Lokmat Sakhi >Fitness > रोज योगा करता; पण त्यासोबतच 'या' चुकाही करत असाल तर फायद्यापेक्षा नुकसानच जास्त.. 

रोज योगा करता; पण त्यासोबतच 'या' चुकाही करत असाल तर फायद्यापेक्षा नुकसानच जास्त.. 

International Yoga Day 2025: योगा करताना कित्येक लोक ज्या काही कॉमन चुका करतात, त्या नेमक्या कोणत्या याविषयीची माहिती आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी शेअर केली आहे.(Rujuta Divekar says avoid these 3 common mistakes while doing yogasana)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2025 16:46 IST2025-06-19T16:44:00+5:302025-06-19T16:46:24+5:30

International Yoga Day 2025: योगा करताना कित्येक लोक ज्या काही कॉमन चुका करतात, त्या नेमक्या कोणत्या याविषयीची माहिती आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी शेअर केली आहे.(Rujuta Divekar says avoid these 3 common mistakes while doing yogasana)

International Yoga Day 2025, rujuta divekar says avoid these 3 common mistakes while doing yogasana  | रोज योगा करता; पण त्यासोबतच 'या' चुकाही करत असाल तर फायद्यापेक्षा नुकसानच जास्त.. 

रोज योगा करता; पण त्यासोबतच 'या' चुकाही करत असाल तर फायद्यापेक्षा नुकसानच जास्त.. 

Highlightsआहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर असं सांगतात की योगा करणारे बरेच जण काही एकसारख्या चुका करतात.

मन आणि शरीर या दोन्ही गोष्टी फिट ठेवायच्या असतील तर योगासारखा दुसरा चांगला पर्याय नाही. योगा केल्यामुळे वजनही आटोक्यात राहाते, कित्येक शारिरीक त्रास कमी होतात आणि शरीर लवचिक होण्यास मदत होते. त्यामुळेच योगा आता केवळ भारतातच नाही तर जगभरात केला जातो (International Yoga Day 2025). आपल्या आसपासही आपण नियमितपणे योगाभ्यास करणाऱ्या कित्येक व्यक्ती पाहातो. पण सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर असं सांगतात की योगा करणारे बरेच जण काही एकसारख्या चुका करतात. या चुकांमुळे त्यांच्या शरीराला म्हणावा तसा फायदा होत नाही. त्या चुका नेमक्या कोणत्या याविषयीची ही खास माहिती..(Rujuta Divekar says avoid these 3 common mistakes while doing yogasana)


योगा करताना कोणत्या चुका टाळायला हव्या?

 

१. आसनाची सुरुवात उजव्या बाजुनेच करणे

योगा करताना बरीच आसनं अशी असतात जी डाव्या आणि उजव्या बाजुने समान वेळेसाठी केली जातात. ही आसनं करताना बहुतांश लोक आधी उजव्याच बाजुने सुरुवात करतात.

हार्ट ॲटॅक येण्याच्या काही मिनिटे आधी शरीरात दिसतात ४ लक्षणं- चटकन ओळखली तर जीव वाचू शकतो

उजव्या बाजुने योग्य वेळेसाठी आसनस्थिती ठेवली जाते. आता तेच आसन जेव्हा डाव्या बाजुने करायचे असते तेव्हा स्टॅमिना टिकत नाही आणि मग डाव्या बाजुची आसनस्थिती लवकर सोडली जाते. त्यामुळे प्रत्येक आसनाची सुरुवात उजव्या बाजुनेच करू नका. कधी डाव्या तर कधी उजव्या बाजुने करा.

 

२. आपल्याला येतं तेच करणं..

आपण जी आसनं अगदी उत्तम करू शकतो, तीच आसनं पुन्हा पुन्हा करण्याकडे अनेकांचा कल असतो.

आंघोळीसाठी वापरा 'हा' पदार्थ- बॉडी पॉलिशिंगसारखी चमकेल त्वचा! साबण, बॉडीवॉश वापरणं विसरूनच जाल

जी आसनं त्यांच्यासाठी अवघड असतात, त्यांच्या वाट्याला ते फारसे जात नाहीत. किंवा आसनं केले तरी त्याची योग्य आसनस्थिती येईपर्यंंत स्टॅमिना टिकवून ठेवत नाहीत. असं करणं टाळायला हवं.

 

३. वार्मअप, सुर्यनमस्कार, योगासनं, प्राणायाम, शवासन या पद्धतीने योगासनं व्हायला हवी. काही जणांना वेळ नसला तर ते यातल्या एक दोन गोष्टी पुर्णपणे टाळतात आणि काही मोजक्याच गोष्टी करतात. असं करू नका. वेळ नसला तर प्रत्येक गोष्टी थोड्या थोड्या वेळेसाठी करा, असा सल्ला ऋजुता देतात.  


 

Web Title: International Yoga Day 2025, rujuta divekar says avoid these 3 common mistakes while doing yogasana 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.