वाढत्या वजनाच्य समस्येमुळे सध्या खूप जण हैराण झालेले आहेत. वजन कमी करण्यासाठी अनेक जण हेवी वर्कआऊट करण्याचा पर्याय निवडतात. पण सगळ्यांनाच ते शक्य होत नाही. काही जणांना खूप वेळ व्यायाम करण्यासाठी खरंच वेळ नसतो. तर काही जणांना व्यायाम करण्याचा खूप कंटाळा येतो. असं काही तुमच्या बाबतीत असेल आणि तुम्हाला वजन मात्र कमी करायचं असेल तर डॉक्टरांनी दिलेला एक खास सल्ला वाचायलाच हवा (how to reduce weight?).. हेवी वर्कआऊट करूनही ज्यांचं वजन कमी होत नाही, अशा मंडळींना व्यायाम जरा कमी करा असा एक वेगळाच सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे (Weight Loss Tips by Avoiding Heavy Workout). त्याने नेमकं काय होतं तसेच व्यायाम कमी करण्याचा आणि वजन उतरण्याचा नेमका काय संबंध ते पाहूया..(weight loss tips for every woman)
वजन कमी करायचं तर व्यायाम करू नका...
वजन कमी होण्याचा आणि व्यायाम कमी करण्याचा काय संबंध याविषयी माहिती देणारा व्हिडिओ डॉक्टरांनी drmalharganla या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये तज्ज्ञ असं सांगत आहेत की बहुतांश महिलांच्या बाबतीत असं होतं की त्या खूप जास्त व्यायाम करतात.
जेवण करताच ९० टक्के लोक ५ चुका करतात म्हणून आजारी पडतात- तुम्हीही त्यापैकीच आहात का?
व्यायाम जास्त केल्याने मग भूकही खूप लागते. भुकेच्या नादात मग गरजेपेक्षा जास्त पदार्थ खाल्ले जातात. ते खाताना आपण नेमकं किती कॅलरी पोटात घालत आहाेत, याकडे लक्ष नसतं. यामुळे मग वजन वाढतं. त्यामुळे खूप जास्त व्यायाम करण्याचा अशा पद्धतीने नकारात्मक परिणामही आपल्या वजनावर होऊ शकतो. त्यामुळे योग्य प्रमाणातच व्यायाम करा पण पुढे सांगितलेल्या काही गोष्टी करून पाहा असा सल्ला ते देत आहेत.
वजन कमी करण्यासाठी...
१. वजन कमी करण्यासाठी हेवी वर्कआऊट करण्यापेक्षा फास्टिंग करण्यावर डॉक्टरांचा भर आहे. फास्टिंग केल्यामुळे शरीरातल्या जास्तीच्या साठून असलेल्या कॅलरी बर्नआऊट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे सुरुवातीला इंचेस लॉस होतो.
Gardening: बेकिंग सोड्याचे ५ खास उपयोग- फुलांनी गच्चं भरून जातील रोपं, होतील हिरवीगार
त्यामुळे जेवण थोडं कमी करा. किंवा दोन जेवणामध्ये गॅप ठेवा आणि मधल्या वेळेत काहीही खाणं, पिणं टाळा. कार्बाहायड्रेट्स, आणि फॅट्स कमी खा. यामुळे आपोआपच तुमच्या शरीरातल्या जास्तीच्या कॅलरी वापरल्या जातील. शरीराला योग्य प्रमाणात खाण्याची सवय लागेल. त्यामुळे हळूहळू भूकही नैसर्गिकपणे कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होईल.