Join us

ओटी पोट खूपच सुटलं? सकाळ- संध्याकाळ २ सोपी योगासने करा, झरझर कमी होतील पोटावरचे टायर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2023 09:15 IST

How To Reduce Lower Abdominal Fat: ओटी पोट कमी करण्यासाठी हे काही करा.... महिना भरातच खूप चांगला फरक जाणवेल. 

ठळक मुद्देहे दोन व्यायाम केल्याने निश्चितच सुटलेलं पोट कमी होईल....

बाकी शरीर तर व्यवस्थित आकारात असते. पण ओटी पोट मात्र खूपच सुटलेलं दिसतं. ही समस्या बहुतांश बायकांना छळत असते. खास करून बाळंतपणानंतर तर बऱ्याच जणींचं पोट सुटलेलं दिसतं. व्यायाम करून हात, दंड, पाय कमी होतात. पण सुटलेलं ओटीपोट मात्र काही आटोक्यात येत नाही. असं हे वाढलेलं ओटीपोट कमी करता करता अक्षरश: नाकीनऊ येतात (Yogasana or exercise for reducing belly fat). त्यामुळेच आता तुम्हीही सगळे प्रयत्न करून थकला असाल, तर हा एक सोपा उपाय करून पाहा. सकाळ- संध्याकाळ हा व्यायाम नियमितपणे केला तर नक्कीच महिनाभरात चांगला फरक जाणवेल. (How to reduce belly fat just in 1 month?)

 

ओटी पोट कमी करण्यासाठी कोणते व्यायाम करावेत, याविषयीचा हा उपाय इंस्टाग्रामच्या yogawithsohityogi या पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सगळ्यात आधी सुचविण्यात आलेलं योगासन म्हणजे बटरफ्लाय.

खिडक्यांसाठी पडदे घ्यायचेत? ३०० रुपयांत मिळेल मस्त जोडी, बघा ३ आकर्षक पर्याय

सकाळी आणि संध्याकाळी ५ ते १० मिनिटे नियमितपणे बटरफ्लाय आसन केल्यामुळे पोटावरची चरबी तर कमी होईलच, पण पोटासंबंधीचे इतरही आजार कमी होतील. हे आसन करताना पाठीचा कणा ताठ राहील याकडे मात्र जाणीवपूर्वक लक्ष द्यावे.

 

बटरफ्लाय आसन केल्यानंतर जे दुसरे आसन करायचे आहे, त्यासाठी बटरफ्लायच्या पोझिशनमध्येच बसा.

साखर खाणे बंद केल्याने खरंच वजन आणि पोट कमी होतं? बघा आहारतज्ज्ञ नेमकं काय सांगतात..

यानंतर दीर्घ श्वास घेत दोन्ही हात वर करा. कमरेतून खाली वाकत हात खाली करा आणि डोकं जमिनीला टेकवा. या स्थितीत बसल्यानंतर पुन्हा श्वास घेत हात वर करा आणि श्वास सोडत सोडत पुन्हा हात खाली करून कमरेतून वाका आणि डोके जमिनीला टेकवा. असे जवळपास १५ ते २० वेळा करावे. हे दोन व्यायाम केल्याने निश्चितच सुटलेलं पोट कमी होईल, असं व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामयोगासने प्रकार व फायदे