Join us

पोट सुटत चाललंय, पण व्यायामाला वेळच नाही? फक्त ३ मिनिटांचे ३ व्यायाम- पोट होईल सपाट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2025 13:32 IST

How To Reduce Belly Fat: पोटावरची चरबी कमी करण्यासाठी साधे- सोपे आणि मुख्य म्हणजे अवघ्या काही मिनिटांत होणारे व्यायाम पाहा..(simple easy and fast exercise to reduce belly fat)

ठळक मुद्देपोटावरची चरबी कमी करण्यासाठी कमीतकमी वेळात कोणते व्यायाम करता येऊ शकतात?

वयाचा एक विशिष्ट टप्पा ओलांडला की साधारण प्रत्येकाच्या पोटाचा आकार वाढायला लागतो. काही जणांच्या बाबतीत तर हात- पाय प्रमाणशीर असले तरी पोट मात्र सुटायला लागलेलं असतं. बहुतांश महिलांच्या बाबतीत तर बाळंतपणं झाली की पाेटावरची चरबी सुटलेली दिसू लागते. ओटी पोटावरची चरबी तर लटकायला लागतेच, पण त्याच्यावरचा पोटाचा भागही खूप मोठा दिसतो. अशा महिलांना मग फिटिंगचे कपडे अजिबात घालता येत नाहीत. सुटलेल्या पोटामुळे शरीराला आलेला बेढबपणा कमी करायचा असेल तर हे काही साधे सोपे व्यायाम करून पाहा (exercise to lose belly fat).. हे व्यायाम करण्यासाठी तुम्हाला खूपच कमी वेळ लागणार आहे (how to reduce belly fat?). त्यामुळे ज्यांना व्यायामासाठी भरपूर वेळ काढणे शक्य नसते, त्यांच्यासाठी हे व्यायाम विशेष फायदेशीर ठरू शकतात.(simple, easy and fast exercise to reduce belly fat)

 

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी कमीतकमी वेळात कोणते व्यायाम करता येऊ शकतात, याविषयी माहिती देणारा व्हिडिओ फिटनेस ट्रेनरने fitcoach_sheetal या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. ते व्यायाम नेमके कोणते ते पाहूया..

अक्षय्य तृतीया: १ ग्रॅम सोन्यात घ्या सुंदर मंगळसूत्र ब्रेसलेट- खिशाला परवडणाऱ्या किमतीत देखणा दागिना

१. पहिला व्यायाम करण्यासाठी ताठ उभे राहा. यानंतर दोन्ही तळहात एकमेकांवर ठेवा आणि डोक्याच्या वर घ्या. आता उजवा पाय गुडघा दुमडून वर घ्या. उजव्या गुडघ्याला दोन्ही तळहातांनी स्पर्श करा आणि पुन्हा हात वर आणि पाय खाली करा. अशाच पद्धतीने  डाव्या पायानेही करा. असं एकानंतर एक या पद्धतीने ५० वेळा करा. असे एकूण ३ सेट करा.

 

२. दुसरा व्यायाम करण्यासाठी ताठ उभे राहा. यानंतर उजवा पाय गुडघ्यात दुमडा आणि त्याच्या खालून दोन्ही तळहात एकमेकांना लावा. यानंतर हात वर करून पाय खाली टेकवा. आता अशाच पद्धतीने डाव्या पायानेही करा. असं एकानंतर एक या पद्धतीने ५० वेळा करा. असे एकूण ३ सेट करा.

कपाळ काळे, गाल गोरे असे चेहऱ्यावर पॅचेस दिसतात? 'हा' लेप लावा- वांगाचे डागही जातील

३. तिसरा व्यायाम करण्यासाठी दोन्ही तळहात डोक्याच्या मागच्या बाजुने लावा. आता उजवा पाय गुडघ्यात दुमडून वर करा आणि डाव्या हाताच्या कोपऱ्याने उजव्या गुडघ्याला स्पर्श करा. असंच डाव्या पायाचेही करा. हा व्यायामही एकनंतर एक याप्रमाणे ५० वेळा करावा. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामवेट लॉस टिप्समहिला