हल्ली बहुतांश लोकांना लॅपटॉप, कम्प्युटरवर सलग ८ ते १० तास काम करावं लागतं. काम करताना अनेकांची आसनव्यवस्था चुकीची असते. त्यामुळे मग थोडंसं पुढे वाकून, पाठीत झुकून काम करावं लागतं. दिवसातले इतके तास जर तुम्ही अशा चुकीच्या अवस्थेत बसत असाल तर त्यामुळे पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी असा त्रास वाढायला लागतो. दिवस संपत आला की मान, पाठ, कंबर अगदी आखडून गेलेली असते. त्यामुळेच दुखणाऱ्या तुमच्या शरीराला रिलॅक्स करण्यासाठी हा एक सोपा उपाय दररोज रात्री झाेपण्यापुर्वी किंवा ऑफिसमधून घरी गेल्यानंतर काही वेळासाठी करून पाहा (how to get relief from chronic back pain?). यामुळे अवघडलेलं शरीर रिलॅक्स व्हायला नक्कीच मदत होईल.(how to reduce back pain due to desk job?)
सिटींग जॉबमुळे मान, पाठ, कंबर दुखत असेल तर काय उपाय करावा?
मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी असा त्रास कमी करण्यासाठी नेमका कोणता व्यायाम केला पाहिजे, याविषयीची माहिती सांगणारा व्हिडिओ bhawanifitness या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
फक्त १ चमचा बेसन रोज 'या' पद्धतीने वापरा- महागड्या फेसवॉश, फेसपॅकची गरजच नाही
हा उपाय करण्यासाठी बेडवर बसा किंवा जमिनीवर सतरंजी टाकून वज्रासनामध्ये बसा.
तुमच्या मागच्या बाजुला २ जाडसर उशा ठेवा. आता मागच्या बाजुने झुका आणि दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवा. यानंतर हळूहळू मागच्या बाजुने झुकून पाठ, कंबर उशीवर टेकवा. डोके उशीवर टेकवा.
दोन्ही हात डोक्याच्या मागच्या बाजुने ठेवा आणि संपूर्ण शरीर रिलॅक्स करा. या अवस्थेमध्ये ४ ते ५ मिनिटे डोळे मिटून शांत पडून राहा.
हा व्यायाम जर तुम्ही नियमितपणे केला तर तुमचं मान, पाठ, कंबरदुखीचं प्रमाण कमी तर होईलच शिवाय शांत झोप येण्यास मदत होईल. शरीरातला रक्तप्रवाह वाढून अंगदुखी कमी होण्यासही मदत होईल.