Join us

चालूनच काय सायकलिंग करुनही पोट कमी होत नाही, करा ‘या’ ४ गोष्टी-पोट होईल सपाट सुपरफास्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2025 19:25 IST

How To Reduce Belly Fat: सुटलेलं पोट कमी कसं करायचं हा प्रश्न तुमच्यासमोरही असेल तर तज्ज्ञांनी सांगितलेल्या या काही टिप्स पाहा..(5 tips to get perfect figure and toned body)

ठळक मुद्देया काही गोष्टी किमान ३ महिने तरी नियमितपणे करा. स्वत:ला तेवढा वेळ द्या. तरच तुमचं पोट कमी होऊन शरीरही परफेक्ट शेपमध्ये आलेलं दिसेल. 

सुटलेलं पोट कमी कसं करायचं हा प्रश्न कित्येकींना छळतो. बहुतांश महिलांना तर पहिल्या बाळंतपणानंतर हा त्रास होतोच. बाकी शरीर अगदी प्रमाणात असतं. पण पोट मात्र काही केल्या कमी होत नाही. त्यामुळे मग विनाकारणच आपण बेढब, लठ्ठ दिसायला लागतो. साडी नेसल्यावर तर कित्येकींचं पोट खूपच मोठं दिसतं. पोट कमी करण्यासाठी एकच एक व्यायाम करून उपयोग नाही (5 tips to get perfect figure and toned body). शिवाय नुसताच व्यायामावर भर देऊनही ते फायद्याचं नाही (how to reduce belly fat?). म्हणूनच पोटावरची चरबी कमी करण्यासाठी नेमकं काय करायला हवं याविषयी तज्ज्ञांनी सांगितलेली ही माहिती एकदा बघा..(expert's tips for weight loss and reducing belly fat)

 

पोटावरची चरबी कशी कमी करावी?

सुटलेलं पोट कमी करून टोन्ड बॉडी मिळविण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या टाळाव्या याविषयीची माहिती फिटनेस ट्रेनरने mansigaikwad या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेल्या ५ महत्त्वाच्या गोष्टी-

दीप अमावस्येला घरासमोर दिव्यांची रांगोळी हवीच! बघा ७ सोपे डिझाईन्स, घरात वाटेल प्रसन्न, मंगल

१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पोट कमी करण्यासाठी रनिंग, सायकलिंग, वॉकिंग असे फक्त कार्डिओ व्यायाम करून उपयोग नाही. पोटावरची चरबी कमी करायची असेल तर त्याच्या जोडीला स्क्वॅट्स, लंजेस, डंबेल्स असे काही स्ट्रेन्थ व्यायामही करायला हवे. कारण यामुळे मसल्स वाढतात आणि त्यामुळे शरीराला चांगला आकार येतो.

 

२. शरीराला एक प्रमाणबद्ध आकार आणायचा असेल तर व्यायामाच्या जोडीने आहारातले प्रोटीन्सचे प्रमाणही वाढवायला हवे. कारण प्रोटीन्समुळे मसल्सची ताकद वाढते, त्यामुळे स्नायूंमधला, त्वचेमधला सैलपणा कमी होतो. त्यामुळे वय वाढले तरी आपली बाॅडी फिट दिसते.

दीप अमावस्या २०२५: कणकेचा दिवा करण्याची सोपी पद्धत- कमी तेलात दिवा जास्त वेळ उजळेल

३. पोट कमी करून टोन्ड बाॅडी मिळविण्यासाठी आपल्या जिभेवरही खूप नियंत्रण ठेवायला हवे. जंकफूड, प्रोसेस्ड फूड, गोड पदार्थ, आईस्क्रीम, चाॅकलेट खाणे खूप कमी करायला हवे.

 

४. दर दिवशी अडीच ते तीन लीटर पाणी पिणे आणि त्याचबरोबर रात्रीची झोप ७ ते ८ तासांची होणेही खूप गरजेचे आहे. या काही गोष्टी किमान ३ महिने तरी नियमितपणे करा. स्वत:ला तेवढा वेळ द्या. तरच तुमचं पोट कमी होऊन शरीरही परफेक्ट शेपमध्ये आलेलं दिसेल. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामवेट लॉस टिप्सअन्न