Join us

वजन कमी व्हावं असं वाटतं असेल तर महिलांनी रोज किती पाऊलं चालायला हवी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 15:23 IST

Weight Loss : अनेकदा असा प्रश्न समोर येतो की, वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी महिलांनी किती पावलं चालावं? चला तर जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर...

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या एक्सरसाईज करतात. त्यात पायी चालणं ही सगळ्यात सोपी आणि फायदेशीर एक्सरसाईज मानली जाते. जास्तीत जास्त लोक वजन कमी करण्यासाठी रोज भरपूर पायी चालतात. पायी चालल्यानं केवळ वजन कमी होतं असं नाही तर मसल्स मजबूत होतात, हृदयाला फायदे मिळतात, ब्लड सर्कुलेशनही चांगलं होतं आणि मसल्स मजबूत होतात. मात्र, अनेकदा असा प्रश्न समोर येतो की, वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी महिलांनी किती पावलं चालावं? चला तर जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर...

वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आणि एकंदर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पायी चालणं खूप फायदेशीर मानलं जातं. एक्सपर्टनुसार, प्रत्येक वयाच्या पुरूष आणि महिलांनी रोज पायी चाललं पाहिजे. पण किती चालावं हेही माहीत असलं पाहिजे. तेच जाणून घेऊया.

मुळात या गोष्टीचा कोणताही ठोस पुरावा नाही की, जेंडरच्या आधारावर पुरूष आणि महिलांनी किती पावलं चाललं पाहिजे. मात्र, सायन्सनुसार रोज १० हजार पावलं चालणं पुरूष आणि महिलांसाठी फायदेशीर मानलं जातं. 

गर्भावस्थेदरम्यान स्पीडनं चालणं एक सुरक्षित एक्सरसाईज मानली जाते. CDC अमेरिकेच्या सल्ल्यानुसार, गर्भवती महिलांनी दर आठवड्यात १५० मिनिटं मीडियम इंन्टेसिटी एक्सरसाईज केली पाहिजे. पण सायन्स सांगतं की, वयानुसार पायी चालण्याच्या स्टेप कमी किंवा जास्त होऊ शकतात. कारण सीडीसीचं मत आहे की, लहान मुलं, टीनएजर्स आणि वृद्धांची गरज वेगवेगळी असते.

२०१२ मध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार,  ६ ते १७ वयोगटातील मुलांनी साधारण ६० मिनिटं एरोबिक किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला हवं. जे साधारण ११, २९० ते १२, ५१२ पावलं चालण्याच्या बरोबरीत आहे.

२०१५ मध्ये १५ रिसर्चचं विश्लेषण केल्यावर समोर आलं होतं की, ६० पेक्षा अधिक वयाच्या लोकांनी ६ ते ८ हजार पावलं चालणं अधिक फायदेशीर असू शकतं. जर कुणाला वजन कमी करायचं असेल तर साधारण ७५०० ते १० हजार पावलं चालावं. यानं फायदा मिळू शकतो. १० हजार पावलं चालणं म्हणजे साधारण ८ किलोमीटर किंवा ५ मैल चालणं. हे शरीराची स्ट्रेंथ आणि स्टेप्सच्या अंतरावर अवलंबून असेल. 

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स