बॉलीवूड अभिनेत्री विद्या माळवदे ही फिगर आणि फिटनेसच्या बाबतीत मलायका अरोरा, शिल्पा शेट्टी यांच्यासारख्या फिटनेस फ्रिक अभिनेत्रींच्या अगदी तोडीस तोड आहे. विद्याचे काही लेटेस्ट फोटो पाहिले तर तिच्या वयाचा अंदाज कोणालाही लावता येणार नाही. ती आता तब्बल ५१ वर्षांची आहे. पण तरीही तिने ज्या पद्धतीने स्वत:ची फिगर आणि फिटनेस जपलेलं आहे ते खरोखरच कमाल आहे. फिट राहण्यासाठी ती नियमितपणे व्यायाम करते हे तर आपल्याला माहितीच आहे. पण इतरही काही गोष्टी ती आवर्जून करते ज्या वजन कमी होण्यासाठी निश्चितच मदत करतात. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या याची माहिती तिने स्वत:च सोशल मीडियावर शेअर केली आहे.(Weight Loss Tips By Vidya Malvade)
विद्या माळवदे सांगते वेटलॉस न होण्याचं मुख्य कारण
विद्याने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ती सांगते की जेव्हा तुमच्या शरीरातलं कॉर्टिसॉल हार्मोनचं प्रमाण वाढतं तेव्हा तुमच्या शरीरावर सूज येते.
हार्मोन्स संतुलित राहण्यासाठी उपाय- 'या' पद्धतीने केलेला जिरा फ्राईड राईस खा, कित्येक त्रास संपतील
कॉर्टिसॉलमध्ये शरीरातल्या इन्सुलिनची पातळीही बिघडते. यामुळे मग आपोआपच लठ्ठपणा येतो. हे टाळायचं असेल तर नियमितपणे व्यायाम तर कराच पण कॉर्टिसॉलची पातळी वाढू नये यासाठी काही गोष्टी आवर्जून करा. ती देखील त्यासाठी ३ उपाय अगदी रोजच करते. ते कोणते ते पाहा..
१. विद्या म्हणते की जेव्हा ती खूप गोंधळलेली असते, डिस्टर्ब असते, कोणत्याही गोष्टीचा मनावर खूप ताण आलेला असतो तेव्हा ती काही तरी गुणगुणायला सुरुवात करते. अगदी दिवसभर काही ना काही गुणगुणते. यामुळे एकतर मनावरचा ताण कमी होऊन कॉर्टिसॉलची पातळी कमी होते आणि शिवाय गाणं गुणगुणल्यामुळे आपोआपच एनर्जेटिक व्हायला मदत होते.
दिवाळीत लक्ष्मीपुजनासाठी आणलेल्या लाह्या खूप उरल्या? करा ३ चवदार पदार्थ- हा हा म्हणता लाह्या संपतील
२. विद्याने सांगितलेली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मोबाईलचे नोटिफिकेशन्स नेहमीच सायलेंट मोडवर ठेवा. बऱ्याचदा मोबाईलवर सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे आपण गोंधळून जातो, अस्वस्थ होतो आणि त्यामुळे कॉर्टिसॉल वाढते.
३. कॉर्टीसॉलचे प्रमाण वाढू नये यासाठी दररोज रात्री झोपण्यापुर्वी काही मिनिटे भ्रामरी प्राणायाम करा असा सल्लाही विद्याने दिला आहे. काही दिवस हे काही उपाय करून पाहा. बघा वाढत्या वजनावर खरंच नियंत्रण मिळवता येतेय का..
Web Summary : Actress Vidya Malvade shares three daily tips to manage weight by controlling cortisol levels. These include humming, silencing phone notifications, and practicing Bhramari Pranayama before sleeping. These habits help reduce stress and maintain a healthy figure.
Web Summary : अभिनेत्री विद्या मालवदे कोर्टिसोल के स्तर को नियंत्रित करके वजन प्रबंधित करने के लिए तीन दैनिक सुझाव साझा करती हैं। इनमें गुनगुनाना, फोन नोटिफिकेशन को साइलेंट करना और सोने से पहले भ्रामरी प्राणायाम का अभ्यास करना शामिल है। ये आदतें तनाव को कम करने और एक स्वस्थ फिगर बनाए रखने में मदद करती हैं।