Join us
Daily Top 2Weekly Top 5

करिना कपूरसारखं फिट आणि सुंदर दिसण्याचं सिक्रेट, आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर सांगतात स्वत:ला ३ सवयी लावा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2025 15:08 IST

Kareena kapoor nutritionist rujuta diwekar shared 3 fitness habits for healthy lifestyle easy diet tips : बिझी लाईफस्टाईल, वेळेची कमतरता असणाऱ्यांसाठी ऋजुता दिवेकर सांगतात स्वतःला लावा ३ सवयी, व्हाल फिट व हेल्दी...

सध्याच्या धावपळीच्या, सतत बदलत्या आणि बिझी लाईफस्टाईलमध्ये स्वतःचे आरोग्य व फिटनेस कडे लक्ष देणे थोडे कठीण होते. दिवसभरात पुरेसा वेळही मिळत नाही स्वतःकडे लक्ष देण्यासाठी... ऑफिसची कामे, घरच्या जबाबदाऱ्या आणि इतर धावपळीमुळे अनेकदा आपली लाईफस्टाईल पूर्णपणे बिघडून जाते, ज्याचा थेट परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. या सगळ्यात हेल्थ, फिटनेस हा विषय मागेच पडतो, अशाप्रकारे वारंवार आरोग्य आणि फिटनेसकडे दुर्लक्ष केल्याने अनेक गंभीर आजार आणि वेगवेगळ्या शारीरिक समस्या सतावतात. परंतु, या बिझी लाईफस्टाईलमध्येही स्वतःला फिट आणि हेल्दी ठेवणे शक्य आहे. सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आणि प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर (Rujuta Diwekar) यांनी खास अशा काही सोप्या पण फायदेशीर टिप्स शेअर केल्या आहेत, ज्या आपल्या डेली लाईफस्टाईलचा भाग बनवून आपण आरोग्यदायी जीवन जगू शकतो(Kareena kapoor nutritionist rujuta diwekar shared 3 fitness habits for healthy lifestyle easy diet tips).

फिट आणि एनर्जेटिक राहण्यासाठी रोज तासंतास जिममध्ये घालवण्याची गरज नसते, हेच प्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर ऋजुता दिवेकर सतत सांगत असतात. त्यांनी नुकत्याच काही फिटनेस टिप्स शेअर केल्या आहेत ज्या कोणत्याही बिझी शेड्यूलमध्ये सहजपणे करता येऊ शकतात आणि आपले शरीर व  मन दोन्ही तंदुरुस्त ठेवणे शक्य होते. बिझी लाईफस्टाईल, वेळेची कमतरता असलेल्या लोकांसाठी या टिप्स अगदी वरदान ठरू शकतात. या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये ऋजुता दिवेकर यांनी सांगितलेल्या फिटनेस आणि हेल्दी राहण्याच्या खास टिप्स कोणत्या ते पाहूयात... 

हेल्थ आणि फिटनेस सांभाळण्यासाठी स्वतःला लावा ३ खास सवयी... 

१. सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर ऋजुता दिवेकर म्हणतात की, आजकाल 'हेल्दी खाणे' या नावाखाली एवोकॅडो, ब्रोकोली किंवा ड्रॅगन फ्रुट अशा परदेशी भाज्या व फळे भरपूर प्रमाणांत खाल्ल्या जातात, पण आपल्या नेहमीच्या आहारात प्रत्येक आवश्यक पोषक तत्व उपलब्ध असलेली स्थानिक फळे व भाज्यांचा समावेश  करावा. त्या सल्ला देतात की, तुम्ही आठवड्यातून किमान तीन वेळा तुमच्या आहारात कंद-मूळ भाज्या जसे की, अरबी, सुरण, रताळे यांसारख्या भाज्यांचा नक्कीच समावेश करावा. फिट आणि हेल्दी राहण्यासाठी किंवा वेटलॉस करण्यासाठी सर्वातआधी बाहेरचे अन्नपदार्थ खायचे सोडून घरचे जेवण जेवायला सुरुवात केली पाहिजे. ज्यात प्रत्येक प्रकारच्या सिझनल भाज्या, फळे आणि लोकल फूड, स्थानिक त्या त्या भागात पिकणारी जाणारी धान्ये व कडधान्ये यांचा समावेश असावा. याशिवाय, जेवणाच्या वेळा पाळणे आणि वेळेवर झोपा, या गोष्टी फॉलो केल्यामुळे शरीराचे मेटाबॉलिझम चांगले राहील. तसेच, पुरेशी झोप घेतल्याने कॉर्टिसोलची पातळी वाढणार नाही आणि वजन कमी करण्यास मदत होईल इतकेच नाही दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक देखील वाटेल. 

