हल्लीची जीवनपद्धती खूप घाईघाईची झाली आहे. निवांत बसून थोडं थांबायला आज कुणाकडेच वेळ नाही. प्रत्येकाला आपापल्या मार्गावर पळण्याची घाई आहे. त्यामुळे दिवस सुरू होण्यापासून ते तो संपेपर्यंत सगळंच कसं घड्याळ्याच्या काट्यावर सुरू असतं. अशामध्येच १०- १२ तासांचं ऑफिस करून आल्यानंतर ना कोणामध्ये व्यायाम करण्याचा स्टॅमिना असतो ना तेवढा वेळ मिळतो. म्हणूनच अशा नव्या पिढीसाठी झटपट व्यायाम करण्याचा एक्सरसाईज स्नॅक्स हा पर्याय नक्कीच उपयुक्त ठरू शकतो (what is exercise snacks?). यामुळे तुम्ही फिट तर राहाताच पण वजन कमी होण्यासाठीही मदत होते.(simple and easy way for weight loss)
एक्सरसाईज स्नॅक्स म्हणजे काय?
आपल्याला माहितीच आहे की स्नॅक्स म्हणजे काहीतरी थोडंसं खाणं. जे आपल्याला पटकन तोंडात टाकता येईल आणि पोटासाठीही ते पुरेसं ठरेल. तसंच काहीसं एक्सरसाईज स्नॅक्सचं आहे.
दुप्पट फुगून कापसासारखा मऊ होणारा गुजरात स्पेशल खमण ढोकळा! रेसिपी एकदा ट्राय करून पाहाच..
एक्सरसाईज स्नॅक्स म्हणजे दिवसभरातून जेव्हा काही मिनिटांचा वेळ मिळेल तेव्हा असे काही छोटे छोटे व्यायाम करायचे जे तुम्हाला निरोगी, फिट ठेवण्यासाठी तसेच वेटलॉस होण्यासाठी मत करतील. या व्यायामांसाठी अगदी १ ते ५ मिनिटांचा वेळही पुरेसा ठरतो. शिवाय कोणतीही सेटींग न करता, कोणत्याही उपकरणाची मदत न घेता अगदी सोप्या पद्धतीने हे व्यायाम करता येतात.
पायऱ्या चढणे किंवा उतरणे, उभ्या उभ्या जॉगिंग किंवा रनिंग केल्याप्रमाणे पायाची हालचाल करणे,
छोट्याशा कुंडीतही उगवतील भरपूर सिमला मिरची! बघा सिमला मिरचीचं रोप वाढविण्याची सोपी पद्धत
एखादा मिनिट उभं राहून वृक्षासन, ताडासन करणे किंवा बॉडी स्ट्रेच होईल अशा पद्धतीने व्यायाम करणे, स्क्वॅट्स करणे, मानेचे व्यायाम करणे, दोन्ही हात हलवणे असे काही व्यायाम तुम्ही एक्सरसाईज स्नॅक्स अंतर्गत करू शकता. शरीर ॲक्टीव्ह ठेवण्यास या व्यायामांची नक्कीच मदत होते.
