lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > जान्हवी कपूरचं rope workout जबरदस्त व्हायरल! काय या व्यायामाचे फायदे, कुणालाही सहज करता येतो का?

जान्हवी कपूरचं rope workout जबरदस्त व्हायरल! काय या व्यायामाचे फायदे, कुणालाही सहज करता येतो का?

श्रीदेवी कन्या जान्हवी कपूरने नुकतेच तिचे फोटो आणि व्हिडियो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती rope workout करताना दिसत आहे... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 04:04 PM2021-09-28T16:04:57+5:302021-09-28T16:05:50+5:30

श्रीदेवी कन्या जान्हवी कपूरने नुकतेच तिचे फोटो आणि व्हिडियो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती rope workout करताना दिसत आहे... 

Janhvi Kapoor's rope workout goes viral! What are the benefits of this exercise, can anyone do it easily? | जान्हवी कपूरचं rope workout जबरदस्त व्हायरल! काय या व्यायामाचे फायदे, कुणालाही सहज करता येतो का?

जान्हवी कपूरचं rope workout जबरदस्त व्हायरल! काय या व्यायामाचे फायदे, कुणालाही सहज करता येतो का?

Highlightsजान्हवीने तिचे काही फोटो आणि व्हिडियो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून यामध्ये सगळ्यात जास्त लक्षवेधी ठरला आहे तो जान्हवीचा जबरदस्त फिटनेस.

जान्हवी कपूर सोशल मिडियावर चांगलीच ॲक्टीव्ह असते. तिचे वेगवेगळे फोटोशूट, लूक ती नेहमीच शेअर करते. नुकतेच जान्हवीने तिचे काही फोटो आणि व्हिडियो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून यामध्ये सगळ्यात जास्त लक्षवेधी ठरला आहे तो जान्हवीचा जबरदस्त फिटनेस. जान्हवी आणि तिची फिटनेस ट्रेनर नम्रता पुरोहीत फोटो आणि व्हिडियोमध्ये व्यायाम करताना दिसत आहेत. वर्कआऊट करताना जान्हवीची दिसून येणारी एनर्जी तिच्या चाहत्यांनाही वर्कआऊट करण्यासाठी प्रोत्साहन देणारी आहे. वर्कआऊटचे हेच फोटो आणि व्हिडियो नम्रताने देखील इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. "@janhvikapoor I've got your back." अशी कॅप्शन नम्रताने या व्हिडियोला दिली आहे. 

 

नम्रता पुरोहित ही जान्हवीची पिलेट्स ट्रेनर असून सध्या ती जान्हवीला rope workout चे ट्रेनिंग देत आहे. करिना कपूर, मलायका अरोरा, सारा अली खान, पुजा हेगडे अशा बॉलीवूडच्या बड्या हस्ती देखील नम्रता पुरोहित हिच्याकडे फिटनेस ट्रेनिंग घेतात. आता या लाईनमध्ये जान्हवीदेखील आली आहे. जान्हवी तिच्या फिटनेस आणि वर्कआऊट बाबतीत प्रचंड जागरुक असून तिचं फिटनेस रुटीन ती सहसा कधीच डिस्टर्ब होऊ देत नाही.

 

यापूर्वी जान्हवीने अनेकदा तिचे योगा करतानाचे फोटो देखील सोशल मिडियावर शेअर केले आहेत. आता सध्या तिचं rope workout सोशल मिडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. rope workout केल्यामुळे स्नायूंना बळकटी मिळते आणि बाॅडी टोन होण्यास मदत होते, असं म्हणतात. 

 

rope workout करण्याचे फायदे
१. rope workout केल्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. त्यामुळेच त्याला full-body workout म्हणून ओळखलं जातं.
२. पाठ, दंड, पोट आणि मांड्यांच्या स्नायुंना या वर्कआऊटमुळे बळकटी मिळते.
३. rope workout मध्ये आणखीही काही वेगवेगळे प्रकार येतात. यामुळे पायांच्या स्नायूंना देखील मजबूती येते आणि लेग टोन करण्यासाठीही ते वर्कआऊट फायद्याचे ठरते. 


४. फॅट बर्नसाठी हे वर्कआऊट अतिशय उपयुक्त आहे.
५. खांदे, हिप्स, गुडघे, घोटे आणि तळपाय यांची लवचिकता वाढविण्यासाठीही rope workout उपयुक्त आहे. 
६. शरीराचे संतूलन सांभाळण्यासाठी आणि सर्व अवयवांमध्ये सुसूत्रता विकसित होण्यासाठीही rope workout केले जाते. 

 

Web Title: Janhvi Kapoor's rope workout goes viral! What are the benefits of this exercise, can anyone do it easily?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.