बॉलिवूडची 'बोल्ड आणि ब्युटीफुल' अभिनेत्री मल्लिका शेरावत तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. वाढत्या वयातही ती ज्या पद्धतीने स्वतःला तंदुरुस्त ठेवते, ते अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. मल्लिका फिट राहण्यासाठी फक्त डाएट किंवा जिमवर अवलंबून न राहता योगाला देखील विशेष महत्त्व देते. योगामुळे शरीर लवचिक राहते, मन शांत होतं आणि आतून ऊर्जा मिळते, असं ती स्वतः सांगते. खास करून तिच्या फिटनेस रुटीनमध्ये दोन योगासनांचा समावेश ती आवर्जून करते, ज्यामुळे शरीर सडपातळ राहण्यास, स्नायू मजबूत होण्यास आणि तणाव कमी होण्यास मदत होते(Mallika Sherawat yoga for flat stomach).
मल्लिकाच्या मते, फिट राहण्यासाठी तासंतास एक्सरसाइज करण्यापेक्षा योगासने करणे अधिक फायदेशीर ठरते. अशाच दोन खास योगासनांचा ती नियमित सराव करते, ज्यामुळे तिची लवचिकता आणि स्टॅमिना वाढण्यास मदत होते. वयाची (Mallika Sherawat fitness yoga secret) चाळिशी ओलांडल्यानंतरही मल्लिका कमालीची फिट आणि तरुण दिसण्यासाठी नेमकी कोणती २ योगासनं करते ते पाहा...
मल्लिका शेरावत करते २ योगासनं म्हणून आहे इतकी फिट...
१. अधो मुख श्वानासन :-
हे आसन करताना शरीराचा आकार इंग्रजी 'V' अक्षरासारखा (उलटा) दिसतो. मल्लिका शेरावत तिच्या शरीराची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी आणि स्नायूंना मजबुती देण्यासाठी या आसनाचा नियमित सराव करते.
आसन करण्याची योग्य पद्धत...
१. जमिनीवर पोटावर झोपा किंवा गुडघ्यावर उभे राहून हाताचे तळवे जमिनीवर टेकवा. २. श्वास सोडत हळूहळू कंबर वरच्या दिशेला उचला आणि गुडघे ताठ करा. ३. तुमचे हात आणि पाय सरळ असावेत, जेणेकरून शरीराचा 'V' आकार तयार होईल. ४. टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा आणि डोके दोन हातांच्या मध्ये ठेवा. ५. या स्थितीत ३० ते ६० सेकंद राहा आणि दीर्घ श्वास घ्या.
अधो मुख श्वानासनाचे फायदे...
१. हे आसन हात, खांदे, पाय आणि पाठीच्या कण्याला उत्तम स्ट्रेच देते.
२. डोके खालच्या दिशेला असल्यामुळे मेंदूकडे रक्ताचा प्रवाह वाढतो, ज्यामुळे चेहरा उजळतो आणि मानसिक तणाव कमी होतो.
३. नियमित सरावामुळे हाताचे आणि पायांचे स्नायू मजबूत होतात.
४. पोटाच्या स्नायूंवर दाब पडल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
२. ऊर्ध्व मुख श्वानासन :-
हे आसन पाठीच्या कण्याला लवचिक बनवण्यासाठी आणि शरीराचा पुढचा भाग स्ट्रेच करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. मल्लिका शेरावत तिचे 'बॉडी पोश्चर' सुधारण्यासाठी आणि पोटाचे स्नायू टोन करण्यासाठी हे आसन आवर्जून करते.
आसन करण्याची योग्य पद्धत...
१. जमिनीवर पोटावर पालथे झोपा आणि पाय सरळ मागे ठेवा. २. हाताचे तळवे छातीच्या बाजूला जमिनीवर टेकवा. ३. श्वास घेताना हळूहळू शरीराचा वरचा भाग (छाती आणि कंबर) वर उचला. ४. हाताचे कोपर सरळ ठेवा आणि मान वरच्या दिशेला करून छताकडे पहा. ५. या स्थितीत शरीराचे वजन केवळ हाताचे तळवे आणि पायांच्या वरच्या भागावर असावे (गुडघे जमिनीपासून थोडे वर उचला). ६. १५ ते ३० सेकंद या स्थितीत राहून हळूहळू सामान्य स्थितीत परत या.
ऊर्ध्व मुख श्वानासनाचे फायदे...
१. हे आसन पाठीच्या कण्याला उत्तम व्यायाम देते, ज्यामुळे पाठदुखी कमी होण्यास मदत होते.
२. श्वास घेण्याची क्षमता वाढते आणि फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते.
३. पोटावर ताण पडल्यामुळे तिथली चरबी कमी होण्यास आणि स्नायू टोन्ड होण्यास मदत होते.
४. हे आसन केल्याने शरीरात नवी ऊर्जा मिळते आणि मानसिक थकवा कमी होतो.
Web Summary : Mallika Sherawat stays fit with yoga, not just diet. She favors two asanas: Adho Mukha Shvanasana and Urdhva Mukha Shvanasana, enhancing flexibility, muscle strength, and reducing stress for a toned body.
Web Summary : मल्लिका शेरावत केवल डाइट से नहीं, योग से फिट रहती हैं। वह दो आसन करती हैं: अधो मुख श्वानासन और ऊर्ध्व मुख श्वानासन, जो लचीलापन, मांसपेशियों की ताकत बढ़ाते हैं और तनाव कम करके शरीर को टोन करते हैं।