कोणाची पाठ दुखते तर कोणाची कंबर दुखते... खूप जास्त प्रमाणात दुचाकी, चारचाकी चालवल्यामुळे कोणाची मान दुखते तर कोणाचे खांदे आखडून जातात. गुडघेदुखीचा त्रास तर अनेकांच्या खूपच कमी वयात मागे लागला आहे. थोडक्यात काय तर सांधेदुखी, जॉईंट पेन, हाडं ठणकणे असा त्रास प्रत्येकालाच थोड्याफार फरकाने होतच आहे. असा त्रास तुम्हालाही होत असेल तर तो त्रास लगेच कमी करण्यासाठी एखादी पेन किलर घेण्यापेक्षा हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा. हा उपाय केल्यामुळे शरीरातील कोणत्याही भागात होणारा सांधेदुखी किंवा जॉईंटपेनचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो, असं योग अभ्यासक सांगत आहेत.(best solution for reducing joint pain in winter)
सांधेदुखी किंवा जाॅईंटपेनचा त्रास कमी करण्यासाठी योगमुद्रा
हिवाळ्यात खूप लोकांना सांधेदुखीचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी कोणती योगमुद्रा करायला पाहिजे, याविषयी माहिती सांगणारा व्हिडीओ yogic_hacks या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
कुणाल कपूर स्पेशल आलू- मेथी पराठा! हिवाळ्यात नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट रेसिपी
यामध्ये योग अभ्यासकांनी संधी मुद्रा करण्याचा सल्ला दिला आहे. संधीमुद्रा करण्यासाठी उजव्या हाताची अनामिका म्हणजेच अंगठी घालण्याचे जे बोट आहे त्याचे टोक आणि अंगठ्याचे टोक एकमेकांवर दाबून जोर द्यावा, तसेच डाव्या हाताचे मधले बोट आणि अंगठा यांची समोरची टोके एकमेकांवर दाबून जोर द्यावा.
ही मुद्रा केल्यानंतर ५ ते ७ मिनिटे मुद्रा स्थिती टिकवून ठेवा. तसेच या पद्धतीने दिवसांतून साधारण ३ ते ४ वेळा मुद्रा करावी.
अपर लिप्स करण्यासाठी घरच्याघरी 'या' पद्धतीने तयार करा व्हॅक्स, फेशियल हेअर काढण्याचा सोपा उपाय
यासाेबतच तुमचा रोजचा व्यायामही नियमितपणे सुरू ठेवावा. या दोन्हीचा एकत्रित परिणाम होऊन शरीरातील कोणत्याही भागात होणारा जाॅईंट पेनचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होईल, असं तज्ज्ञ सांगतात.