फॅटी लिव्हरचा होतो भरपूर त्रास ? करा फक्त एका लिंबाचा खास उपाय - पैसे खर्च न करता टळेल दुखणं...

थंडीच्या दिवसात जेव्हा त्वचा कोरडी होते किंवा केस रूक्ष वाटू लागतात, तेव्हा कंद मुळांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीराला आतून उबदार ठेवतात आणि आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात. या भाज्यांमध्ये असलेले प्रीबायोटिक गुणधर्म तुमच्या पचन तंत्राला निरोगी ठेवतात. यामुळे गॅस, पोट फुगणे किंवा पोटदुखी यांसारख्या समस्या हळूहळू कमी होऊ लागतात. ऋजुता दिवेकर सांगतात की, या भाज्यांचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे हार्मोनल संतुलन राखणे. जर तुम्हाला मासिक पाळीत अनियमितता असेल, मेनोपॉजची लक्षणे जाणवत असतील किंवा हॉट फ्लॅशेस सारखी समस्या असेल, तर या भाज्यांचा आहारात समावेश करणे खूप फायदेशीर ठरते. तुम्ही या भाज्यांचा समावेश सकाळच्या नाश्त्यात, दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात किंवा संध्याकाळी ४ ते ६ या वेळेतील स्नॅकच्या रूपात करू शकता.

२. सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर ऋजुता दिवेकर म्हणतात की, फिटनेस फक्त जिममध्ये घाम गाळल्याने नव्हे, तर लहान - सहन सवयींमधून देखील येतो. रात्रीच्या जेवणानंतर रोज फक्त १० मिनिटे फिरायला नक्की जा. ही अगदी छोटी सवय तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करते. संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर किमान १० मिनिटे चालल्याने पचन क्रिया सुधारते, गॅस कमी होतो आणि चांगली झोप येते. विशेषतः ज्या लोकांची रक्तातील साखर थोडी जास्त असते, त्यांच्यासाठी ही सवय अत्यंत फायदेशीर ठरते. यामुळे ब्लड सर्क्युलेशन योग्य पद्धतीने होते आणि शरीराला हलकेपणा जाणवतो.

लघवीला उग्र दुर्गंधी येते ? दुर्लक्ष करू नका, लघवीतील 'या' बदलांकडे दुर्लक्ष केल्यास पडू शकते महागात... 

३. आजच्या काळात जास्त 'स्क्रीन टाइम' ही सर्वात मोठी आरोग्य समस्या बनली आहे. आपण दिवसभर मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीमध्ये इतके व्यस्त होतो की स्वतःसाठी वेळच शिल्लक राहत नाही. ऋजुता दिवेकर सांगतात की, रात्री झोपण्यापूर्वी ३० मिनिटे आणि सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटे कोणत्याही स्क्रीनला हात लावू नका. ही सवय तुमच्या मेंदूला शांत करते आणि तुम्हाला दिवसभरातील विचारांना समजून घेण्यासाठी वेळ देते. मेंदू नको असलेल्या गोष्टी आपोआप फिल्टर करू लागतो. यामुळे तुम्हाला जास्त लक्ष केंद्रित केलेले, सकारात्मक आणि भावनिकरित्या स्थिर असल्याचा अनुभव येतो.

पोटाची ढेरी, कंबरेचे टायर्स कमी करायचे? मग आहारात हवेच ५ पदार्थ - झरझर उतरेल चरबी, व्हाल फिट...  

English
हिंदी सारांश
Web Title : Rujuta Diwekar's secrets to Kareena Kapoor-like fitness and beauty.

Web Summary : Celebrity nutritionist Rujuta Diwekar shares three simple habits for a healthy lifestyle: prioritize local, seasonal foods; walk for 10 minutes after dinner; and avoid screen time before bed and after waking up.
टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्य