Lokmat Sakhi >Fitness > दिवसभरात कधी वजन केलं तर वजनकाटा दाखवतो अचूक वजन? सतत कमी जास्त वजनाचा घोळ टाळा...

दिवसभरात कधी वजन केलं तर वजनकाटा दाखवतो अचूक वजन? सतत कमी जास्त वजनाचा घोळ टाळा...

What Is Right Time & Way To Check Weight During Weight Loss Journey : The Best Time To Weigh Yourself : 5 worst times to check your weight : वजन काट्यावर उभे राहून वजन तपासण्याची एक विशिष्ट वेळ आणि पद्धत असते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2025 15:40 IST2025-05-08T14:00:09+5:302025-05-08T15:40:45+5:30

What Is Right Time & Way To Check Weight During Weight Loss Journey : The Best Time To Weigh Yourself : 5 worst times to check your weight : वजन काट्यावर उभे राहून वजन तपासण्याची एक विशिष्ट वेळ आणि पद्धत असते...

What Is Right Time & Way To Check Weight During Weight Loss Journey The Best Time To Weigh Yourself | दिवसभरात कधी वजन केलं तर वजनकाटा दाखवतो अचूक वजन? सतत कमी जास्त वजनाचा घोळ टाळा...

दिवसभरात कधी वजन केलं तर वजनकाटा दाखवतो अचूक वजन? सतत कमी जास्त वजनाचा घोळ टाळा...

बदलत्या काळानुसार आजकाल प्रत्येकजण आपल्या फिटनेसची अधिकाधिक काळजी घेतात. फिटनेसची काळजी घेताना आपल्यापैकी अनेकजण वाढलेलं वजन कमी करण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतात. वेटलॉस (The Best Time To Weigh Yourself ) करताना बहुतेकजण स्वतःसाठी अमुक एक टार्गेट सेट करूनच ठेवतात, अमुक इतक्या महिन्यांमध्ये माझं किमान अमुक इतके किलो वजन कमी झालंच पाहिजे, असं टार्गेट सेट करून ठेवतात(What Is Right Time & Way To Check Weight During Weight Loss Journey).

यासाठीच, वेटलॉस करताना अनेकजण आपल्या वजनाचे ट्रेकिंग ठेवण्यासाठी वारंवार वजन तपासायला वजन काट्यावर उभे राहतात.परंतु असं कुठल्याही वेळेला किंवा कधीही वजन तपासून आपल्याला वजनाचा योग्य आणि अचूक आकडा मिळतच नाही. वजन काट्यावर उभे राहून वजन तपासण्याची एक विशिष्ट वेळ आणि पद्धत असते, हे बहुतेकजणांना माहीतच नसते. आपल्याला वजनाचा योग्य आणि अचूक आकडा मिळण्यासाठी वजन नेमकं केव्हा आणि कसं तपासावं ते पाहूयात(5 worst times to check your weight).

वजन तपासण्याची योग्य वेळ आणि पद्धत... 

वजन तपासण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती याबद्दल, फॅट लॉस कोच आणि सोशल मिडिया इन्फ्लुएंजर महताब एकाय हिने अधिक माहिती तिच्या fitbymahtab या इंस्टाग्राम अकाउंटवरून दिली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, जर वजन योग्य वेळी मोजले नाही तर मशीनवरील रीडिंग चुकीचे येऊ शकते. यामुळे, तुम्ही तुमच्या वेटलॉस जर्नीचा नेमका अंदाज लावू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, वजन तपासताना चुकूनही करू नये अशा ५ गोष्टी जाणून घेऊया.

मलायका अरोराच्या परफेक्ट फिगरचे सीक्रेट, सकाळी 'हा' कपभर चहा पिते रोज...

खा चमचाभर 'ही' घरगुती आयुर्वेदिक पावडर ! पोटाची ढेरी - मांड्यांचा घेर होईल कमी - सोपा पण असरदार उपाय...

१. जेवणानंतर, खाल्ल्यानंतर लगेच वजन तपासणे :- फिटनेस कोचच्या मते, जेव्हा आपण जेवल्यानंतर किंवा पाणी प्यायल्यानंतर लगेचच वजन मोजतो तेव्हा मशीनवर दाखवलेला आकडा तुमचे खरे वजन नसून तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे प्रमाण असते. यामुळे तुम्हाला असे वाटू शकते की तुमचे वजन अचानक वाढले आहे.

२. जास्त मीठ खाल्ल्यानंतर :- जर तुम्ही आदल्या दिवशी जास्त मीठ खाल्ले असेल तर शरीरात पाणी साचून राहू शकते, ज्यामुळे वजन वाढू शकते. अशा परिस्थितीत, मीठ खाल्ल्यानंतरही तुमचे वजन मोजणे टाळा. 

३. एक्सरसाइज केल्यानंतर :- व्यायामानंतर, शरीरात सूज येण्याची आणि पाणी साचण्याची शक्यता अधिक असते, ज्यामुळे वजन थोडे वाढलेले देखील दिसू शकते. एक्सरसाइज केल्यानंतर लगेच तुमचे वजन तपासणे टाळा.

४. मासिक पाळी दरम्यान :- मासिक पाळीच्या दरम्यान, महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे शरीराला सूज येते आणि पाणी साचते. याचा वजनावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत, मासिक पाळी दरम्यान वजन मोजल्याने चुकीचे रीडिंग मिळू शकते.

५. रात्री झोपण्यापूर्वी :- या सर्वांव्यतिरिक्त, खाण्यापिण्याने आणि दिवसभर अ‍ॅक्टिव्ह राहिल्याने, रात्री शरीराचे वजन नैसर्गिकरित्या वाढते. म्हणून, रात्री वजन मोजणे देखील चुकीचे आहे. 

मग वजन मोजण्याची योग्य वेळ नेमकी कोणती ? 

 फॅट लॉस कोच आणि सोशल मिडिया इन्फ्लुएंजर महताब एकाय हिने सांगितल्याप्रमाणे, सकाळी उठल्यानंतर, शौचाश जाऊन आल्यानंतर आणि काहीही खाण्यापिण्यापूर्वी तुमचे वजन मोजण्यासाठीची उत्तम वेळ आहे. दिवसांतील या वेळी वजन मोजल्यास तुम्हाला तुमच्या वजनाचा योग्य आकडा मिळण्यास मदत होते.


Web Title: What Is Right Time & Way To Check Weight During Weight Loss Journey The Best Time To Weigh Yourself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.