Join us  

How To Reduce Belly Fat: मलायका अरोरा सांगतेय, बेली फॅट कमी करण्यासाठी ३ व्यायाम..पोट कमी करायचं तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2022 1:28 PM

Yoga For Reducing Belly Fat: बेली फॅट कमी करण्यासाठी ३ महत्त्वाची आसनं सांगत आहे, बॉलीवूडची फिटनेस क्वीन मलायका अरोरा.

ठळक मुद्देतिने सांगितलेली ३ आसनं खरोखरंच बेली फॅट कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणारी आहेत. 

सुटलेलं आणि सतत वाढणारं पोट कमी कसं करायचं हा खरंतर अनेक लोकांपुढचा प्रश्न. खूप लोक या समस्येने त्रस्त असतात. पोटाचा घेर कमी करण्यासाठी मग आहारापासून ते व्यायामापर्यंत अनेक गोष्टींवर भर दिला जातो. वाढलेलं पोट कमी (belly fat) कसं करायचं किंवा पोटाचा घेर नियंत्रणात कसा ठेवायचा यासाठी बॉलीवूडची फिटनेस क्वीन (Malaika Arora) मलायका अरोरा हीने ३ आसनं सांगितली आहेत.(how to maintain slim figure?)

 

मलायका आणि तिचं फिटनेस प्रेम तर जगजाहीर आहे. फिटनेसबाबत आपले चाहतेही आपल्याप्रमाणेच जागरुक असावेत, हा तिचा प्रयत्न असतो. त्यामुळेच तर सोशल मिडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबत नेहमीच वेगवेगळ्या फिटनेस टिप्स शेअर करत असते. नुकताच मलायकाने तिचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून तिने सांगितलेली ३ आसनं खरोखरंच बेली फॅट कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणारी आहेत. 

 

बेली फॅट कमी करण्यासाठी मलायकाने सांगितलेली आसनं१. नौकासन (Naukasana or Boat Pose)हे आसन करण्यासाठी ताठ बसा. त्यानंतर दोन्ही पाय उचला आणि जमिनीपासून साधारण ७० डिग्री अंशात उचला. त्यानंतर दोन्ही हात दोन्ही पायांच्या बाजूने पुढच्या दिशेला ठेवा. हिप्सवर संपूर्ण शरीराचा तोल सावरण्याचा प्रयत्न करा. ३० सेकंद ही आसनस्थिती टिकवा.

 

२. कुंभकासन (Kumbhakasan)यालाच आपण Plank Pose असेही म्हणतो. हे आसन करण्यासाठी आधी पोटावर झोपा. त्यानंतर दोन्ही हात कोपऱ्यात वाकवा आणि हातांचे तळवे छातीच्या बाजूला जमिनीवर ठेवा. आता हळूहळू डोके, छाती, पोट, मांड्या असे सगळे शरीर उचलण्याचा प्रयत्न करा. सगळ्या शरीराचा भार तळहात आणि पायांची बोटे यावर येईल, अशा पद्धतीने तुमची आसन अवस्था ठेवा. ही आसनस्थिती साधारण ३० सेकंद टिकवावी.

 

३. भुजंगासन (Bhujangasana or Cobra pose)बेली फॅट कमी करण्यासोबतच या आसनाचे अनेक फायदे आहेत. भुजंगासन करण्यासाठी पोटावर झोपा. दोन्ही हात कोपऱ्यात वाकवा आणि तळहात छातीच्या दोन्ही बाजूंना ठेवा. आता डोके, मान, छाती आणि पोटाचा अर्धा भाग उचला. नजर जमिनीकडे स्थिर ठेवा. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्ययोगासने प्रकार व फायदेमलायका अरोराव्यायाम