Join us  

चाळीशीनंतर महिलांचं वजन का वाढतं? वय वाढलं की वजन वाढतंच का? तज्ज्ञ सांगतात, एक उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2023 5:18 PM

Why do women put on weight in their 40s? चाळीशीनंतर कधी पोट सुटते, तर कधी वजन वाढते, वजन वाढू नये म्हणून काय करायचं?

वाढत्या वयानुसार शरीरात अनेक बदल घडतात. शरीराला पौष्टीक घटक व चांगल्या आहाराची आवश्यकता असते. खराब जीवनशैली व योग्य आहाराचे सेवन न केल्यामुळे आरोग्यावर हानिकारक परिणाम घडतात. वयाच्या चाळीशीनंतर महिलांच्या शरीरात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता भासू लगाते. वृद्धापकाळात फिट राहण्यासाठी व्यायाम आणि चांगला आहार हाच एकमेव मंत्र आहे. हार्मोन्सच्या बदलांमुळे शरीरात अनेक बदल घडतात. चाळीशीनंतर मुख्यतः महिलांचे वजन वाढते. आपले चयापचय खूप मंद होते. ऊर्जा कमी होते आणि गोड खाण्याची जास्त इच्छा होते.

मिस इंडिया स्पर्धकांना प्रशिक्षण देणाऱ्या एक्सपर्ट डायटीशियन अंजली मुखर्जी यांनी इंस्टाग्रामवर, यासंदर्भात माहिती शेअर केली आहे. वयाच्या चाळीशीनंतर वजन का वाढते? वजन वाढले तर तंदुरुस्त कसे राहता येईल? चाळीशीनंतर डाएटमध्ये कोणते बदल आणायचे? याबाबतीत त्यांनी माहिती दिली आहे(Why do women put on weight in their 40s?).

एजिंग प्रोसेस स्लो करता येते का?

अंजली यांच्या मते, ''वृद्धापकाळात आपल्या शरीरात अनेक बदल होतात, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण ते कमी करू शकत नाही. मुख्य म्हणजे व्यायाम, पोषण व फिटनेसवर आपण लक्ष द्यायला हवे. हे काम योग्य वेळेस सुरु केल्यास भविष्यात जास्त त्रास होणार नाही. मुख्य म्हणजे शरीराची लवचिकता आणि संतुलन राखणे गरजेचं आहे.''

महिलांचे वजन का वाढते?

महिलांना चाळीशीनंतर वजन वाढण्याची समस्या जास्त जाणवते. हे त्यांच्या चयापचयमुळे होते. यासह, प्री-मेनोपॉझल कालावधी सुरू होतो. ज्यामुळे शरीरात बरेच हार्मोनल बदल होतात. अशा वेळी डिप्रेशन व शरीराची हालचाल कमी होते. चाळीशीनंतर कॅलरी बर्निंग कमी होते.

ज्या महिला नियमित व्यायाम करतात, त्यांना देखील वजन वाढीची समस्या छळते. विशेषतः पोटाची चरबी वाढते. या दरम्यान BMR (बेसिक मेटाबॉलिक रेट) 6% पर्यंत कमी होतो. या कारणांमुळे वजन तर वाढतेच, पण नॉर्मल वजन देखील सहजासहजी कमी होत नाही. या वयानंतर फिटनेसकडे अधिक लक्ष द्यावे लागते.

चमचाभर ओवा आणि ग्लासभर पाणी, अपचनापासून पोटावर वाढलेल्या चरबीपर्यंत सगळ्यांवर गुणकारी उपाय

चाळीशीत डाएट कसे असावे?

अंजली यांच्या मते, ''डाएटच्या माध्यमातून व योग्य आहाराचे सेवन करून आपण वजन नियंत्रणात आणू शकता. यासाठी आहारात कमी चरबीयुक्त पदार्थांचा समावेश करा. यासह उच्च फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा. आपल्या आहारात विविध धान्य, मसूर, बीन्स, फळे, भाज्या, नट्स यांचा समावेश करा. या प्रकारच्या आहाराने शरीराला फायबर, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, खनिजे हे सर्व महत्त्वपूर्ण पौष्टीक घटक मिळतील.

चाळीशीत शरीराला कॅल्शियम हवेच

यासंदर्भात अंजली सांगतात, ''कॅल्शियमचे सेवन योग्य प्रमाणात केल्यास हाडांची झीज होण्याची प्रक्रिया कमी होते. यासाठी आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा. यासह काळे तीळ व सोयाबीन नियमित खात राहा.

काटेकोर डाएट व व्यायाम करूनही वजन कमी होत नाही? ५ चुका टाळा, तरच घटेल वजन..

शरीर हायड्रेट ठेवा

आहारात साधे पाणी, सूप, मसूर आणि नारळ पाणी यांचा समावेश करा. शरीर डीहायड्रेट झाल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकते.

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्स