बहुतांश महिलांच्या बाबतीत असं दिसून येतं की त्यांचे हात, पाय अगदी सुडौल असतात. गळा, मान, कंबर या भागातही जास्त चरबी नसते. पण त्यांचे पोट मात्र सुटलेले असते. बाकी शरीर प्रमाणबद्ध आणि पोट मात्र सुटलेले अशी कित्येक जणींची अडचण आहे. आता पहिल्या बाळांतपणानंतरही बहुसंख्य महिलांचा ओटीपोटाचा घेर वाढतो. ते एक नैसर्गिक कारण आहेच (simple tips to lose belly fat). पण त्या व्यतिरिक्त इतरही अनेक कारणं आहेत ज्यामुळे पोटाचा भाग वाढत जातो (how to reduce belly fat?). ती कारणं कोणती आणि त्यावर काय उपाय करायचे ते पाहूया..(main reasons for belly fat)
पोटाचा वाढलेला घेर वाढण्यामागची कारणं
१. व्यायाम न करणे किंवा पोटाशी संबंधित व्यायाम न करणे, शारिरीक हालचाल खूप कमी असणे, बैठ्या कामाचे प्रमाण जास्त असणे ही काही कारणं पोटाचा घेर वाढवितात.
२. तिशी- पस्तीशीनंतर महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होत जातात. या बदलांचा परिणाम म्हणूनही ओटी पोट किंवा पोटावरचा घेर वाढत जातो.
महागडे शाम्पू लावूनही केस गळणं थांबेना? 'हा' घरगुती शाम्पू लावा, महिनाभरात फरक दिसेल..
३. तुमच्या आहारात जर साखर, मैदा, जंकफुड, पॅकफूड असे पदार्थ खूप असतील आणि त्या तुलनेत शारिरीक हालचाल मात्र कमी होत असेल तर पचनक्रिया, चयापचय क्रिया बिघडत जाते आणि त्यामुळेही पोटावरची चरबी वाढत जाते.
४. सतत अपुरी झोप होत असेल तर त्यामुळे शरीरातल्या हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि त्याचाही परिणाम म्हणजे पोटाचा घेर वाढत जातो.
पोटाचा घेर कमी कसा करावा?
१. नियमितपणे व्यायाम करणे हा एक उत्तम उपाय आहे. त्यातही पोटाचे स्नायू ताणले जातील, त्यांचा चांगला व्यायाम होईल अशा पद्धतीचे व्यायाम तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावे.
२. खाण्यापिण्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. शिवाय रात्रीची झोप पुरेशी घेणेही खूप महत्त्वाचे आहे.
मराठवाडा स्पेशल उकड शेंगोळे: बेत असा फक्कड की भारीतले भारी पदार्थ पडतील फिके, पाहा पारंपरिक रेसिपी
३. रात्री झोपण्यापुर्वी पोटाला कोमट तेल लावून मालिश करा. त्यानंतर एक टर्किशचा टॉवेल गरम पाण्यात बुडवून घट्ट पिळून घ्या आणि त्यानंतर तो पोटावर ठेवा. यामुळेही पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती तज्ज्ञांनी healyourselfwith_manasikrishna या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
