Lokmat Sakhi >Fitness > हिवाळ्यात काही लोकांचं वजन का वाढतं? जाणून घ्या कारणे आणि उपाय!

हिवाळ्यात काही लोकांचं वजन का वाढतं? जाणून घ्या कारणे आणि उपाय!

Weight Loss : थंडीच्या दिवसात बऱ्याच लोकांचं वजन वाढतं. अशात या दिवसात वजन वाढण्याची कारणं आणि त्यावर उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 13:42 IST2024-12-16T13:42:12+5:302024-12-16T13:42:41+5:30

Weight Loss : थंडीच्या दिवसात बऱ्याच लोकांचं वजन वाढतं. अशात या दिवसात वजन वाढण्याची कारणं आणि त्यावर उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Why do people gain weight in winter know the reasons and way to loose weight | हिवाळ्यात काही लोकांचं वजन का वाढतं? जाणून घ्या कारणे आणि उपाय!

हिवाळ्यात काही लोकांचं वजन का वाढतं? जाणून घ्या कारणे आणि उपाय!

Weight Loss : हिवाळ्यात कोरडे आणि थंड वारे वाहतात. ज्यामुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढतात. हा ऋतु संपता संपता जास्तीत जास्त लोक एका कॉमन समस्येने वैतागतात ती म्हणजे वजन वाढणं. या दिवसात बऱ्याच लोकांचं वजन वाढतं. अशात या दिवसात वजन वाढण्याची कारणं आणि त्यावर उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

हिवाळ्यात का वाढतं वजन?

कमी हालचाल

हिवाळ्यात वजन वाढण्याचं एक मुख्य कारण म्हणजे शरीराची हालचाल कमी करणे. थंडीमुळे बरेच लोक ब्लॅंकेटमधून किंवा घरातून बाहेर पडण्यास टाळाटाळ करतात. बरेच लोक जिमलाही जात नाही आणि घरीही एक्सरसाईज करत नाहीत. अशात शरीराची हालचाल जास्त होत नसेल तर या दिवसांमध्ये वजन वाढू लागतं.

दिवस लहान असणे

हिवाळ्यात दिवस लहान असतात आणि कामाहून घरी येता येता अंधार पडतो. सकाळी थंडी असते त्यामुळे लोक कमी फिरतात किंवा एक्सरसाईज करतात. त्यामुळे वजन नियंत्रित राहत नाही.

सीजनल अफेक्टिव डिसऑर्डर

जर तुम्हाला हिवाळ्यात दु:खी वाटत असेल, मूड स्विंग्स जास्त होत असेल आणि एनर्जी लेव्हल नेहमीच डाऊन राहत असेल तर याचं कारण सीजनल अफेक्टिव डिसऑर्डर (SAD) असू शकतं. जे लोक या समस्येने ग्रस्त असतात त्यांना बाहेर जाणे किंवा एक्सरसाईज करण्याचं मन होत नाही, तसेच उन्ह कमी असणंही याचं कारण ठरते.

गरम आणि कंफर्टिंग फूड्स जास्त खाणं

हिवाळ्यात थंडी इतकी असते की, व्यक्ती जे काही गरम वाटेल आणि आवडेल ते खातात. दिवसातून ४ ते ५ कप चहा पिणे, गाजराचा हलवा खाणे, गरम समोसे किंवा कुकीज-चॉकलेट भरपूर खाल्ली जातात. पण हे फूड्स वजन वाढवण्याचं काम करतात. 

कसं कमी कराल वजन?

- या दिवसांमध्ये वजन कमी करण्यासाठी सीजनल अफेक्टिव डिसऑर्डरला दूर ठेवण्याची गरज आहे. यासाठी या दिवसात भरपूर उन्ह घ्या.

- आपल्या डाएटवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा. दिवसातून ३ ते ४ वेळा चहा पिण्याऐवजी हर्बल टी चं सेवन करा. त्याशिवाय गरम पाणी प्या आणि आहारात ताजी फळं, भाज्या, कडधान्य आणि डाळींचा समावेश करा. वेगवेगळ्या हेल्दी सूपचं सेवनही करू शकता. 

- जंक फूड्स, प्रोसेस्ड फूड आणि तेलकट फूड्सचं सेवन पूर्णपणे टाळा. घरी तयार केलेलं जेवण किंवा पदार्थ खाण्यावर जास्त भर द्या. 

- थंडीमुळे बाहेर जात नसाल तर घरातच काही वेळ एक्सरसाईज करण्याचा प्रयत्न करा. हवं तर अर्धा किंवा एक तास वॉक करू शकता. त्यासोबतच डान्सही करू शकता. 

Web Title: Why do people gain weight in winter know the reasons and way to loose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.