Join us  

Winter health tips : 90 % लोकांना माहीत नसतं सकाळच्यावेळी नक्की ऊन कधी घ्यायचं? तज्ज्ञांनी सांगितली व्हिटॅमीन D साठी योग्य वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2021 11:53 AM

Winter health tips : सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवण्याचे अनेक फायदे आहेत. यापैकी एक म्हणजे व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्याचे काम करते. 

उन्हाळ्यात सूर्यप्रकाशाचा त्रास होत असला तरी हिवाळ्यात तो वरदानापेक्षा कमी नाही.  सूर्यापासून फक्त उष्णता मिळत नाही उलट यामुळे व्हिटॅमिन डीचाही पुरवठा होतो. चांगल्या तब्येतीसह आजारांपासून लांब राहण्यासाठी व्हिटॅमीन डी खूप महत्वाचं आहे. (Winter Care Tips ) आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार हिवाळ्यात सुर्यप्रकाश कधी घ्यायला हवा. व्हिटॅमीन डी कोणत्या वेळेला सगळ्यात चांगलं मिळू शकतं याबाबत एका वेबसाईटशी बोलताना अधिक माहिती दिली आहे.  (What time sunlight is good for health)

सकाळची वेळ- 

जर तुम्हाला सकाळी सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी घ्यायचं असेल तर तुम्ही ते सकाळी 8 वाजण्यापूर्वी 25 ते 30 मिनिटे घेऊ शकता. या वेळात तुम्हाला व्हिटॅमिन डी चांगले मिळेल.

संध्याकाळी

संध्याकाळी सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी मिळवायचे असेल तर सूर्यास्ताच्या वेळी मिळवू शकता.

सुर्यप्रकाशाचे फायदे

सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवण्याचे अनेक फायदे आहेत. यापैकी एक म्हणजे व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्याचे काम करते. याशिवाय शरीराला उर्जावान ठेवण्यातही ते महत्त्वाची भूमिका बजावते.

डायबिटीस कंट्रोलसाठी गुणकारी ठरतोय हा पदार्थ; ३५% घटते ब्लड शुगर, समोर आला रिसर्च

आपल्याला सूर्यप्रकाशापासून UVA मिळतो ज्यामुळे आपला रक्त प्रवाह सुधारतो. याशिवाय, ते रक्तातील ग्लुकोज पातळी आणि श्वसन दर देखील सुधारते. सूर्याच्या किरणांमध्ये सेरोटोनिन, मेलाटोनिन आणि डोपामाइन असतात. तुमच्या मानसिक आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे. याशिवाय जे लोक डिप्रेशन किंवा चिंताग्रस्त आहेत. त्यांनाही याचा फायदा होतो. 

चांगली झोप येत नसेल तर सूर्यप्रकाशात राहण्याचा फायदा होतो.  मेलाटोनिन नावाचा हार्मोन सूर्यप्रकाशातून मिळतो, जो तुमच्या झोपेसाठी जबाबदार असतो.

सूर्यप्रकाशामुळे तुम्हाला कोणते फायदे मिळू शकतात हे तुमच्या लक्षात आलंच असेल. पण लक्षात ठेवा की जास्त वेळ सूर्यप्रकाशात उभे राहू नये. असे केल्यानं नुकसानही होऊ शकते. 

व्हिटॅमीन डी मिळवण्यासाठी काय खायचं?

व्हिटॅमीनच्या कमतरेमुळे ताप येणं, थकवा येणं, हाडं आणि पाठीत वेदना, मानसिक ताण, केस गळणं, मासंपेशीचं वेदना, अशी लक्षणं जाणवतात. याशिवाय हद्याचे ठोके वाढणं अशा समस्या उद्भवतात. मशरुमचा आहारात समावेश केल्यामुळे व्हिटॅमीन डी स्तर व्यवस्थित राहतो. मशरूमच्या वेगवेगळ्या पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही व्हिटॅमीन डी मिळवू शकता.

हिवाळ्यात सर्दी खोकल्याचा त्रास जास्त जाणवतोय? 'या' घरगुती उपायांनी आजारांना ठेवा चार हात लांब

पनीर अनेकांना खायला खूप आवडतं. त्यात व्हिटॅमीन डी मोठ्या प्रमाणावर असते तर नियमीत पनीरचं सेवन केल्यास शरीरातील व्हिटामीन डी ची कमतराता भरून काढण्यास मदत होईल.

दुधापेक्षा दही पचण्यास हलके असते. दह्याच्या सेवनाने पचनाशी निगडीत समस्या दूर होऊन शरीरातील व्हिटॅमीन डी ची कमतरता पूर्ण होते.

सोयामिल्कच्या सेवनाने शरीला व्हिटॅमीन डी मिळतं. याशिवाय यात अनेक पोषक घटक असतात. सोयामिल्कमध्ये आयर्न, प्रोटीन्स मोठ्या प्रमाणावर असतात.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यथंडीत त्वचेची काळजी