Lokmat Sakhi >Fitness > बॅटल रोप एक्सरसाइज म्हणजे काय ? ४ गोष्टी चुकल्या तर जन्मभराचे दुखणे लागेल मागे...

बॅटल रोप एक्सरसाइज म्हणजे काय ? ४ गोष्टी चुकल्या तर जन्मभराचे दुखणे लागेल मागे...

Tips for battle rope exercises : Battle Rope Exercise Guide : बॅटल रोप एक्सरसाइजचे संपूर्ण फायदे मिळण्यासाठी ते योग्य पद्धतीने करण्यासाठी लक्षात ठेवा काही महत्वाच्या गोष्टी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2024 10:46 AM2024-07-09T10:46:25+5:302024-07-09T10:56:57+5:30

Tips for battle rope exercises : Battle Rope Exercise Guide : बॅटल रोप एक्सरसाइजचे संपूर्ण फायदे मिळण्यासाठी ते योग्य पद्धतीने करण्यासाठी लक्षात ठेवा काही महत्वाच्या गोष्टी..

Tips for battle rope exercises How to do rope exercise properly How to Properly Use the Battle Ropes | बॅटल रोप एक्सरसाइज म्हणजे काय ? ४ गोष्टी चुकल्या तर जन्मभराचे दुखणे लागेल मागे...

बॅटल रोप एक्सरसाइज म्हणजे काय ? ४ गोष्टी चुकल्या तर जन्मभराचे दुखणे लागेल मागे...

वर्कआऊट करताना आपण त्यात अनेक वेगवेगळ्या व्यायामांचा समावेश करतो. या वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइजपैकी बॅटल रोप एक्सरसाइज हा एक महत्वाचा प्रकार मानला जातो. बॅटल रोप एक्सरसाइज केल्याने एकाचवेळी आपल्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. बॅटल रोप तुमच्या शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्यास मदत करते. त्याचबरोबर तुमच्या संपूर्ण शरीराला टोर्न करू शकते. बॅटल रोप एक्सरसाइज हा एक हाय इंटेन्सिटी असलेला वर्कआऊटचा प्रकार आहे. यामुळे आपले मुख्य स्नायू आणि शरीराच्या वरच्या भागाचा चांगलाच व्यायाम होतो(How to do rope exercise properly).

साधारणपणे असे मानले जाते की बॅटल रोप एक्सरसाइज हा एक प्रकारचा कार्डिओ वर्कआऊट आहे. परंतु प्रत्यक्षात तर तो तुमच्या स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी देखील फायदेशीर ठरतो. जर तुम्हाला बॉडी पॉश्चर सुधारायचे असेल किंवा अतिरिक्त कॅलरीज जाळून वजन कमी करायचे असेल, तर बॅटल रोप एक्सरसाइज करणे फायदेशीर ठरते. बॅटल रोप एक्सरसाइज करणे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असले तरी ते करताना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते. बॅटल रोप एक्सरसाइज करताना छोट्या - छोट्या गोष्टी (tips to follow while doing battle rope exercise) कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत, अन्यथा याचे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. यामुळेच बॅटल रोप एक्सरसाइज करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते पाहूयात(Battle Rope Exercise Guide).

 बॅटल रोप एक्सरसाइज करताना लक्षात ठेवा... 

१. वॉर्मअप करणे महत्वाचे आहे :- बॅटल रोप एक्सरसाइज करण्याआधी वॉर्मअप करायला विसरू नका. बॅटल रोप एक्सरसाइज करण्याआधी वॉर्मअप केल्याने स्नायूंनां इजा किंवा दुखापत होण्याचा धोका कमी असतो. बॅटल रोप एक्सरसाइज करण्याआधी स्नायू आणि जॉइंट्सना तयार करण्यासाठी आर्म सर्कल, शोल्डर रोल यांसारखे स्ट्रेचिंगचे छोटे छोटे एक्सरसाइज करणे गरजेचे आहे. एक्सरसाइजचा हा प्रकार करण्याआधी रक्त प्रवाह वाढवण्यासाठी तुम्ही ५ ते १० मिनिटे जॉगिंग किंवा जंपिंग जॅकसारखे हलके कार्डिओ एक्सरसाइज देखील करू शकता.  

२. शरीराच्या स्थितीकडे लक्ष द्या :- जेव्हा तुम्ही बॅटल रोप एक्सरसाइज करत असाल, तेव्हा तुमच्या बॉडी पॉश्चरची विशेष काळजी घेतली पाहिजे. तुमचे पाय नेहमी खांद्याच्या रुंदीच्या अंतरावर ठेवा. यामुळे शरीराची स्थिरता राखण्यास मदत होते. तसेच, तुमचे गुडघे किंचित वाकलेले ठेवा आणि तुमचे बट्स किंचित मागे ठेवूनि खालच्या दिशेने झुकवा. यामुळे तुमच्या पाठीच्या खालच्या भागाचा ताण कमी होतो. 

सेलिब्रिटी पितात ते  स्पार्कलिंग वॉटर नेमके काय असते ? हा पाण्याचा  कोणता नवीन प्रकार....

३. वर्कआउटचे विविध प्रकार करा :- बॅटल रोप एक्सरसाइज करताना त्यांचे वेगवेगळे प्रकार करण्यावर अधिक भर द्या. कधी दोन्ही हातात रोप पकडून एकाच वेळी दोन्ही हातांनी रोप हलवा. कधी एक हात वर तर कधी दुसरा हात वर अशा प्रकारे वेगवेगळे एक्सरसाइज करावे. कधी रोप दोन्ही हातात पकडून वर्तुळाकार फिरवा. दोन्ही हातात दोर वरच्या बाजूस उचला आणि त्यांना जोरदारपणे खाली पाडा. यामुळे तुमची ताकद वाढण्यास मदत होते. बॅटल रोपच्या मदतीने एक्सरसाइजचे असे अनेक प्रकार केल्यास आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे मिळतात. 

४. कूल डाऊन करणे आहे महत्वाचे :- बॅटल रोप एक्सरसाइज करण्याआधी जसे वॉर्मअप करणे महत्वाचे आहे तसेच एक्सरसाइज संपल्यावर कूल डाऊन करणे सुद्धा गरजेचे आहे. कूल डाऊन करताना हात, पाय, मनगट, मान, पाठीचे स्ट्रेचिंग एक्सरसाइज करावेत. यामुळे एक्सरसाइज करून थकलेली तुमची बॉडी रिकव्हरी होण्यास खूप मदत होते.

अंशुला कपूरने शेअर केला ‘स्व स्तन तपासणी’ व्हिडिओ, ८ स्टेप्स- ब्रेस्ट कॅन्सरची चाचणी वेळीच करा...

Web Title: Tips for battle rope exercises How to do rope exercise properly How to Properly Use the Battle Ropes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.