Join us
Daily Top 2Weekly Top 5

दणादण सिक्स मारणाऱ्या संजू सॅमसनला आवडतो आईच्या हातचा ‘हा’ पदार्थ, प्रोटीनही मिळतं भरपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2026 17:14 IST

Sanju Samson chi fitness secret: Sanju Samson Diet and Training: संजू सॅमसचा डाएट प्लान नेमका कसा आहे पाहूया.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू संजू सॅमसनने टी-२० विश्वचषक सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात संजूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही मिळाला आहे. संजूच्या खेळासोबतच त्याच्या जीवनशैली आणि आहार इत्यादींबद्दलही बरीच चर्चा आहे.(Sanju Samson fitness secret) वयाच्या ३१ व्या वर्षीही तो अतिशय फिट वाटतो. (Home-made food for muscle recovery)क्रिकेटच्या मैदानावर चौकार-षट्‍कारांचा पाऊस पाडणारा संजू सॅमसन हा फक्त फलंदाजीसाठीच नाही तर त्याच्या शिस्तबद्ध फिटनेससाठीही ओळखला जातो. मैदानावर क्रिकेट खेळताना खेळाडूला प्रचंड ताकदीची आणि स्टॅमिनाची गरज असते.(Sanju Samson Diet and Training) संजूच्या या फिटनेस प्रवासात त्याची शिस्त आणि आहार यांचा मेळ अत्यंत महत्त्वाचा आहे. तो बाहेरचे जंक फूड टाळण्यावर नेहमीच भर देतो. मात्र, त्याच्या या डाएट प्लॅनमध्ये एक विशेष इमोशनल टच' आहे, तो म्हणजे 'आईच्या हातचे जेवण'. संजू सॅमसचा डाएट प्लान नेमका कसा आहे पाहूया. 

गोल की लांबट कोणता लिंबू जास्त रसाळ असतो? ६ टिप्स-चटकन ओळखा रसरशीत लिंबू

संजू सॅमसनचा आहार अगदी साधा आणि निरोगी आहे. तो नेहमीच हेल्दी खाण्यावर अधिक भर देतो. आहारात फळे, भाज्या, डाळी आणि मांसाहरी पदार्थ आवडीने खातो. त्याच्या आहारात प्रथिने आणि पोषणद्रव्ये भरपूर असतात, तो बहुतेकदा घरी शिजवलेले अन्न खातो, ज्यामध्ये लीन प्रोटीन, चिकन, मासे, कॉम्प्लेक्स कार्ब्स, ताजी फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश आहे. 

सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे, संजू सॅमसन आपल्या दिवसाची सुरुवात रिकाम्या पोटी पपई किंवा इतर कोणतेही ताजे फळ आणि त्यासोबत ब्लॅक कॉफी. नाश्त्यामध्ये  चणे, दही, फळे, अंडी, उपमा, ओट्स, दूध तर दुपारच्या जेवणात डाळ, टोफू, उकडलेल्या भाज्या आणि चिकन खातो. संध्याकाळच्या नाश्त्यात काजू, ग्रीन टी किंवा दही खातो. तर रात्रीच्या जेवणात मासे, उकडलेल्या भाज्या, कोशिंबीर, चणे, खिचडी. 

संजू सॅमसनला खाण्याची फारशी आवड नाही, पण काही पदार्थ असे आहेत जे तो आवडीने खातो.  संजू सॅमसन हा  केरळचा आहे आणि बहुतेक मल्याळी लोकांप्रमाणे त्याला कप्पा आणि फिश करी आवडते. त्याला लहानपणापासूनच हे पदार्थ खूप आवडतात, विशेषतः जर ते त्याच्या आईने बनवले असतील तर. पण सध्या संजू फक्त तळलेले पदार्थ खातो आणि जंक फूड खात नाही. केवळ आहार घेऊन चालत नाही, तर त्या आहाराचे ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी तो दररोज तासनतास जिम आणि मैदानावर सराव करतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Sanju Samson's diet: Home-cooked food and high protein intake fuels success.

Web Summary : Sanju Samson's fitness is attributed to discipline, diet, and avoiding junk food. He favors home-cooked meals, especially his mother's recipes. His diet includes lean protein, fruits, vegetables, and essential nutrients, supporting his high-performance cricket career.
टॅग्स :फिटनेस टिप्ससंजू सॅमसन