Join us  

शरीरातलं बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारी भाजी, रोज खा-बीपी वाढण्याचा त्रासही होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2023 11:48 AM

Tomato juice can reduce bad cholesterol and control bp : हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉलच्या समस्येला खूप लोक हलक्यात घेतात. यामुळे नकळत जीवघेणा आजारही उद्भवू शकतो.

अनियमित जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे कोलेस्टेरॉल वाढणं हे खूपच कॉमन झालं आहे.  उच्च रक्तदाब किंवा हाय ब्लड प्रेशरला (High Blood Pressure)  सायलेंट किलर असं म्हटलं जातं. जोपर्यंत लक्षण दिसता तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. भारतात जवळपास १ कोटीपेक्षा जास्त लोकांना उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल वाढल्याचा त्रास आहे. (How to control cholesterol and blood pressure)

हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉलच्या समस्येला खूप लोक हलक्यात घेतात. यामुळे नकळत जीवघेणा आजारही उद्भवू शकतो. जर्नल ऑफ फूड सायंस एँड न्युट्रिशनवर प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार बिना मीठाचा टोमॅटोचा ज्यूस प्यायल्यानं ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. (Top changes to improve your cholesterol)

या अभ्यासात समोर आलं  की ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉलच्या समस्येतून जात असलेल्या लोकांना रोज १ ग्लास बिना मीठाचा टोमॅटोचा ज्यूस फायदेशीर ठरू शकतो. यामुळे हृदयाच्या गंभीर आजारांचा धोका टाळता येतो. 

यात संशोधकांनी सुमारे 500 लोकांची तपासणी केली. असे दिसून आले की उपचार न केलेले प्री-हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब असलेल्या सर्व 94 लोकांनी हा रस नियमितपणे प्यायल्यानंतर लक्षणीय घट झाली. त्याचा सिस्टोलिक रक्तदाब 141.2 वरून 137 mmHg आणि डायस्टोलिक रक्तदाब 83.3 वरून 80.9 mmHg वर आला.संशोधकांना आढळले की उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या 125 सहभागींमध्ये, त्यांच्या खराब कोलेस्टेरॉलची पातळी सरासरी 155.0 वरून 149.9 mg/dL पर्यंत घसरली. 

टोमॅटोचे फायदे

टोमॅटोमध्ये कॅरोटीनॉइड्स, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम आणि गॅमा-अमीनोब्युटीरिक ऍसिड सारख्या विविध प्रकारचे जैव सक्रिय संयुगे असतात, जे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांच्या प्रतिबंधासह शारीरिक आणि मानसिक आरोग्यास प्रोत्साहन देतात.

जेवण कमी केल्यानं वजन भराभर घटतं? स्लिम, फिट राहण्यासाठी तज्ज्ञ सांगतात की....

संशोधकांनी अभ्यासातील सर्व सहभागींना दोन महिन्यांसाठी दररोज 84 ते 200 मिली रस पिण्यास सांगितले. हे अंदाजे एका लहान काचेच्या बरोबरीचे आहे. टोमॅटोच्या रसात मीठ घालू नये याची काळजी घ्या कारण संशोधकांनी मीठाशिवाय रस घेण्याचा सल्ला दिला आहे.

याशिवाय टोमॅटो हाडं मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरते.  यातील जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम दोन्ही हाडे मजबूत करण्यास उत्तम आहेत. टोमॅटोमध्ये असलेले लाइकोपीन हाडांचे आरोग्य वाढते, जे ऑस्टियोपोरोसिसशी लढण्यास मदत करते. 

टॅग्स :हेल्थ टिप्सफिटनेस टिप्सआरोग्य