lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > ऐन तारुण्यात प्रचंड पाठदुखी? मलायका अरोरा सांगतेय पाठदुखी टाळणारे सोपे आसन

ऐन तारुण्यात प्रचंड पाठदुखी? मलायका अरोरा सांगतेय पाठदुखी टाळणारे सोपे आसन

पाठदुखी छळत असेल तर दररोज सकाळी उठून नियमितपणे अर्ध मत्स्येंद्रासन करा, असं सांगत आहे बॉलीवूडची फिटनेस क्वीन मलायका अरोरा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 02:03 PM2021-10-04T14:03:38+5:302021-10-04T14:04:22+5:30

पाठदुखी छळत असेल तर दररोज सकाळी उठून नियमितपणे अर्ध मत्स्येंद्रासन करा, असं सांगत आहे बॉलीवूडची फिटनेस क्वीन मलायका अरोरा.

Huge back pain in youth? Malaika Arora says easy yogasana to avoid back pain | ऐन तारुण्यात प्रचंड पाठदुखी? मलायका अरोरा सांगतेय पाठदुखी टाळणारे सोपे आसन

ऐन तारुण्यात प्रचंड पाठदुखी? मलायका अरोरा सांगतेय पाठदुखी टाळणारे सोपे आसन

Highlightsओटीपोटावरची चरबी कमी करण्यासाठी अर्ध मत्स्येंद्रासन उपयुक्त ठरते. 

दर सोमवारी मलायकाकडून मिळणारं फिटनेस मोटीव्हेशन तिच्या चाहत्यांना पुर्ण आठवडाभर एनर्जी देणारं असतं. मलायकाकडून दर आठवड्याला मिळाणारा फिटनेस फंडा लक्षपुर्वक जाणून घेणारे आणि आठवडाभर तो फॉलो करणारे अनेक फिटनेस प्रेमी आहेत. आपल्या हेल्थ फ्रिक चाहत्यांसाठी मलायकाने नुकतीच एक पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे. यामध्ये तिने अर्ध मत्स्येंद्रासन करून दाखविले आहे. अर्ध मत्स्येंद्रासन कसे करावे आणि त्याचे फायदे काय हे देखील मलायकाने सांगितले आहे. 

 

आजकाल पाठदुखीने त्रस्त असणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. विशेष म्हणजे तरूण वयातच अनेकांना पाठदुखी सुरु झाली आहेत. दुचाकीचा वापर खूप जास्त वाढला आहे. त्यात अनेक शहरांमधले रस्ते खराब आहेत. खड्ड्यातून मार्ग काढत दुचाकी चालवताना अक्षरश: कसरत करावी लागते. यामुळेच तर तरूणांना पाठदुखीचा त्रास खूप जास्त जाणवताे. पाठदुखीसोबतच मान आणि कंबर दुखण्याची समस्याही वाढली आहे. याला बऱ्याच अंशी बसण्याची, झोपण्याची चुकीची पद्धतही जबाबदार आहे. म्हणूनच पाठदुखी सोबतच मान आणि कंबरेचं दुखणंही कमी कारायचं असेल, तर अर्ध मत्स्येंद्रासन करा असं मलायका सांगते आहे. अर्ध मत्स्येंद्रासनला अर्ध मच्छिंद्रासन असेही म्हणतात.  

 

कसे करायचे अर्ध मत्स्येंद्रासन?
- सगळ्यात आधी चटईवर दोन्ही पाय सरळ पुढे पसरवून ताठ बसा.
- यानंतर डावा पाय गुडघ्यात वाकवा आणि उजव्या गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला ठेवा.
- यानंतर उजवा हात डाव्या हाताच्या गुडघ्याच्या बाहेरून घ्या आणि त्या हाताने डाव्या पायाचा तळवा पकडण्याचा प्रयत्न करा. 
- आता उजवा पाय गुडघ्यात दुमडून घ्या.
- उजवा हात जमिनीवर टेकवा.
- कंबर, पोट, मान आणि डोके उजव्या बाजूला वळवा.
- उजव्या पायाचा अंगठा, गुडघा, डावा खांदा, हनुवटी आणि उजवा खांदा एका रेषेत ठेवण्याचा प्रयत्न करा.
- ही आसन अवस्था ३० सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा.
- यानंतर अशाच पद्धतीने दुसरा पाय आणि दुसरा हात वापरून हे आसन करा. 

 

अर्ध मत्स्येंद्रासन करण्याचे फायदे 
- शिडशिडीत बांध्याच्या लोकांना हे आसन करणे सोपे आहे. पण स्थूल व्यक्तींना हे आसन सहजासहजी करता येत नाही. 
- या आसनाद्वारे कंबर, पाठ, पोट यांचा खूपच चांगला व्यायाम होतो.
- या आसनामुळे पाठीचा कणा लवचिक होतो आणि पाठीचे सर्व विकार, दुखणी दूर होतात.
- रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो. रक्ताभिसरण व्यवस्थित झाल्यामुळे चेहरा तसेच संपूर्ण शरीरावर हे आसन केल्यामुळे वेगळीच चमक येते. 


- अर्ध मत्स्येंद्रासन केल्यामुळे पचन विकार दूर होतात.
- ओटीपोटाचा देखील या आसनामुळे खूप चांगला व्यायाम होतो. त्यामुळे महिलांनी हे आसन करणे अतिशय फायदेशीर आहे. 
- आतड्यांचे विकार या आसनामुळे कमी होतात.
- मधुमेहींसाठी देखील हे आसन अतिशय फायदेशीर आहे, असे सांगण्यात आले आहे. 
- अर्ध मत्स्येंद्रासन केल्यामुळे शरीराच्या आत असणाऱ्या भागांना आराम मिळतो, त्यांचा देखील व्यायाम होतो.


- हिप्स मसल्स टोनिंगसाठी अर्ध मत्स्येंद्रासन करण्याचा सल्ला दिला जातो.
- किडनी डिटॉक्स होण्यासाठीही हे आसन करावे.
- ओटीपोटावरची चरबी कमी करण्यासाठी अर्ध मत्स्येंद्रासन उपयुक्त ठरते. 
- फुफ्फुसांमधील ऑक्सिजन पुरवठा आणि ऑक्सिजन धरून ठेवण्याची ताकद वाढविण्यासाठी हे आसन उपयुक्त ठरते. 
 

Web Title: Huge back pain in youth? Malaika Arora says easy yogasana to avoid back pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.