Join us

गळ्यावर वाढणाऱ्या चरबीमुळे गळा गुबगुबीत दिसू लागला? ५ व्यायाम- मोरासारखी डौलदार होईल मान-गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2025 09:30 IST

How To Reduce Fats On Neck: गळ्यावर जर चरबी वाढायला सुरुवात झाली तर आपण आहोत त्यापेक्षा जास्त जाड आणि प्रौढ दिसू लागतो.(5 exercise to reduce fats on neck) 

ठळक मुद्देकाही व्यायाम नियमितपणे केले तर नक्कीच गळ्यावरची आणि मानेवरची चरबी कमी होऊ शकते.

हल्ली वाढत्या वजनाचा त्रास अनेकांना होत आहे. यासाठी आपली जीवनशैली जबाबदार आहेच. योग्य आहार आणि पुरेसा व्यायाम या दोन्ही गोष्टी सांभाळल्या तर वाढतं वजन नक्कीच नियंत्रणात राहू शकतं. आपल्यापैकी काही जण असे असतात की त्यांचं बाकीचं शरीर व्यवस्थित प्रमाणात असतं. पण गळा आणि मान या भागात जास्त चरबी साचल्याने त्या व्यक्ती आहेत त्यापेक्षा जास्त लठ्ठ, प्रौढ दिसू लागतात (How To Reduce Fats On Neck?). अशा लोकांनी काही व्यायाम नियमितपणे केले तर नक्कीच गळ्यावरची आणि मानेवरची चरबी कमी होऊ शकते.(5 exercise to reduce fats on neck)

गळ्यावरची आणि मानेवरची चरबी कशी कमी करावी?

 

१. गळ्यावरची चरबी कमी करण्याचा पहिला उपाय म्हणजे मानेचे काही व्यायाम नियमितपणे करणे. मान डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे अशी प्रत्येकी ५- ५ वेळा वळविणे, वर- खाली या पद्धतीने मान हलविणे.

जास्वंदाच्या रोपांवर पांढरी बुरशी पडली? 'हा' घरगुती उपाय लगेचच करा- जास्वंदाचा रोग वाढणार नाही

२. दुसरा व्यायाम म्हणजे एकदा मान उजव्या बाजुला झुकवा आणि उजवा कान उजव्या खांद्याला लावण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर मान डाव्या बाजुला झुकवा आणि डावा कान डाव्या खांद्याला लावण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर मान क्लॉकवाईज आणि ॲण्टी क्लॉकवाईज दिशेने गोलाकार फिरवा.

 

३. नियमितपणे भुजंगासन केल्यानेही गळ्यावरची चरबी कमी होण्यास मदत होते.

वजन घटविण्याच्या नादात गरजेपेक्षा जास्त वॉकिंग कराल तर वजन जास्त वाढेल! वाचा डॉक्टरांचा सल्ला

४. मत्यासन नियमितपणे केल्यास गळ्याच्या भागावर ताण येतो आणि त्यामुळे तिथली जास्तीची चरबी कमी होते.

५. कॅट काऊ पोझ, चक्रासन असे व्यायाम नियमितपणे करा. यामुळेही मान आणि गळा या दोन्ही ठिकाणची चरबी घटत जाते. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामवेट लॉस टिप्स