सध्याच्या धावपळीच्या जीवनात व्यायामासाठी किंवा चालण्यासाठी वेगळा वेळ काढणे अनेकांना कठीण जाते. ऑफिसचे काम, घरातील जबाबदाऱ्या आणि सतत स्क्रीनसमोर बसण्याची सवय यामुळे शरीराची हालचाल कमी होत जाते. मात्र फिट राहण्यासाठी तासन्तास जिममध्ये जाण्याचा किंवा इतर कोणही कृती करण्याचा वेळ मिळत नसेल तर चालणे हा उत्तम पर्याय आहे. (Walking target for women : loss weight and feel happy, stay fit by walking, do these changes in your routine )रोजच्या छोट्या सवयी बदलूनही स्टेप्स काऊंट सहज वाढवता येतो आणि शरीर अधिक सक्रिय ठेवता येते.
लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करण्याची सवय लावा. सुरुवातीला काही मजले जरी चालत गेले तरी शरीराची हालचाल वाढते आणि हळूहळू स्टॅमिना सुधारतो. फोनवर बोलताना एकाच जागी बसून न राहता चालत बोलण्याचा प्रयत्न करा. ऑफिसमध्ये किंवा घरात फिरत बोलल्याने नकळत अनेक पावले पूर्ण होतात. घरातील छोटी कामे स्वतः करा. पाणी आणणे, वस्तू जागेवर ठेवणे, झाडांना पाणी घालणे किंवा साफसफाई करणे यामुळे शरीर सक्रिय राहते. जवळच्या दुकानात जाताना वाहनाचा वापर टाळून चालत जाण्याचा प्रयत्न करा. रोजची अशी छोटी चालदेखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. ऑफिसमध्ये सतत खुर्चीवर बसून राहू नका. दर तासाला काही मिनिटे उठून चालावे. यामुळे शरीराला हालचाल मिळते आणि थकवाही कमी होतो.
टीव्ही पाहताना जाहिराती सुरू झाल्या की थोडे चालणे किंवा हलके स्ट्रेचिंग करणे फायदेशीर ठरते. यामुळे बसून राहण्याचा वेळ कमी होतो. मोबाईलमध्ये स्टेप्स काऊंट मोजणारे अॅप वापरल्यास स्वतःची प्रगती लक्षात येते. रोज थोडे अधिक चालण्याचा उत्साहही वाढतो. मुलांसोबत खेळणे, पाळीव प्राण्यासोबत फिरायला जाणे किंवा संध्याकाळी कुटुंबासोबत थोडा फेरफटका मारणे हे ही स्टेप्स वाढवण्याचे सोपे मार्ग आहेत.
फिट राहण्यासाठी नेहमी वेगळा वेळच काढावा लागतो असे नाही. दैनंदिन जीवनात थोडी अधिक हालचाल करण्याची सवय लावली तर शरीर निरोगी राहते, वजन नियंत्रणात राहते आणि मनही अधिक ताजेतवाने वाटते. ऑफीसला जाताना किंवा परत येताना २० मिनिटे आधी निघा आणि रिक्षा किंवा गाडीऐवजी चालत जाण्याचा प्रयत्न करा. सगळं सामान ऑनलाइन मागवण्याऐवजी दूध , भाजी आणायला बाजारात जा. त्या चालण्याचाही फार फायदा होतो. रोजच्या काही सामान्य सवयी बदला आणि चालण्याची क्रिया वाढवा.
Web Summary : Incorporate small changes like using stairs, walking while talking, and doing chores to increase daily steps. Walk to nearby shops, take breaks at work, and engage in fun activities to stay active and healthy. Small efforts lead to a healthier lifestyle.
Web Summary : सीढ़ियाँ चढ़ना, बात करते हुए चलना और घर के काम करके रोज़ाना स्टेप्स बढ़ाएँ। पास की दुकानों तक पैदल जाएँ, काम पर ब्रेक लें और सक्रिय रहने के लिए मज़ेदार गतिविधियों में शामिल हों। छोटे प्रयास स्वस्थ जीवनशैली की ओर ले जाते हैं।