Lokmat Sakhi >Fitness > आपण स्वत:च्या मनात डोकायला शिकवतो तो योग ! योगअभ्यासक मीरा हसबनीस सांगतात, योगामुळे बदलतं काय...

आपण स्वत:च्या मनात डोकायला शिकवतो तो योग ! योगअभ्यासक मीरा हसबनीस सांगतात, योगामुळे बदलतं काय...

International Yoga Day 2024 : योगदिन नुकताच साजरा झाला पण योगाभ्यास एकदिवसापुरता नाही तर आयुष्यभर करावा असा प्रवास आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2024 05:31 PM2024-06-22T17:31:59+5:302024-06-22T17:48:24+5:30

International Yoga Day 2024 : योगदिन नुकताच साजरा झाला पण योगाभ्यास एकदिवसापुरता नाही तर आयुष्यभर करावा असा प्रवास आहे.

Yoga - A Journey to your Own Inner Self international yoga day | आपण स्वत:च्या मनात डोकायला शिकवतो तो योग ! योगअभ्यासक मीरा हसबनीस सांगतात, योगामुळे बदलतं काय...

आपण स्वत:च्या मनात डोकायला शिकवतो तो योग ! योगअभ्यासक मीरा हसबनीस सांगतात, योगामुळे बदलतं काय...

प्रियांका निर्गुण - जाधव.

योग दिन नुकताच साजरा झाला. पण योगासनं ही काही एकदिवस करायची गोष्ट नाही. ती जीवनशैली आहे, मनाला आणि शरीराला तंदुरुस्त आणि निकोप ठेवण्यासाठी नियमित योगाभ्यास करायला हवा. योगाभ्यास शिकून तो निष्ठेनं करत राहिलेल्या आणि आता योग प्रशिक्षण देणाऱ्या अमेरिकास्थित योगअभ्यासक मीरा हसबनीस सांगतात योगाभ्यासामुळे मनासह शरीराला लागणाऱ्या शिस्तीचा प्रवास. लोकमत सखी डॉट कॉमने त्यांच्याशी गप्पा मारल्या. मीरा हसबनीस यांनी २०२१ मध्ये कोईंबतूर येथील वेलंगिरी पायथ्याशी वसलेल्या ' ईशा योगा सेंटर' मध्ये 'Classical Hatha Yoga Teacher Training Program' हा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्यानंतर त्यांचा योगाभ्यास प्रवास सुरु झाला.

१. तुमच्या दृष्टीने योगाचा खरा अर्थ काय ?

ईशा योगा सेंटर मधल्या कोर्स नंतर मला योगाचा खरा अर्थ समजायला सुरुवात झाली आहे असे मी म्हणेन. योग हे जगण्याचे एक संपूर्ण शास्त्र आहे, त्यामुळे त्याचा दैनंदिन आयुष्यात नियमित अंतर्भाव होणं आवश्यक आहे. योग आपल्या जीवनातील सर्व अंगांवर परिणाम करते, ज्यात शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक गोष्टींचा समावेश होतो. असा हा बहुगुणी योग जर मला समाजापर्यंत पोहचवायचा असेल तर सर्वात आधी मला माझ्यात बदल करणे गरजेचे वाटते. योग हा केवळ एक शारीरिक व्यायामाचा प्रकार नाही ती एक जाणीवपूर्वक अंगिकारिलेली जीवन शैली आहे, ज्याला शारीरिक आणि मानसिक स्वयंशिस्त ही अत्यावश्यक आहे. 
सध्याच्या आधुनिक यंत्र - तंत्रज्ञानाधिष्ठित धावपळीच्या जीवनात सुखसोईंची रेलचेल आहे पण स्वतःच्या शरीर - मनाच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे असे वाटते. योगाचा आपल्या आयुष्यात अंतर्भाव त्याकरिताच खूप महत्त्वाचा आहे. योगामुळे शरीरा - मनातील ऊर्जा संतुलित होण्यास मदत होते. शिवाय नियमित योग अवलंबला तर बर्यााच आजारापासून नुसतेच दूर राहू शकतो असे नाही तर आयुष्य अनेक अर्थांनी अधिक समृद्ध जगू शकतो. पण अर्थातच यासाठी नियमित योग आवश्यक आहे. 'ईशा फाऊंडेशन' संस्थेचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी योगाच्या प्राचीन विज्ञानाच्या माध्यमातून स्वतःचे परिवर्तन व सशक्तीकरणासाठी शक्तिशाली पद्धती संरचिल्या आहेत.  त्यामुळेच या संस्थेत योगाचे प्रशिक्षण घ्यायला जगभरातून लोक येतात. या संस्थेचं एक छोटसं ब्रीद आहे, 'इनर इंजिनिअरिंग' आणि हे ब्रीद मला फार आवडतं. 

२. योगामुळे स्वतः मध्ये काय बदल घडून आला ?

माझी ही तर कुठे सुरुवात आहे!! तरीही मी म्हणेन की जो काही थोडा योग माझ्या आयुष्यात आला आहे त्याने माझ्यात काही चांगले बदल घडून आले आहेत, येत आहेत. त्यातील सर्वात महत्वाचा मला वाटतो तो बदल म्हणजे मी स्वयंशिस्त पाळू लागली आहे. योग करण्याआधी मी फारशी शिस्तप्रिय नव्हते, पण आता खाण्यापिण्यात सात्विक आहारला पसंती, वागण्याबोलण्या मध्ये अधिक समंजसपणा आणि जागरण - निद्रा यात सुद्धा नियमितता आणि परिमितता येऊ लागली आहे. थोडक्यात सांगायचे तर आजकाल ज्याला क्वालिटी ऑफ लाइफ असे संबोधले जाते ते सुधारले आहे, सुधारते आहे.

३. योगा प्रशिक्षक म्हणून आजवर केलेली कामगिरी....

१५ ऑगस्ट २०२३ (भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त) ईशा फाऊंडेशनने भारतीय लष्कराच्या सदर्न कमांडच्या सहकार्याने तणाव व्यवस्थापन आणि एकूणच सैनिकांच्या आरोग्यासाठी योग कार्यक्रम सुरू केला. या सहयोगाद्वारे, कमांडच्या अधिपत्याखालील ९ राज्यांमध्ये २३ पेक्षा जास्त ठिकाणी १०,००० हून अधिक सेवारत सैनिकांसाठी योग प्रशिक्षकांद्वारे विनामूल्य आठवडाभर शास्त्रीय हठयोग कार्यक्रम आयोजित केले होते. तेव्हा पुण्यातील औंध व हडपसर येथे झालेल्या उपक्रमांमध्ये मी सक्रिय सहभाग घेतला.

४. आजच्या तरुण पिढीसाठी योगाभ्यासाचे काय महत्व वाटते ?

माझ्या तरुण मित्र-मैत्रिणींना मी इतकच म्हणेन की आपण आधुनिकातील आधुनिक तंत्रज्ञान- Outer Engineering शिकूयात पण त्याच्या झगमगाटाला भुलून जायला नको. आपल्या आयुष्यात Inner Engineering ला सुद्धा तेवढेच अनन्यसाधारण महत्व आहे. आणि हे स्वत:चा शोध घेणं अर्थात 'योग' ही सुद्धा एक तितकीच आव्हानात्मक, कष्टसाध्य पण आनंदी प्रक्रिया आहे, ज्याचा राजमार्ग अर्थातच आपलाच प्राचीन 'योग' आहे. Let Us Make It Happen!!

Web Title: Yoga - A Journey to your Own Inner Self international yoga day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.