Sara Ali Khan Healthy Drink : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानची क्रेझ आजकालच्या तरूणाईमध्ये चांगलीच आहे. साराच्या अभिनयासोबतच तिच्या फिटनेस सुद्धा नेहमीच चर्चा होत असते. फॅट टू फीट झालेल्या साराचे फिटनेससंबंधी व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. सारा सिनेमात येण्याआधी भरपूर लठ्ठ होती. पण नंतर तिनं शरीरात वाढलेली चरबी कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. अलिकडेच सारानं पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत तिच्या डाएट प्लानची माहिती दिली. सकाळी सारा कोणतं खास ड्रिंक पिते ज्यामुळे ती स्लीम आहे. सारानं आवर्जून सांगितलं की, ती दूध, साखर आणि कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे टाळते.
सकाळी पिते हे खास ड्रिंक?
सारा अली खान आपल्या दिवसाची सुरूवात हळद, पालक आणि गरम पाण्याच्या ड्रिंकनं करते. या खास ड्रिंकमध्ये भरपूर पोषक तत्व असतात, ज्यापासून शरीराला खूप फायदे मिळतात. हळदीमध्ये करक्यूमिन नावाचं तत्व असतं. हे एक अॅंटी-इन्फ्लेमेटरी तत्व आहे. जे शरीरातील सूज कमी करतं. तसेच हळदीमुळं शरीराची इम्यूनिटी वाढते, पचन तंत्र सुधारतं आणि हृदय निरोगी राहतं. दुसरीकडे पालकामधून वेगवेगळे व्हिटॅमिन्स, आयर्न आणि कॅल्शिअम मिळतं. पालक भाजीनं डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. इतकंच नाही तर सगळ्यात मोठा फायदा म्हणजे शरीरातील चरबी कमी होऊ वजन कंट्रोलमध्ये राहतं.
साखर आणि कार्बोहायड्रेट वजन वाढवतात
अनेक एक्सपर्ट सतत आहारातून शुगर कमी करण्याचा, दुधाचा चहा न पिण्याचा सल्ला देत असतात. कारण शुगर ही वजन वाढण्याचं मुख्य कारण आहे. शुगर जास्त खाल्ल्यानं लठ्ठपणा, डायबिटीस आणि हृदयरोगांचा धोका असतो. शुगर जास्त खाल तर त्यामुळे शरीर अधिक पाणी धरून ठेवेल, ज्यामुळे लठ्ठपणा वाढेल.
एक्सपर्ट कार्बोहायड्रेट पूर्णपणे न सोडण्याचा सल्ला देतात. कार्बोहायड्रेटमुळे शरीराला ऊर्जा मिळते. पण रिफाइंड कार्बोहायड्रेट जसे की, पांढरे ब्रेड, पास्ता, शुगर यातील कार्बोहायड्रेट नुकसानकारक असतात. त्याऐवजी सारा फळं, भाज्या, कडधान्य यातून मिळणारे नॅचरल कार्बोहायड्रेट घेते.