Join us  

बसल्याबसल्या वजन कमी करण्याचा साेपा उपाय, अग्नी मुद्रा करा- मिळतील ३ जबरदस्त फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2024 9:10 AM

Weight Loss Without Doing Exercise: वजन कमी करण्यासाठी अग्नी मुद्रा अतिशय उपयुक्त ठरते. बघा कशी आणि केव्हा करावी अग्नी मुद्रा...(how to do agni mudra or surya mudra)

ठळक मुद्देही मुद्रा केल्याने शरीरात उर्जा प्रवाहित होण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी होण्यासह शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात. 

वाढते वजन ही समस्या हल्ली अनेकांना छळते. कारण आपल्या सगळ्यांचीच जीवनशैली खूप बदलली आहे. दिवसांतला अधिकाधिक वेळ आपण बसून काम करतो. त्यामुळे शारिरीक हालचाली अतिशय कमी झालेल्या आहेत. काही जणांना त्यांच्या व्यस्त रुटीनमुळे व्यायामासाठी वेळ काढणे अजिबात शक्य होत नाही. शिवाय जेवणातही मैद्याचे पदार्थ, जंकफूड यांचे प्रमाण खूप वाढलेले आहे. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही (Weight loss without doing exercise). याचा परिणाम तब्येतीवर होतो. काही जणांचे वजन वाढते तर काहींना अपचन, ॲसिडिटी असा त्रास नेहमीच होतो. हे सगळे त्रास कमी करायचे असतील तर सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी योग मुद्रा (how to do agni mudra or surya mudra) करण्याचा एक सोपा उपाय सांगितला आहे.(yog mudra that helps for reducing weight)

 

वजन कमी करण्यासाठी योगमुद्रा

अंशुका परवानी यांनी वजन कमी करण्यासाठी सुर्य मुद्रा किंवा अग्नी मुद्रा करण्याचा सल्ला दिला आहे. ही मुद्रा केल्याने शरीरात उर्जा प्रवाहित होण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी होण्यासह शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात. 

केळीच्या सालींसोबत रोपांना द्या १ खास पदार्थ, टपोऱ्या फुलांनी बहरून जाईल बाग 

सुर्य मुद्रा किंवा अग्नी मुद्रा नियमितपणे केल्याने चयापचय क्रियेचा वेग वाढतो. यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगले होते. पचन चांगले झाले की आपोआपच वजन वाढीवर नियंत्रण मिळवता येते.

बऱ्याचदा शरीरावर सूज येऊन स्थुलता वाढते. हा त्रास कमी करण्यासाठी सुर्य मुद्रा उपयोगी ठरते.

दृष्टी वाढण्यासाठी देखील सुर्यमुद्रा फायदेशीर ठरते. 

थायरॉईड ग्रंथीचे काम अधिक चांगले होण्यासाठी या मुद्रेचा उपयोग होतो. 

 

अग्नी मुद्रा किंवा सुर्य मुद्रा कशी करावी?

अग्नी मुद्रा किंवा सुर्य मुद्रा करण्यासाठी सगळ्यात आधी ताठ बसा. 

पद्मासन, वज्रासन किंवा मांडी घालून बसा.

वजन कमी होतच नाही? ६ पदार्थ नियमित खा- वजनाचा काटा झरझर खाली येईल

यानंतर दोन्ही हातांच्या अनामिका म्हणजेच रिंग फिंगर खाली दूमडून घ्या आणि त्यावर अंगठ्याने हलकासा दाब द्या.

सकाळ- संध्याकाळ दोन्ही वेळेस १५ मिनिटांसाठी करा. तुमचं रोजचं वर्कआऊट झाल्यानंतर १५ मिनिटे सुर्यमुद्रा करून शांत बसले तरी चालेल. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सव्यायामयोगासने प्रकार व फायदे