Join us  

Morning ritual : रोज सकाळी नेमाने फक्त या ५ गोष्टी करा, वजन झरझर कमी होईल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 5:38 PM

वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेताय? मग आता रोज सकाळी उठल्यावर 'हे' नियम पाळून दिवसाची सुरुवात करा. थोड्याच दिवसात वजनाचा काटा डाव्या बाजूला झुकू लागेल.

ठळक मुद्देरोज सकाळी तुमचं जे काही रूटीन आहे, त्यात थोडासा बदल करून पहा. वजन कमी होण्यात नक्कीच मदत होईल.

वजन कमी करायचे असल्यावर आपण खाणे- पिणे कंट्रोल करतो, नियमित व्यायाम देखील करतो. पण का कोण जाणे वजन मात्र थोडेही कमी होत नाही. मग एवढे सगळे नियम पाळून, खाण्यापिण्याची पथ्ये पाळून काय उपयोग आहे, असे आपल्याला वाटू लागते. वजन जेव्हा कमी व्हायचे नावच घेत नाही, तेव्हा एक वेळ अशी येते की, आपण या सगळ्या गोष्टींना वैतागून जातो आणि मग सगळे पथ्यपाणी टाळून नेहमीप्रमाणे बिनधास्त खवय्येगिरी सुरू ठेवतो.

 

तुमचेही असेच होत असेल तर सकाळी उठल्यावर या काही गोष्टी नक्की करा. आपण खाण्यावर कंट्रोल ठेवला तरी बऱ्याचदा आपल्याही नकळत आपण काही चुकीच्या गोष्टी करत असतो. खाण्या-पिण्याच्या काही चुकीच्या सवयी आपल्या आरोग्यावर, पचनसंस्थेवर परिणाम करत असतात. याचाच परिणाम म्हणजे मग खूप प्रयत्न करुनही वजन कमी होत नाही. पण रोज सकाळी तुमचं जे काही रूटीन आहे, त्यात थोडासा बदल करून पहा. वजन कमी होण्यात नक्कीच मदत होईल.

 

सकाळी उठल्यावर पाळा 'हे' नियम१. कोमट पाणी प्यासकाळी उठल्यानंतर ब्रश करून आपण सगळ्यात आधी कोमट पाणी पिले पाहिजे. पाणी कोमट असावे, गरम नाही, हे लक्षात घ्या. कोमट पाणी पिल्यामुळे शरीर नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स होण्यास मदत होते. गरम पाणी पिल्यामुळे पचनशक्ती आणि चयापचय क्रिया सुधारते. आयुर्वेदानुसार देखील दररोज सकाळचे पहिले पेय हे कोमट पाणीच असले पाहिजे. दररोज सकाळी २ ग्लास कोमट पाणी प्यावे असे आयुर्वेदात सांगितले आहे.

 

२. भरपूर पाणी प्याआपल्याला दिवसभरात भरपूर पाणी प्यायचे आहे, हे रोज सकाळी उठून स्वत:ला नव्याने सांगा आणि दिवसभर या नियमाचे पालन करा. आपण योग्य प्रमाणात पाणी प्यायले तर शरीरात अतिरिक्त चरबी साठून राहत नाही. शिवाय शरीरातील विषारी द्रव्ये पाण्यासोबत बाहेर फेकली जातात. पाणी जेव्हा योग्य प्रमाणात पिले जाते, तेव्हा पोट भरल्यासारखे वाटते आणि आहार आपोआपच कमी घेतला जातो. 

 

३. ब्रेकफास्ट असा करा...ब्रेकफास्ट हा राजासारखा करावा, हे वाक्य आपण नेहमीच ऐकतो. खरोखरच तसा नाश्ता केला पाहिजे. पण याचा अर्थ तुम्ही हवा तो नाश्ता अगदी पोटभर घ्या असे नाही. प्रोटीन्स आणि फायबर मोठ्या प्रमाणात असणारा नाश्ता दररोज सकाळी घेतला पाहिजे. प्रोटीन्स आणि फायबर या दोन्ही गोष्टींमुळे भरपूर उर्जा मिळते आणि खूप जास्त वेळ काही दुसरे खाल्ले नाही ती शरीराची ताकद टिकून राहते. शिवाय लवकर भुक लागत नाही.

 

४. डबा घेऊन जाणेराेज सकाळी जेव्हा तुम्ही कामानिमित्त घराबाहेर जाल, तेव्हा स्वत:चा डबा आवर्जून सोबत घ्या. कारण खरे वजनवाढीचे कारण यातच दडलेले आहे. अनेक जण डाएटिंग करायचे म्हणून डबा सोबत नेणे टाळतात. पण आठवड्यातून एकदा तरी असे होतेच की खूप भुक लागते. भुक भागविण्यासाठी मग वडापाव, सामोसा किंवा तत्सम काही पदार्थ खाल्ले जातात. केवळ एकदाच हे पदार्थ खाल्ले तरीही मग तुमची आठवडाभराची मेहनत पाण्यात जाते आणि वजन कंट्रोल होत नाही. त्यामुळे ऑफिससाठी किंवा कामासाठी घराबाहेर जाताना घरचा सकस आहार असणारा डबा घेऊन जाणे, हे सर्वोत्तम. 

 

५. दररोज सकाळी व्यायाम करासकाळची वेळ ही व्यायामासाठी सर्वांत चांगली वेळ मानली जाते. त्यामुळे दररोज सकाळी न चुकता व्यायाम करा. दररोज सकाळचा ठराविक वेळ व्यायामासाठी राखून ठेवा. जेव्हा व्यायाम करून तुमच्या दिवसाची सुरूवात होते, तेव्हा ती उर्जा तुम्हाला दिवसभर ताजेतवाणे ठेवणारी असते. एखाद्या दिवशी खूप घाई असेल तर कमी व्यायाम करा. पण दररोज थोडातरी व्यायाम जरूर करा. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सहेल्थ टिप्स