Lokmat Sakhi >Fitness > नीता अंबानींनी सांगितले त्यांच्या तारुण्याचे आणि एनर्जीचे सिक्रेट, शेअर केला खास व्हिडिओ..

नीता अंबानींनी सांगितले त्यांच्या तारुण्याचे आणि एनर्जीचे सिक्रेट, शेअर केला खास व्हिडिओ..

Nita Ambani's Fitness Secret, See Why She Still Look So Young : वयाच्या ६१ व्या वर्षीही नीता अंबानी दिसतात तरुण. म्हणाल्या दिवसातील ३० मिनिटे स्वतःसाठी काढायची.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2025 13:01 IST2025-03-09T12:59:41+5:302025-03-09T13:01:16+5:30

Nita Ambani's Fitness Secret, See Why She Still Look So Young : वयाच्या ६१ व्या वर्षीही नीता अंबानी दिसतात तरुण. म्हणाल्या दिवसातील ३० मिनिटे स्वतःसाठी काढायची.

Nita Ambani's Fitness Secret, See Why She Still Look So Young | नीता अंबानींनी सांगितले त्यांच्या तारुण्याचे आणि एनर्जीचे सिक्रेट, शेअर केला खास व्हिडिओ..

नीता अंबानींनी सांगितले त्यांच्या तारुण्याचे आणि एनर्जीचे सिक्रेट, शेअर केला खास व्हिडिओ..

सेलिब्रिटींचे आयुष्य आपण पाहतच असतो. त्यांचं वय ओळखणं फार कठीण आहे. कारण ते तरूणपणी जसे फिट होते, मध्यम वयातही तसेच असतात. (Nita Ambani's Fitness Secret, See Why She Still Look So Young)हेमा मालिनी सारख्या महिला तर  ७६ व्या वर्षी सुद्धा उत्तम नृत्य करू शकतात. फक्त सेलिब्रिटीच नाही तर अनेक महिला आहेत, ज्या शरीराने व मनानेही प्रचंड सुदृढ असतात. आपल्याला त्यांच कौतुक वाटतं. पण त्या एवढ्या फिट का असतात? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे त्यांच्या सवयी. (Nita Ambani's Fitness Secret, See Why She Still Look So Young)त्यांची दिनचर्या, त्यांचा आहार. आळसटलेले आयुष्य त्या अजिबात जगत नाहीत. 

नीता आंबानी या भारतातील वन ऑफ द बेस्ट बिजनेस वूमन म्हणून ओळखल्या जातात. अनेक प्रकारचे व्यवसाय तसेच कार्यक्रम, उपक्रम त्या करत असतात. नीता अंबानींकडे बघितल्यावर त्यांनी साठी ओलांडली आहे, असे वाटणारच नाही. (Nita Ambani's Fitness Secret, See Why She Still Look So Young)वय वर्ष ६१ असताना त्या एवढ्या फिट कशा आहेत? त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. प्रत्येक महिला त्यांच्या सारखी फिट राहू शकते. असे ही त्या म्हणाल्या.    

 नीता अंबानी सांगतात, प्रत्येक वयातील महिलेसाठी व्यायाम करणे महत्त्वाचेच असते. वय काय आहे ? तर फक्त एक अंक.  मी रोज विविध व्यायाम करते. कारण मला रोज व्यायाम करायला आवडते.  पण रोज तासंतास व्यायाम केलाच पाहिजे असे नाही. आठवड्यातील ४ दिवस व्यायाम करणे पुरेसे असते. मात्र रोज स्वत:साठी ३० मिनिटे तर प्रत्येक महिला काढूच शकते. रोजची ही ३० मिनिटे स्वत:च्या स्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी वापरा.   
 मी ६१ वर्षाची आहे. मी रोज व्यायाम करते. रोज जीमला जाते. जर या वयात मी हे करू शकते, तर तुम्हीही करूच शकता. व्यायामामुळे मानसिक स्वास्थही चांगले राहते. सकारात्मकता वाढते. पंन्नाशी उलटल्यावर आपण व्यायाम करत नाही. पण खरं तर या वयातील महिलांसाठी स्वास्थ्याची काळजी घेणे जास्त गरजेचे असते.  सुरवात तर करा. हळूहळू आवडायला लागेल. कारण व्यायाम केल्यानंतर मन खरच प्रसन्न होते. पहिले पाऊल उचला पुढचा प्रवास आपोआप घडेल." 

नीता अंबानी यांनी स्ट्राँग हर मुव्हमेंट' सुरू केली आहे. प्रत्येक महिलेने त्याचा भाग व्हावा म्हणून त्या महिलांना प्रोत्साहीत करत आहेत. महिलांचे आरोग्य चांगले राहावे हाच या उपक्रमाचा उद्देश आहे.


Web Title: Nita Ambani's Fitness Secret, See Why She Still Look So Young

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.