चाळीशी उलटून गेल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक नैसर्गिक बदल जास्त घडू लागतात. मेटाबॉलिझमचा वेग कमी होतो, सांधे पटकन दुखू लागतात आणि उभे राहून किंवा उड्या मारणारे व्यायाम करणे अनेकांना अवघड जाते. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की या वयात वजन कमी करता येत नाही. योग्य पद्धतीने केलेले बैठे व्यायाम (seated exercises) हे शरीरावर ताण न देता चरबी कमी करण्यास आणि स्नायू सक्रिय ठेवण्यास नक्कीच मदत करतात.(If you don't have time to exercise, do these 5 things while sitting, you will lose weight and belly fat and feel fresh all day long)बैठे व्यायामाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गुडघे, कंबर आणि टाचा यांवर अनावश्यक ताण येत नाही. ज्यांना उभ्याने व्यायाम करणे काही कारणांमुळे शक्य नाही, त्यांच्यासाठी हे व्यायाम अगदी फायद्याचे आहेत. खुर्चीवर, जमिनीवर किंवा बेडवर बसूनही हे व्यायाम करता येतात. सातत्याने केले, तर ते पोटाची चरबी, मांड्या, हात आणि कंबरेभोवती साठलेली चरबी कमी करण्यास उपयोगी ठरतात.
पहिला उपयुक्त बैठे व्यायाम म्हणजे सीटेड लेग लिफ्ट. खुर्चीवर ताठ बसून एकावेळी एक पाय सरळ पुढे उचलून काही सेकंद रोखून ठेवायचा. हा व्यायाम मांड्या आणि पोटाच्या खालच्या भागावर परिणामकारक ठरतो. तसेच रक्ताभिसरण सुधारण्यासही मदत होते.
दुसरा व्यायाम आहे सीटेड टॉर्सो ट्विस्ट. खुर्चीवर बसून दोन्ही पाय जमिनीवर ठेवायचे आणि वरचा भाग उजवीकडे-डावीकडे वळवायचा. हा व्यायाम पोटाच्या बाजूची चरबी कमी करण्यास मदत करतो आणि पचन सुधारण्यासही उपयोगी ठरतो.
तिसरा महत्त्वाचा व्यायाम म्हणजे सीटेड नी लिफ्ट. जमिनीवर किंवा बेडवर बसून गुडघे एकेक करून छातीकडे आणायचे. हा व्यायाम कोअर स्नायूंना सक्रिय करतो आणि पोटाचा घेर कमी करण्यासाठी प्रभावी ठरतो. सुरुवातीला हळू गतीने करुन नंतर वेग वाढवता येतो.
चौथा व्यायाम आहे सीटेड आर्म पंप किंवा आर्म सर्कल्स. खुर्चीवर बसून हात वर-खाली हलवणे किंवा गोल फिरवणे यामुळे हातांवरील सैलपणा कमी होतो. हा व्यायाम हृदयाची गती वाढवतो, त्यामुळे कॅलरी बर्न होण्यास मदत होते.
पाचवा आणि अत्यंत उपयुक्त व्यायाम म्हणजे सीटेड सायकल मूव्हमेंट, पाय हवेत उचलून सायकल चालवल्यासारखी हालचाल करायची. हा व्यायाम पोट, कंबर आणि मांड्या यासाठी अतिशय परिणामकारक आहे आणि कमी वेळात जास्त कॅलरी कमी करतो.
या पाचही बैठ्या व्यायामांचा खरा फायदा सातत्याने केल्यास मिळतो. रोज किमान १५ ते २० मिनिटे हे व्यायाम केल्यास शरीर हलके वाटू लागते, थकवा कमी होतो आणि हळूहळू वजनात फरक जाणवू लागतो. त्यासोबत संतुलित आहार, पुरेशी झोप आणि ताण कमी ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
Web Summary : After 40, metabolism slows. Seated exercises reduce strain, burn fat, and activate muscles. Try leg lifts, torso twists, knee lifts, arm pumps, and seated cycling. 15-20 minutes daily, combined with a balanced diet, will show results.
Web Summary : 40 के बाद मेटाबॉलिज्म धीमा होता है। बैठे व्यायाम तनाव कम करते हैं, चर्बी जलाते हैं, मांसपेशियों को सक्रिय करते हैं। लेग लिफ्ट, टॉर्सो ट्विस्ट, नी लिफ्ट, आर्म पंप, साइकिलिंग करें। संतुलित आहार के साथ 15-20 मिनट व्यायाम से फर्क दिखेगा।