Join us

Pilates workout: प्रिटी झिंटा सारखं फिट रहायचंय? हा घ्या तिचा फिटनेस फंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2021 20:15 IST

बॉलीवुडची डिंपल गर्ल प्रिटी झिंटा हिने नुकतेच Pilates workout चे व्हिडियो टाकून तिच्या चाहत्यांना फिटनेससंदर्भात मोटीव्हेट केले आहे. 

ठळक मुद्देपाठीचा कणा, पोट, कंबर, मांड्या यांचा चांगला व्यायाम होते आणि तेथील स्नायूंना बळकटी मिळते. 

प्रिटी झिंटाचे हास्य आणि तिच्या गालावरची खळी लाजवाब आहे. पाहताक्षणीच चेहऱ्यावरच्या गोडव्याने प्रत्येकाला आपलेसे करून घेणारी प्रिटी प्रचंड हेल्थ कॉन्शिअस आहे. तिने नुकताच एक व्हिडियो इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. यामध्ये ती Pilates workout करताना दिसत आहे. हा व्हिडियो तिच्या फिटनेस फ्रिक चाहत्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. हा व्यायाम प्रकार प्रिटी एन्जॉय करते आहे, असे या व्हिडियोवरून दिसून येते. 'Back to Pilates with Yas ❤️' असे कॅप्शनदेखील तिने या व्हिडियोला दिले आहे. 

 

Pilates workout सध्या खूपच ट्रेंडिंग असून अनेक बॉलीवुड स्टार हे वर्कआऊट करताना दिसतात. वेटलॉस आणि पोटावरची चरबी कमी होण्यासाठी हा एक परफेक्ट व्यायाम मानला जातो. आकर्षक आणि तालबद्ध हालचाली करत होणारा हा व्यायाम आहे. आठवड्यातून किमान तीन वेळा हा व्यायाम करावा. यामुळे बॉडी टोन सुधारण्यास मदत होते, असेही फिटनेसतज्ज्ञ सांगतात. इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने किंवा कोणतेही इन्स्ट्रुमेंट न घेता हा व्यायाम करता येतो. 

 

Pilates workout चे फायदे१. या व्यायामामुळे शरीर लवचिक होते आणि मांसपेशींची ताकद वाढते. २. पाठीचा कणा, पोट, कंबर, मांड्या यांचा चांगला व्यायाम होते आणि तेथील स्नायूंना बळकटी मिळते. ३. शरीराचा तोल सांभाळणे, शरीर नियंत्रित ठेवणे आणि एकाग्रता वाढणे हे देखील या वर्कआऊटचे फायदे आहेत.४. मानसिक ताण कमी करण्यासाठी Pilates workout फायद्याचे ठरते.५. Pilates workout मुळे फुफुसाची ताकद वाढते. त्यामुळे सध्या कोरोनाकाळात तर श्वसनसंस्थेचे कार्य उत्तम ठेवण्यासाठी Pilates workout अतिशय महत्त्वाचे आहे. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्स