Join us

वयाच्या पन्नाशीतही मलायका अरोरा दिसते तरुण- करते 'या' ३ साध्या गोष्टी- परफेक्ट फिगरचे सिक्रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2025 09:35 IST

Malaika Arora fitness: Malaika Arora beauty secrets: Malaika Arora young look: मलायका अरोरा वजन कमी करण्यासाठी करते खास ३ टिप्स

बॉलिवूडमधील सगळ्यात फिट सेलिब्रेटींपैकी एक मलायका अरोरा मानली जाते.(Malaika Arora fitness) वयाच्या पन्नाशीतही तिच्या शरीरयष्टीत आणि त्वचेमुळे आजही तरुण दिसते.(Malaika Arora beauty secrets) तिच्या या फिटनेस मागचं रहस्य म्हणजे नियमित योगा, संतुलित आहार. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी फक्त ती व्यायामच करत नाही तर योग्य पद्धतीचा आहार देखील घेते. (Malaika Arora young look)सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये तिने सांगितलं की, वयाच्या पन्नाशीतही मी इतकी फिट कशी दिसते.(Malaika Arora young look) यामागे अनेक कारण आहे. पण पुरेसा आहार आणि योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास आपण फिट राहू शकतो.(Bollywood fitness secrets) स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी ती कसा आहार घेते जाणून घेऊया.(Celebrity fitness tips)

नारळाच्या तेलात मिसळा स्वयंपाकघरातील १ गोष्ट, असरदार उपाय- केसांची वाढ होईल दुपटीने, गळणंही थांबेल

मलायका अरोरा फिट राहण्यासाठी ३ साध्या सोप्या गोष्टी करते. झोप, पोषण आणि मन. या तीन गोष्टी लक्षात ठेवून ती स्वत:ला तंदुरुस्त ठेवते. ती म्हणते वय हा माझ्यासाठी केवळ आकडा आहे. खाण्यापिण्याबद्दल तिने चाहत्यांना सल्ला दिला की, मी कायम घरी बनवलेले अन्नपदार्थ खाते. दिवसभराच्या जेवणात तुपाचा समावेश करते. ती म्हणते तूप हे तिचे सुपरफूड आहे. याशिवाय ती भरपूर पाणी पिते आणि पुरेशी झोप देखील घेते. 

वर्कआउटनंतर सप्लिमेंट्स घेण्याऐवजी मलायका घरी बनवलेले टोस्ट, उकडलेली अंडी आणि डोसे खाते. याशिवाय प्रोटीन शेकमध्ये केळी, खजूर आणि सुकामेव्याचा समावेश करते. दिवसभरात ती फक्त एकदा जेवते. ती म्हणते मी स्वत:ला उपाशी ठेवत नाही पण आहाराचे संतुलन राखते. ज्यामुळे माझं वजन नियंत्रणात राहातं. 

तिच्या फिटनेस सिक्रेट्सपैकी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकारात्मक दृष्टीकोन. मानसिक स्वास्थ्य आणि आनंदी मन हे तिला नेहमी ताजेतवाने ठेवतात. तणावावर मात करण्यासाठी ती मेडिटेशनचा आधार घेते. याशिवाय ती पिलाटेस आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगलाही प्राधान्य देते. पिलाटेसमुळे तिचे कोअर मसल्स मजबूत राहतात आणि शरीराचा बॅलन्स सुधारतो. आठवड्यातून किमान चार ते पाच दिवस ती नियमित वर्कआऊट करते. 

टॅग्स :फिटनेस टिप्समलायका अरोरा