Lokmat Sakhi >Fitness > Navratri 2025: गरब्याचा मनसोक्त आनंद घ्याच, पण आधी 'या' दोन गोष्टी करा; कितीही नाचले तरी येणार नाही थकवा

Navratri 2025: गरब्याचा मनसोक्त आनंद घ्याच, पण आधी 'या' दोन गोष्टी करा; कितीही नाचले तरी येणार नाही थकवा

Garba Tips: डॉक्टरांनी गरबा करताना काही खास टिप्स फॉलो करण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून आपल्याला थकवा जाणवणार नाही आणि चक्करही येणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 14:24 IST2025-09-22T14:23:03+5:302025-09-22T14:24:53+5:30

Garba Tips: डॉक्टरांनी गरबा करताना काही खास टिप्स फॉलो करण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून आपल्याला थकवा जाणवणार नाही आणि चक्करही येणार नाही.

Navratri 2025 : Doctor shares healthy tips to avoid exhaustion and dehydration during garba | Navratri 2025: गरब्याचा मनसोक्त आनंद घ्याच, पण आधी 'या' दोन गोष्टी करा; कितीही नाचले तरी येणार नाही थकवा

Navratri 2025: गरब्याचा मनसोक्त आनंद घ्याच, पण आधी 'या' दोन गोष्टी करा; कितीही नाचले तरी येणार नाही थकवा

Garba Tips: नवरात्रीला (Navratri 2025) सुरूवात झाली आहे आणि सगळेजण देवीच्या पूजेसह गरबा (Garba) आणि दांडियाचाही (Dandiya) आनंद घेऊ शकणार आहेत. सगळेजण याचसाठी या उत्सवाची आतुरतेने वाट बघत असतात. कारण गरबा आणि दांडीया खेळताना जो काही आनंद मिळतो, त्याला काही तोड नसते. पण आपण अनेकदा अशाही घटना ऐकत असतो की, गरबा किंवा दांडीयादरम्यान काही लोक थकवा किंवा डिहायड्रेशनमुळे चक्कर येऊन पडतात. इतकंच नाही तर काही लोक हार्ट अ‍ॅटॅक येऊन आपला जीवही गमावतात. अशात या आनंदाच्या उत्सवात तब्येतीची देखील काळजी घेतली गेला पाहिजे.

ऑर्थोपेडिक सर्जन आणि हेल्थ एज्युकेटर डॉक्टर मनन वोरा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी गरबा करताना काही खास टिप्स फॉलो करण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून आपल्याला थकवा जाणवणार नाही आणि चक्करही येणार नाही.

हायड्रेशनची काळजी

डॉक्टर सांगतात की, गरबा करण्याआधी पाणी पिणं खूप गरजेचं आहे. कारण गरबा करताना शरीरातून खूप घाम जातो, ज्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं. जर गरबा करण्याआधी किंवा करत असताना अधूनमधून थोडं थोडं पाणी प्यायले नाही तर चक्कर, कमजोरी आणि बेशुद्ध पडणे अशा समस्या होऊ शकतात. त्यामुळे भरपूर पाणी पिणं खूप महत्वाचं आहे.

एनर्जी लेव्हल कशी वाढवाल?

गरबा करण्याआधी हलकं आणि पौष्टिक जेवण करा. फार जास्त तेलकट किंवा जड असं काही खाऊ नका. असं केलं तर थकवा आणि आळस वाढू शकतो. फ्रूट्स, ड्राय फ्रूट्स किंवा हलके स्नॅक्स खाऊ शकता. ज्यमुळे आपली एनर्जी कायम राहील. त्याशिवाय सोबत चॉकलेट आणि इलेक्ट्रोलाइट ड्रिंकही ठेवा. कमजोरी किंवा थकवा जाणवला तर लगेच या गोष्टी कामात पडतील.

आरामही महत्वाचा

सतत अनेक तास डान्स केल्यानं शरीरावर अधिक दबाव पडतो. त्यामुळे मधेमधे थोडा आराम करणंही गरजेचं असतं. उत्साहाच्या भरात सतत डान्स केल्यास मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे उत्साहाला जरा आवर घालून अधूनमधून आरामही करा. जेणेकरून शरीर रिलॅक्स होईल. असं केल्यास आपण जास्त वेळ गरबा करू शकाल.

डॉक्टर सांगतात की, उत्सवाचा आनंद आपण तेव्हाच घेऊ शकतो, तेव्हा आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो आणि आजूबाजूच्या लोकांचीही काळजी घेतो. अशात दिवसभर किंवा डान्स करताना थोडं थोडं पाणी पित रहा, हलकं जेवण करा आणि आरामही करा. या गोष्टींची काळजी घेतली तर गरब्याचा आनंद अधिक चांगल्या पद्धतीनं घेऊ शकाल.

Web Title: Navratri 2025 : Doctor shares healthy tips to avoid exhaustion and dehydration during garba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.