वजन कमी करण्यासाठी अनेक जण वॉकिंगचा म्हणजेच चालण्याचा व्यायाम करण्याचा पर्याय निवडतात. हा व्यायाम खरोखरच उत्तम आहे. कारण शरीरासोबतच मनही फ्रेश होतं. बाहेरच्या मोकळ्या हवेत गेल्यामुळे काही क्षण का होईना सगळे ताण विसरुन आपण रिलॅक्स होतो. पाय मोकळे होतात. शिवाय वजनही कमी होतं. पण डॉक्टर सांगतात हे सगळे फायदे तुम्हाला तेव्हाच मिळतात जेव्हा तुम्ही एका मर्यादेपर्यंतच चालता (how excess walking is responsible for weight gain?). जर चालण्याचा तुम्ही अतिरेक केला तर वजन कमी होण्याऐवजी किंवा कॅलरी बर्न होण्याऐवजी तुम्ही जास्तच लठ्ठ व्हायला लागाल. बघा कसं...(side effects of excess walking)
वजन घटविण्याच्या नादात तुम्ही गरजेपेक्षा जास्त वॉकिंग करत नाही ना?
चालण्याचा व्यायाम कोणी किती करावा, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ डॉक्टरांनी drmalharganla या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये डॉक्टर सांगतात की दररोज तुम्ही १० हजार पावलं चालणं योग्य आहे.
तुम्ही घरातल्या घरात जे काही काम करता किंवा कामानिमित्त तुमच्या ऑफिस, घर अशा ज्या काही चकरा होतात त्या आणि दररोज सकाळी किंवा संध्याकाळी ३० ते ४० मिनिटे वॉकिंग करणे एवढे पुरेसे आहे. कारण एवढे चालल्याने तुमच्या १० हजार स्टेप काऊंट होऊन जातात. पण काही लोक ते चुकीच्या अर्थाने घेतात आणि पुर्णपणे १० हजार स्टेप त्यांच्या चालण्याच्या व्यायामातूनच करण्याचा प्रयत्न करतात.
असा चालण्याचा अतिरेक केला तर तुम्हाला वॉकवरून आल्यानंतर पुढच्या २ ते ३ तासात खूप सपाटून भूक लागते. या भुकेच्या नादात तुम्ही गरजेपेक्षा जास्त खाता आणि जेवढ्या कॅलरी चालून कमी करून आलात त्याच्या दुप्पट कॅलरी तुमच्या पोटात जातात.
जास्वंदाच्या रोपांवर पांढरी बुरशी पडली? 'हा' घरगुती उपाय लगेचच करा- जास्वंदाचा रोग वाढणार नाही
याचा परिणाम म्हणजे तुमचे वजन जशास तसेच राहाते किंवा आहे त्या पेक्षाही जास्त वाढते. त्यामुळे चालण्याचा अतिरेक करणं टाळा. जेवढी गरज आहे, तेवढेच चाला असा सल्ला डॉक्टर देतात. तुम्हीही खूप वॉकिंग करत असाल पण तरीही वजन कमी होत नसेल तर ही गोष्ट तुमच्याबाबतीत लागू होतेय का ते स्वत:चं स्वत: तपासून पाहा.