काही मोजके अपवाद सोडले तर बहुसंख्य घरातल्या लहान मुलांना आवडणारी मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. या मालिकेतली पात्रं एवढी मजेशीर होती की मुलांसोबतच घरातली मोठी मंडळीही ती मालिका आवडीने पाहायला लागायची. त्या मालिकेतलं एक पात्र म्हणजे जेठालाल. तब्येतीने जाडजूड, पोट सुटलेलं अशा जेठालालची भूमिका अभिनेते दिलीप जोशी यांनी साकारली होती. आता मात्र त्यांच्या तब्येतीमध्ये कमालीचा फरक पडला असून ते अतिशय स्लिम झाले आहेत. ५७ वर्षांच्या दिलीप जोशी यांनी फक्त ४५ दिवसांत तब्बल १६ किलो वजन कमी केलं आहे. त्यासाठी त्यांनी म्हणजे जीम, डाएट असं काहीही केलं नव्हतं. मग त्यांना कसं बरं जमलं असावं वजन घटवणं? (Taarak Mehta Ka Ooltah Chashma’s Jethalal fame Dilip Joshi lost 16 kg in a month)
वेटलॉससाठी दिलीप जोशी यांनी काय उपाय केले?
काही दिवसांपुर्वी Mashable India यांना दिलेल्या मुलाखतीत दिलीप जोशींनी सांगितलं होतं की काही वर्षांपुर्वी त्यांनी हुन हुन्शी हुन्शीलाल हा गुजराती चित्रपट केला होता.
त्यावरुनच त्यांना वजन कमी करण्याची प्रेरणा मिळाली. वजन कमी करण्यासाठी त्यांनी ४५ मिनिटे रनिंग करण्याचा मार्ग निवडला. ऊन, वारा, पाऊस काहीही असलं तरी ते घराबाहेर पडायचे आणि दररोज नित्यनेमाने मुंबईतील मरीन ड्राईव ते हॉटेल ओबेरॉय असं ४५ मिनिटे रनिंग करायचे. यामुळेच त्याचं वजन एवढ्या वेगात कमी झालं असं ते सांगतात.
रनिंग करताना काय काळजी घ्यावी?
जेठालाल यांचा हा अनुभव ऐकून तुम्हीही लगेच रनिंग सुरू करायचा विचार करत असाल तर थोडं थांबा. कारण प्रत्येकाच्याच प्रकृतीसाठी ते मानवणारं नसतं.
फक्त चमचाभर हळद घेऊन 'या' पद्धतीने चेहऱ्यावर चोळा- १५ मिनिटांत टॅनिंग निघून जाईल
तुमचं वय, तुमचं वजन, आहार या गोष्टीही विचारात घ्यायला हव्या. सवय नसताना अचानक रनिंगला सुरुवात केली तर ते गुडघे, पायाचे घोटे यांच्यासाठीही त्रासदायक ठरू शकतं. त्यातून नवी दुखणी मागे लागू शकतात. त्यामुळे जे त्यांनी केलं ते आपल्यासाठी योग्य असेलच असं नाही. आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच व्यायाम सुरू करा.