Join us
Daily Top 2Weekly Top 5

मलायका अरोरा म्हणते १० मिनिटांचा ‘हा’ चिनी व्यायाम करा, तुमच्या औषधंगोळ्या कायमच्या होतील बंद...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2026 15:17 IST

Malaika Arora Fitness Secret : Qi Gong for weight loss : मलायकाला फिट ठेवणारा, नेमका कोणता आहे हा १० मिनिटांचा खास चायनीज 'मॅजिकल' एक्सरसाइज...

बॉलिवूडची 'स्टाईल आयकॉन' आणि 'फिटनेस क्वीन' म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर पहिलं नाव येतं ते म्हणजे मलायका अरोरा - खान. वयाची पन्नाशी ओलांडली असली, तरी मलायकाचा फिटनेस आणि तिची ग्लोइंग स्किन आजही कित्येक तरुण अभिनेत्रींना टक्कर देते. योग असो वा जिम, मलायका नेहमीच नवनवीन फिटनेस प्रयोग करत असते. पण सध्या सोशल मिडीयावर तिच्या एका वेगळ्या वर्कआऊटची चर्चा रंगली आहे(Malaika Arora Fitness Secret).

तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मलायका स्वतःला फिट ठेवण्यासाठी रोज फक्त १० मिनिटे एक खास 'चायनीज एक्सरसाइज' करते. कठीण वर्कआऊट्स, योगा आणि स्ट्रिक्ट डाएटसोबतच ती आपल्या डेली रुटीनमध्ये फक्त १० मिनिटांची खास चायनीज एक्सरसाइजही करते, जी शरीर आणि मन दोन्ही संतुलित ठेवण्यास मदत करते. ही साधी पण फायदेशीर एक्सरसाइज शरीराची लवचिकता वाढवते, स्ट्रेस कमी करते आणि फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी मोठी मदत करते. हा चायनीज (Malaika Arora Chinese Exercise) व्यायाम प्रकार नेमका काय आहे? कमी वेळात शरीराला चपळ आणि टोन्ड (Toned) बनवण्यासाठी हा चिनी प्रकार कसा फायदेशीर ठरतो? आणि तुम्ही घरच्या घरी हे 'मॅजिकल वर्कआऊट' कसं करू शकता?

नेमका काय आहे हा १० मिनिटांचा खास चायनीज 'मॅजिकल' एक्सरसाइज ?

मलायका अरोरा ज्या एक्सरसाइजचा सराव करते, तो चीनच्या प्राचीन परंपरांवर आधारित आहे. याला 'ची गोंग' (Qi Gong) किंवा 'उभे राहून केली जाणारी स्ट्रेचिंग' (Qi Gong for weight loss) असेही म्हणतात. या व्यायामाचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात शरीराची खूप वेगाने हालचाल करावी लागत नाही. त्याऐवजी, हळुवार हालचाली आणि दीर्घ श्वसनावर (Deep Breathing) पूर्ण लक्ष केंद्रित केले जाते. यामुळे शरीरातील ऊर्जेचा प्रवाह सुधारतो.

एक्सरसाइज करण्यासाठीची सुरुवात कशी करावी?

हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या जिम मशीनची गरज नाही. तुम्ही घरच्याघरीच हा व्यायाम प्रकार करण्याची सुरुवात करू शकता. एका शांत जागी ताठ उभे राहा. तुमच्या दोन्ही पायांमध्ये खांद्याइतके अंतर ठेवा. अतिशय संथ गतीने तुमचे हात वर आणि खाली न्या. हात वर नेताना दीर्घ श्वास घ्या आणि खाली आणताना हळूहळू श्वास सोडा. आता एका जागी सरळ उभे राहून शरीर थोडेसे पुढच्या बाजूला झुकवा. आपले दोन्ही हात छातीजवळ ठेवा, दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू उजव्या (Right) आणि डाव्या (Left) बाजूला वळा (Twist करा).

मेथी, अळशी सुपरफूड! पण चुकीच्या पद्धतीनं खाणं पडेल महागात - 'असं' खा, वजन- शुगर राहील कंट्रोलमध्ये... 

रिसर्च सांगतो, चक्क शिळी चपातीही आहे सुपरफूड! फक्त 'या' पद्धतीनं खा - वजन, डायबिटीस राहील नियंत्रणात... 

मलायका अरोरा हा चायनीज एक्सरसाइज का करते?

१. संपूर्ण शरीर डिटॉक्स (Full Body Detox) :- हा एक्सरसाइज केल्याने शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर टाकण्यास मदत होते. जेव्हा आपण संथ गतीने हालचाली करतो आणि दीर्घ श्वास घेतो, तेव्हा शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते. यामुळे रक्त शुद्ध होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.

२. तणाव आणि टेन्शन होते कमी (Reduce Stress) :- मलायकाचा हा १० मिनिटांचा एक्सरसाइज मानसिक ताण कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हा व्यायाम मन शांत करतो आणि तुम्हाला दिवसभर फ्रेश ठेवण्यास मदत करतो.

३. शरीराची लवचिकता (Flexibility) :- वाढत्या वयानुसार शरीर, सांधे आखडू लागतात. हा चायनीज व्यायाम प्रकार सांधेदुखीला दूर ठेवतो आणि शरीराला लवचिक बनवतो. म्हणूनच मलायका आज ५० व्या वर्षीही तितकीच फिट दिसते, जितकी ती २० वर्षांपूर्वी होती.

४. उत्तम पचनशक्ती (Better Digestion) :- श्वसनाची योग्य पद्धत आणि शरीराच्या हलक्या हालचालींमुळे पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते. हा व्यायाम मेटाबॉलिजमचा वेग वाढवतो, ज्यामुळे अन्न लवकर पचते आणि वजन नियंत्रणात राहते.

५. इन्स्टंट एनर्जी मिळते (Energy Level) :- जर तुम्ही मलायकाप्रमाणे रोजची फक्त १० मिनिटे काढून हा व्यायाम केला, तर तुमच्या शरीरातील ऊर्जेच्या पातळीत वाढ होऊ शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Malaika Arora's age-defying fitness secret: 10-minute Chinese exercise routine.

Web Summary : Malaika Arora, known for her fitness, stays trim with a 10-minute Qi Gong routine. This ancient Chinese practice improves flexibility, reduces stress, aids digestion, and boosts energy. It involves slow movements, deep breathing, and can be done at home.
टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्समलायका अरोरा