Lokmat Sakhi >Fitness > रात्री पाय दुखतात- पोटऱ्यांमध्ये गोळे येतात? झोपण्यापुर्वी 'हे' काम करा- १० मिनिटांत दुखणं थांबेल

रात्री पाय दुखतात- पोटऱ्यांमध्ये गोळे येतात? झोपण्यापुर्वी 'हे' काम करा- १० मिनिटांत दुखणं थांबेल

How To Get Rid Of Leg Pain: रोज रात्रीच पाय खूप दुखत असतील, पोटऱ्यांमध्ये गोळे येत असतील तर हे काही उपाय घरच्याघरी करून पाहा..(home hacks to reduce leg cramps)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2025 17:23 IST2025-05-14T17:22:10+5:302025-05-14T17:23:02+5:30

How To Get Rid Of Leg Pain: रोज रात्रीच पाय खूप दुखत असतील, पोटऱ्यांमध्ये गोळे येत असतील तर हे काही उपाय घरच्याघरी करून पाहा..(home hacks to reduce leg cramps)

how to get rid of leg pain, home hacks to reduce leg cramps | रात्री पाय दुखतात- पोटऱ्यांमध्ये गोळे येतात? झोपण्यापुर्वी 'हे' काम करा- १० मिनिटांत दुखणं थांबेल

रात्री पाय दुखतात- पोटऱ्यांमध्ये गोळे येतात? झोपण्यापुर्वी 'हे' काम करा- १० मिनिटांत दुखणं थांबेल

Highlightsपाय दुखणे, पोटऱ्यांमध्ये गोळे येऊन पोटऱ्या ओढल्यासारख्या होणे, असा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय...

बहुतांश जणींना हा अनुभव येतो की त्या दिवसभर काम करतात. पण रात्री अंथरुणावर पाठ ठेकली की मग मात्र पाय दुखायला लागतात. पोटऱ्यांमध्येही गोळे येतात. पोटऱ्या एवढ्या ओढल्यासारख्या होतात की अक्षरश: त्यामुळे शांत झोपही येत नाही. काही जणींना मासिक पाळी येण्याच्या काही दिवस आधी हा त्रास होतो, तर काही जणींना रोजच हा त्रास जाणवतो. तुमचा हा त्रास कमी करायचा असेल तर काही घरगुती उपाय निश्चितच उपयुक्त ठरू शकतात (How To Get Rid Of Leg Pain?). ते उपाय नेमके कोणते ते पाहुया..(home hacks to reduce leg cramps)

 

पाय दुखत असतील तर काय उपाय करावा?

पाय दुखणे, पोटऱ्यांमध्ये गोळे येऊन पोटऱ्या ओढल्यासारख्या होणे, असा त्रास कमी करण्यासाठी काय घरगुती उपाय करता येईल याची माहिती योग अभ्यासकांनी humyog या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. 

देखण्या पैठणीवरचं ब्लाऊजही सुंदरच हवं.. बघा ७ स्टायलिश ब्लाऊज डिझाईन्स- पैठणी आणखी उठून दिसेल

यामध्ये त्यांनी एकूण दोन व्यायाम सांगितले आहेत. यापैकी जो पहिला व्यायाम आहे तो करण्यासाठी ताठ उभे राहा. दोन्ही हात सरळ खाली ठेवा आणि तळहात मांड्यांना चिटकून ठेवा. आता तुमच्या मधल्या बोटाचे टोक मांडीवर जिथे टेकले जाईल त्याठिकाणी मांडीवर गोलाकार दाब देऊन मसाज करा. दोन्ही मांड्यांवर प्रत्येकी ५ मिनिटे या पद्धतीने मसाज करा. पायांचं दुखणं कमी होईल.

 

दुसरा उपाय करण्यासाठी ताठ उभे राहा. यानंतर कंबरेच्या जवळची जी हाडं आहेत त्या हाडांवर दाब देऊन तसाच हलका दाब देत हात खाली ओढा.

गारेगार मँगो मस्तानीची मस्त सोपी रेसिपी! आंब्याचा सिझन संपण्यापूर्वी मस्तानी एकदा तरी प्यायलाच हवी..

हा व्यायामही ५ मिनिटे करा. हे दोन्ही व्यायाम नियमितपणे केल्यास पायदुखी बऱ्याच प्रमाणात कमी होईल, असं तज्ज्ञ सांगतात. 


 

Web Title: how to get rid of leg pain, home hacks to reduce leg cramps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.