बऱ्याच जणांच्या बाबतीत असं दिसून येतं की त्यांचं शरीर एकदम प्रमाणात असतं. पोटही सुटलेलं नसतं. शिवाय वजनही अगदी आटोक्यात असतं. पण तरीही त्यांचे हात मात्र खूप गुबगुबीत दिसतात. दंडावरची चरबी जास्त वाढलेली असल्याने दंडांना आणि हातांना अगदी गाेल गरगरीत आकार आलेला असताे (triceps exercises to burn fat). त्यामुळे मग ते जाड नसले तरी लठ्ठ वाटतात. शिवाय स्लिव्हलेस, मेगास्लिव्ह्ज या पद्धतीचे ब्लाऊज, ड्रेस घातल्यावर तर त्यांचे हात आणखीनच जाड दिसतात (how to reduce arm fat?). म्हणूनच दंडावरची चरबी कमी करून स्वत:ला एक स्मार्ट, स्लिम लूक द्यायचा असेल तर हे काही व्यायाम रोज थोडासा वेळ काढून नियमितपणे करा.(best 4 exercise to reduce triceps fats)
दंडांवरची चरबी कमी करण्यासाठी कोणते व्यायाम करावे?
१. दंडावरची चरबी कमी करायची असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला फक्त हाताच्या हालचाली वाढतील अशा पद्धतीचे व्यायाम करायला हवे. यासाठी ताठ उभे राहा. यानंतर हात वर- खाली या पद्धतीने १० वेळा हलवा. त्यानंतर दोन्ही हात समोर घ्या आणि नंतर दोन्ही बाजुला खांद्याच्या समांतर करा.
वजन कमी करण्याचे सोपे ४ उपाय! झटपट इंचेस लॉस होऊन ८ दिवसांतच दिसेल फरक
२. यानंतर दोन्ही हात पुढून मागे या पद्धतीने आणि नंतर पुढून दोन्ही बाजुंना या पद्धतीने क्लॉकवाईज आणि ॲण्टीक्लॉकवाईज असे प्रत्येकी १०- १० वेळा गोलाकार फिरवा.
३. प्लँक, पुशअप्स असे हातावर जोर येणारे व्यायाम दररोज ५ ते ७ मिनिटे नियमितपणे केल्यास दंडांवरची चरबी झरझर कमी होऊ शकते.
४. ट्रायसेप डिप्स नियमितपणे केल्यासही हातावरची चरबी लवकर कमी होऊ शकते. यासाठी तुम्ही भिंत, खुर्चीचा आधार घेऊ शकता. किंवा जमिनीवर बसूनही अर्धवट उठत ट्रायसेप डिप्स मारू शकता. या व्यायामाचे ३ सेट तरी करावे. एका सेटमध्ये किमान १० वेळा तरी हा व्यायाम करावा.