फिरवून झाल्यानंतर त्यामध्ये बर्फाचे काही तुकडे टाका आणि त्यानंतर पुन्हा साय रवीने फेटा. आणखी एखाद्या मिनिटाने त्यात फ्रिजमधलं थंडगार पाणी टाका. यानंतर जेव्हा तुम्ही फेटाल तेव्हा पुढच्या एखाद्या मिनिटांतच छान लोणी निघेल. लोणी वेगळं काढल्यानंतर त्यात पाणी टाकून ते धुवून घ्या आणि मग कढईमध्ये घालून गरम करायला ठेवा. या दोन टिप्स वापरल्या तर भरपूर प्रमाणात तूप जमा होईल. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.