मधुमेहाचे रुग्ण आपल्याकडे खूप आहेत. काही अपवाद सोडले तर अगदी प्रत्येक घरात मधुमेह असणारी एक तरी व्यक्ती असतेच. आता मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायची असेल तर त्यासाठीचा सगळ्यात पहिला उपाय म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार आणि गोळ्या- औषधं घेणे. पण त्यासोबतच काही व्यायाम जर नियमितपणे केले तर त्यामुळे तब्येतीला खूप फायदा होऊ शकतो (simple exercise to control sugar spike after meal). कारण हे व्यायाम केल्याने जेवणानंतर रक्तातली साखर एकदम वाढत नाही (how to control sugar spike after meal?). ते व्यायाम नेमके कोणते आणि कधी, कसे करायचे ते पाहुया.(best exercise for diabetes patients to control sugar spike)
मधुमेहींसाठी उपयुक्त ठरणारे काही साधे- सोपे व्यायाम
रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी जेवणानंतर कोणता व्यायाम करायला हवा याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी evolvewtnaz या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्या सांगतात की जेवण झाल्यानंतर एका खुर्चीवर ताठ बसा.
Summer Special: घाम येऊन मान काळी पडली? 'हा' घरगुती उपाय करा- काळवंडलेली मान स्वच्छ होईल
तळपाय जमिनीला टेकवा आणि आता बोटं जमिनीवर टेकवून टाचा शक्य तेवढ्या उचला आणि पुन्हा जमिनीवर ठेवा. असं साधारण १० मिनिटे करा. हा व्यायाम केल्यामुळे पोटरीच्या भागात असणारे काही स्नायू ॲक्टीव्हेट होतात आणि ते शरीरात साचून ठेवलेली साखर किंवा ग्लायकोजीन वापरण्यास सुरुवात करतात. साठवून ठेवलेलं ग्लायकोजीन कमी होऊ लागलं की आपोआप मग इतर स्नायू रक्तातील साखर शोषून घेण्याचा प्रयत्न करतात. यामुळे मग रक्तातील साखर कमी होत जाते. वाढत नाही.
हे व्यायामही करून पाहा..
जेवणानंतर पोटरीच्या भागातल्या स्नायूंना ॲक्टीव्हेट करण्यासाठी तुम्ही पुढे सांगितलेले काही व्यायामही करू शकता. त्यातला पहिला व्यायाम म्हणजे ताठ उभे राहा.
उन्हाळी ट्रीपचे फोटो येतील कमाल, 'या' पद्धतीने त्वचेची काळजी घ्या, उन्हात फिरूनही टॅनिंग होणार नाही
पायाची बोटं वर उचलून घ्या आणि केवळ टाचांवर जोर देऊन चालावे. यानंतर याच्या विरुद्ध करावे. म्हणजेच टाचा उचलून घ्याव्या आणि बोटांवर जोर देऊन चालावे. दोन्ही पद्धतींनी साधारण ८ ते १० मिनिटे चाला. शुगर कंट्रोलमध्ये राहील.
Web Summary : For diabetics, manage blood sugar by combining prescribed diet and medication with simple exercises. A dietitian suggests seated heel raises for ten minutes after meals to activate calf muscles, reducing stored glycogen and lowering blood sugar levels. Toe and heel walking exercises can also help control sugar levels.
Web Summary : मधुमेह रोगियों के लिए, निर्धारित आहार और दवा के साथ सरल व्यायाम करके ब्लड शुगर को नियंत्रित करें। एक आहार विशेषज्ञ भोजन के बाद दस मिनट तक बैठकर हील रेज करने का सुझाव देते हैं, इससे काफ की मांसपेशियां सक्रिय होती हैं, ग्लाइकोजन कम होता है और ब्लड शुगर का स्तर कम होता है। टो और हील वॉकिंग एक्सरसाइज भी शुगर लेवल को नियंत्रित करने में मदद कर सकते हैं।