वय हा फक्त जिच्यासाठी एका आकडा आहे अशी बॉलिवूडमधील अभिनेत्री म्हणजे (Malaika Arora Exercise To Lose Thigh Fat & Get Apple Shaped Hips) 'मलायका अरोरा'. बॉलिवूडची फिटनेस क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या टोन्ड बॉडी आणि अॅक्टिव्ह लाईफस्टाईलमुळे (Malaika Arora shares her go to exercise to reduce thigh fat) कायमच चर्चेत असते. मलायकाचे वयवर्षे ५१ असूनही ती जितकी तरुण, आकर्षक, फिट आणि उत्साही दिसते, ते पाहून प्रत्येकजण थक्क होतो. मलायकाच्या सोशल मिडिया अकाउंटवर लाखो फॉलोअर्स (Malaika Arora Shows How To Get Apple Hips With Just One Exercise) आहेत, विशेषतः महिलांचा मोठा वर्ग तिला फॉलो करतो आणि तिच्या फिटनेस टिप्स व वर्कआउट व्हिडिओज पाहून प्रेरणा घेतात(Malaika Arora Does Dumbbell Squats Exercise For Thigh Fat Loss).
मलायका अरोराच्या टोन्ड बॉडीचं आणि फिटनेसचं रहस्य नेमकं काय आहे, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. अलीकडेच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तिने स्वतःच्या टोन्ड, सुंदर आणि योग्य शेपमध्ये असणाऱ्या थाईज आणि फिगरचे सिक्रेट शेअर केलं आहे. तिच्या या पोस्टनंतर पुन्हा एकदा तिचा फिटनेस आणि शेपमध्ये असणारे फिगर व थाईज हा चर्चेचा विषय ठरला आहे. आपल्यापैकी बऱ्याचजणींच्या मांड्यांकडील भाग हा फारच मोठा व जाडजूड असल्याने आपल्या फिगरचा शेप बिघडतो. परफेक्ट अॅप्पल शेप हीप्स व थाईज मिळवण्यासाठी मलायका (Malaika Arora) न चुकता एक खास एक्सरसाइज करते तो नेमका कोणता ते पाहूयात.
टोन्ड आणि परफेक्ट अॅप्पल शेप हीप्स मिळवण्यासाठी मलायका करते....
नियमित योगाभ्यास, संतुलित आहार आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग हे मलायका अरोराच्या फिटनेस आणि टोन्ड फिगरच मुख्य सिक्रेट आहे. अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या एक्सरसाइजच्या डेली रुटीनमध्ये अशा काही खास एक्सरसाज समाविष्ट करते ज्यामुळे तिचं शरीर तंदुरुस्त, बळकट आणि लवचिक ठेवण्यास मदत होते.
अलीकडेच मलायकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती असा एक एक्सरसाइज दाखवते जो मांडीवरील अतिरिक्त चरबी कमी करण्यास आणि परफेक्ट फिगर मिळवण्यासाठी मदत करतो. मलायका दररोज प्रत्येकी १५ डंबल हाफ स्क्वॅट्सचे ३ सेट करते. या एक्सरसाइजमुळे तिच्या मांडीवरील चरबी कमी होते तसेच कंबर अधिक आकर्षक आणि टोन्ड दिसते. त्यामुळे तिचा हा फिटनेस सिक्रेट अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आणि फायदेशीर ठरणारा असाच आहे.
डंबेल हाफ स्क्वॅट्स म्हणजे नेमकं काय ?
डंबेल हाफ स्क्वॅट्स हा एक प्रकारचा डंबेलसोबत केला जाणारा स्क्वॅट एक्सरसाइज आहे, ज्यामध्ये व्यक्ती पूर्णपणे खाली बसत नाही तर अर्धवट स्क्वॅट पोझिशनमध्ये बसतो. या एक्सरसाइज प्रकारात दोन्ही हातात एकेक डंबेल पकडले जातात, ज्यामुळे शरीरावर अतिरिक्त भार येतो आणि स्नायूंवर अधिक ताण निर्माण होतो.
डंबेल हाफ स्क्वॅट्स खास करून मांड्या, नितंब (हिप्स) आणि कंबर या भागांवर परिणाम करतात. या एक्सरसाइजमुळे शरीराच्या खालच्या भागातील स्नायू अधिक बळकट होतात, फॅट्स कमी होते आणि शरीराचा आकार अगदी योग्य मापात आणि टोन्ड होतो. त्यामुळे मांडी, नितंब आणि कंबरेचा भाग अधिक आकर्षक आणि मजबूत दिसतो.
सलमान खानच्या ट्रेनरने सांगितले सेलिब्रिटी फिटनेस सिक्रेट! रोज करतात ३ गोष्टी, दिसतात देखणे...
डंबेल हाफ स्क्वॅट्स करण्याची योग्य पद्धत :-
१. दोन्ही पाय खांद्याच्या रुंदीएवढे अंतर ठेवून सरळ उभे रहा.
२. दोन्ही हातात समान वजनाचे डंबेल पकडा आणि हात शरीराच्या दोन्ही बाजूला ठेवा.
३. पाठ व मान पूर्णपणे सरळ व ताठ ठेवा आणि नैसर्गिक स्थितीत ठेवा.
४. हळूहळू गुडघ्यांना वाकवत कंबर खाली झुकवा, पण पूर्णपणे बसू नका – अर्धवट स्क्वॅट स्थितीत या.
५. या स्थितीत २ ते ३ सेकंद रहा जेणेकरून स्नायूंवर योग्य ताण येईल.
६. परत उभे रहा – हळूहळू मूळ स्थितीत या.
७. प्रत्येकी १५ प्रमाणे एकूण ३ सेट पूर्ण करा.
डंबेल हाफ स्क्वॅट्स करण्याचे फायदे...
डंबेल हाफ स्क्वॅट्स शरीराच्या खालच्या भागाला टोन आणि बळकट करण्यास मदत करतात. या एक्सरसाइजमुळे अनेक फायदे मिळू शकतात. मांड्यांची चरबी लवकर कमी होते. कंबर आणि मांडयांना परफेक्ट शेप मिळतो. पाय आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात.