हल्ली बैठ्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या डोकं वर काढत आहेत. त्यापैकी वाढतं वजन हा त्रास तर बहुसंख्य लोकांना छळतो आहे. काही जणांच्या बाबतीत मात्र असं दिसून येतं की त्यांंचं बाकीचं शरीर बऱ्यापैकी सुडौल असतं. पण गळ्याच्या आसपास बरीच चरबी जमा झालेली असते. शिवाय चेहराही फुगीर दिसत असतो. त्यामुळे अशा व्यक्ती बारीक असल्या तरी त्या लठ्ठ वाटतात. असं जर तुमच्याही बाबतीत होत असेल तर पुढे सांगितलेले काही व्यायाम नियमितपणे करून पाहा. यामुळे गळ्याजवळची चरबी कमी होण्यास निश्चितच मदत होईल.(how to reduce fat on neck?)
परफेक्ट जॉ लाईन मिळविण्यासाठी कोणते व्यायाम करावे?
१. हे व्यायाम अगदी साधेसोपे असून तुम्ही बसल्या ठिकाणीही ते करू शकता. त्यासाठी ताठ बसा. यानंतर मान वर करून वरच्या छताकडे काही सेकंदासाठी पाहा. नंतर पुन्हा मान खाली घेऊन जमिनीकडे पाहा. हे हळूवारपणे १० वेळा करा.
घरात कोणतीच भाजी नसेल तर झटकन करा खान्देशी डुबूक वडे! तोंडाला चव आणणारा झणझणीत रस्सा..
२. यानंतर अशाच पद्धतीने मान उजवीकडून डावीकडे या पद्धतीने फिरवा.
३. तिसरा व्यायाम करण्यासाठी मान डाव्या खांद्यावर झुकवा आणि डावा कान डाव्या खांद्याला लावण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर मान उजव्या खांद्यावर झुकवा आणि उजवा कान उजव्या खांद्यावर लावा. असंही साधारण दोन्ही बाजुंनी १०- १० वेळा करा.
४. चौथा व्यायाम करण्यासाठी मान क्लॉकवाईज आणि ॲण्टीक्लॉकवाईज दिशेने प्रत्येकी ५- ५ वेळा फिरवा.
५. यानंतर हनुवटी गळ्याला लावण्याचा प्रयत्न करा आणि डोकं उजव्या बाजुने फिरवून मागच्या बाजुला पाहण्याचा प्रयत्न करा.
चेहऱ्यावर शिंपडा लवंगचं जादुई पाणी, हळूहळू त्वचेचं सौंदर्य खुलून चेहरा दिसेल फ्रेश, ग्लोईंग..
पुन्हा मान सरळ करा आणि या पद्धतीने डाव्या बाजुने मान फिरवून मागच्या बाजुला पाहा. असं दोन्ही बाजुने प्रत्येकी ५ - ५ वेळा करावे. हे व्यायाम जर तुम्ही काही दिवस नियमितपणे केले तर जॉ लाईन नक्कीच आकार घेऊ लागेल. शिवाय तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही आणि कुठेही हे व्यायाम करू शकता.
