Join us  

पायऱ्या जा चढत- वजन घटेल झरझर; पण वजन कमी करण्यासाठी किती मिनिटे पायऱ्यांचा व्यायाम करावा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2024 6:26 PM

How long does it take to lose weight with stair climbing : लिफ्टचा वापर टाळा-करा पायऱ्यांचा वापर, वजन घटेल-पोटही होईल सपाट..

आजकाल बॉडीला फिट आणि निरोगी आयुष्य (Healthy Life) जगण्यासाठी लोकं विविध उपाय करून पाहतात. विशेष म्हणजे व्यायामाकडे जास्त भर देतात. काही जण तासंतास जिममध्ये घालवतात. पण तरीही अनेकांचं लवकर वजन कमी होईलच असे नाही. काही लोकं जिममध्ये घाम गाळून वजन कमी करतात, तर काही जण योगभ्यास करतात. जर आपलं वजन जिम आणि योगभ्यास करूनही कमी होत नसेल तर, पायऱ्यांचा सोपा सरळ व्यायाम करून पाहा.

कामावरून घरी आले की, अनेक जण आपल्या मजल्यापर्यंत पोहचण्यासाठी लिफ्टचा वापर करतात (Stairs Workout). पण लिफ्टचा वापर न करता आपण पायऱ्यांचा वापर करू शकता(How long does it take to lose weight with stair climbing).

जिन्याच्या पायऱ्या चढल्यामुळे बॉडी तर फिट राहतेस, शिवाय आरोग्याच्या निगडीत अनेक समस्या देखील सुटतात. फिटनेस मॉडेल निकोलेटा कोकोच्या मते, 'दररोज पायऱ्या चढल्याने शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात. जर आपल्याला फिट राहायचं असेल तर, नियमित पायऱ्यांचा वापर करा. पायऱ्या हे कार्डिओ वर्कआउटसारखे काम करते. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.'

वाढत्या वयामुळे विसराळूपणा वाढत चाललाय? रोज खा ५ पैकी एक गोष्ट-स्मरणशक्ती वाढेल, राहाल फिट

पायऱ्या चढण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष ठेवा

- वजन कमी करण्यासाठी बरेच जण पायऱ्यांचा वापर करतात. पायऱ्या चढल्याने शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात. काही लोकं १००-१०० पायऱ्या चढतात. पण १०० पायऱ्या चढण्यापेक्षा आपण २० किंवा ३० पायऱ्यांनी सुरुवात करू शकता. नंतर टाईम वाढवून, स्टॅमिना बुस्ट करता येऊ शकतो. स्टॅमिना वाढल्यानंतर आपण १० ते २० मिनिटे पायऱ्यांचा वापर करून एक्सरसाईज करू शकता.

हिवाळ्यात कुंडीतल्या कोणत्या रोपांना नेमकं कधी आणि किती पाणी घालायचे? चुकले तर रोप सुकले..

- पायऱ्या उतरताना एक-एक पायरी उतरा. तसेच पायऱ्यांमध्ये जास्त अंतर नसेल हे तपासा. अंतर जास्त असेल तर, पडण्याची भीती देखील असते.

वजन कमी करताना किती मिनिटे पायऱ्यांचा वापर करून एक्सरसाईज करावा?

वजन कमी करताना कॅलरीजकडे विशेष लक्ष द्यायला हवे. हेवी वर्कआउट करून आपण शरीरातील एक्स्ट्रा फॅट्स बर्न करू शकता. अंदाजे ५०० ग्रॅम वजन कमी करण्यासाठी आपल्याला ३,५०० कॅलरीज कमी करावे लागतील. जर आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर, आपण नियमित २० ते ३० मिनिटे पायऱ्यांचा वापर करून एक्सरसाईज करू शकता.

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स