Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Fitness > मंदिरा बेदीनं सांगितलं तिच्या हॉट आणि फिट फिगरचं रहस्य, म्हणते मी रोज घेते फक्त ही १ गोळी..

मंदिरा बेदीनं सांगितलं तिच्या हॉट आणि फिट फिगरचं रहस्य, म्हणते मी रोज घेते फक्त ही १ गोळी..

Mandira Bedi reveals the secret to her hot and fit figure, says she takes just this one pill every day : अशी कोणती गोळी आहे जी ठेवते मंदिरा बेदीला एवढं फिट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2026 18:30 IST2026-01-27T18:29:19+5:302026-01-27T18:30:24+5:30

Mandira Bedi reveals the secret to her hot and fit figure, says she takes just this one pill every day : अशी कोणती गोळी आहे जी ठेवते मंदिरा बेदीला एवढं फिट?

Mandira Bedi reveals the secret to her hot and fit figure, says she takes just this one pill every day. | मंदिरा बेदीनं सांगितलं तिच्या हॉट आणि फिट फिगरचं रहस्य, म्हणते मी रोज घेते फक्त ही १ गोळी..

मंदिरा बेदीनं सांगितलं तिच्या हॉट आणि फिट फिगरचं रहस्य, म्हणते मी रोज घेते फक्त ही १ गोळी..

मंदिरा बेदीला भारतीय मनोरंजनसृष्टीतील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व मानलं जातं. ती फक्त एक अभिनेत्री नाही तर, मॉडेल, वोकप्रिय अँकर, फॅशन डिझायनर आणि फिटनेस आयकॉन आहे. एकच नाही तर अनेक क्षेत्रात तिला आदर्श मानले जाते. १९९४ साली दूरदर्शनवरील 'शांती' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. (Mandira Bedi reveals the secret to her hot and fit figure, says she takes just this one pill every day.)त्यानंतर हिंदी चित्रपट, वेब सिरीज, जाहिराती केल्या आणि नंतर क्रिकेट सामन्यांचे अँकरिंग करत तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

महिलांना कधीही वय विचारु नये असे म्हटले जाते. मात्र मंदिरा बिनधास्त वय सांगते आणि मला वयाचा काही फरकच पडत नाही असेही म्हणते.  दिसायला तरुण असणाऱ्या मंदिराने ५०शी ओलांडली आहे. सध्या तिचे वय ५३ वर्षे आहे. वयाच्या या टप्प्यावरही ती अतिशय तंदुरुस्त आणि तरुण दिसते,  शिस्तबद्ध जीवनशैली, चांगला आहार आणि आनंदी राहण्याची सवय असली की वय जाणवत नाही असे मंदिला बेदी म्हणते. 


 
फिट राहण्यासाठी मंदिरा बेदी नियमित व्यायामावर भर देते. योगा, पिलाटेस, स्ट्रेंथ ट्रेनिंग, रनिंग आणि कार्डिओ असे विविध प्रकारचे वर्कआउट्स ती करते. रोज व्यायाम करण्यापेक्षा सातत्य महत्त्वाचे आहे, असे ती नेहमी सांगते. आहाराबाबत ती साधे खाण्याचा सल्ला देते. घरचे, पोषणमूल्यांनी भरलेले अन्न, प्रथिने, भाज्या आणि पाणी यावर तिचा भर असतो. अतिखाणे, जंक फूड आणि साखर ती शक्यतो टाळते. मानसिक आरोग्यालाही ती तितकेच महत्त्व देते. ध्यान, सकारात्मक विचार, स्वतःसाठी वेळ काढणे आणि झोप पूर्ण घेणे या गोष्टी तिच्या दिनक्रमाचा भाग आहेत. त्यामुळेच मंदिरा बेदी केवळ फिटनेसच नव्हे, तर आत्मविश्वास, शिस्त आणि सकारात्मक जीवनशैलीसाठीही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. ज्या वयात ताकद कमी व्हायला लागते, त्या वयात माझी ताकद वाढत आहे असे ठामपणे मंदिराने सांगितले. त्याचे गुपित म्हणजे माझा सप्लिमेंट.  

हर्बललाइफ या पॉडकास्ट चॅनलशी संवाद साधताना मंदिरा बेदीने सप्लिमेंट्सबद्दलही सांगितले. अनेक जण वर्कआऊट आणि डाएटसाठी सप्लिमेंट्सवर अवलंबून असतात. मात्र माझ्या आयुष्यात माझी व्यायाम न चुकता करण्याची सवयच सप्लिमेंट सारखे काम करते. वेगळी सप्लिमेंट घ्यायची गरज नसते. जर तुम्ही सातत्य ठेवले तर गोळ्यांवर आधारीत राहावे लागत नाही. त्यात घेण्याऐवजी नैसर्गिकरित्या फिट राहण्याकडे लक्ष द्या. त्याचा फायदा जास्त होईल. असे मंदिरा बेदी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.  

Web Title : मंदिरा बेदी ने बताया फिट बॉडी का राज़: नहीं है कोई जादुई गोली!

Web Summary : 53 वर्षीय मंदिरा बेदी लगातार व्यायाम, स्वस्थ आहार और सकारात्मक जीवनशैली से फिट रहती हैं। वह सप्लीमेंट्स की बजाय प्राकृतिक फिटनेस पर जोर देती हैं, संतुलित भोजन, नियमित कसरत और मानसिक कल्याण की वकालत करती हैं।

Web Title : Mandira Bedi Reveals Secret to Fit Body: No Magic Pill!

Web Summary : Mandira Bedi, at 53, stays fit with consistent exercise, a healthy diet, and a positive lifestyle. She emphasizes natural fitness over supplements, advocating for balanced meals, regular workouts, and mental well-being.